Friday, 31 December 2021

विजयस्तंभ भीमा कोरेगांव ऐतिहासिक पुरावा

🌹विजयस्तंभ भीमा कोरेगांव ऐतिहासिक पुरावा🌹

"तुम्ही शूर विरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे,
तर भीमा कोरेगांवला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात."

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रविवारची सुट्टी मिळून दिली ~ नारायण मेघाजी लोखंडे

Thursday, 30 December 2021

कलिंग युद्धाचा प्रभाव..

कलिंग युद्धाचा प्रभाव...

 सम्राट अशोकाची गृह व विदेश नीती बौद्ध धम्माच्या आदर्शाने प्रेरित होती. सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर अशोकाने युद्ध केले, जे कलिंग युद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. या युद्धात मोठ्या नरसंहार झाल्याने अशोकाचे मन व्यथित झाले. या युद्धामुळे बौद्ध भिक्खूंना मोठ्या प्रमाणात कष्ट उचलावे लागले. ज्यामुळे अशोक व्यथीत झाला. त्यामुळे अशोकाने जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांचा धम्माचा आचरण करून आपल्या राज्यात बौद्ध धम्माची शिकवण आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. अशोकाने आपल्या अखंड भारतातील समुदायाला व सीमेवरील राज्यांना आपल्या आदर्शातमक विचारांनी प्रभावित केले. कलिंगच्या जनतेस अशोकाने सांगितले की त्यांनी राजास आपला पिता समजून त्याच्या आज्ञांचे पालन करावे व त्यावर विश्वास ठेवावा. त्याने अधिकाऱ्यांना आदेश दिला की, त्याच्या विचारांचा प्रचार सर्व प्रजेत करावा.

   परकीय राज्यांना देखील अशोकाने सैनिकी विजयाने जिंकण्यापेक्षा आपल्या आदर्श विचारांनी जिंकण्याचे ठरवले. परक्या देशात सुद्धा त्याने मनुष्य व पशुंच्या कल्याणासाठी पावले उचलली. 
त्याने पश्चिम आशिया व ग्रीक राज्यांत देखील आपले शांती दूत आणि बौद्ध भिक्खूसंघ पाठवले. या सर्व बाबी शिलालेखावरून आधारित आहेत. बौद्ध इतिहासानुसार, अशोकाने बौद्ध धम्माचा प्रचारासाठी आपले धम्मप्रसारक श्रीलंका व मध्य आशियात पाठवले. एका प्रबुद्ध शासकाच्या रूपात अशोकाने प्रचाराद्वारे आपले राजकीय प्रभावक्षेत्र वाढविले.

Wednesday, 29 December 2021

दिर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते...

🔹दिर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.🔹

विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही. परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्यासाठी त्या फसविण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भास होऊ शकतात.
    लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्यासवरलेल्या लोकात शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकले-सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२,पान नं. १९३.)
    दि.११ सप्टेंबर १९३८ रोजी पुणे येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या ११ व्या संमेलनात डी.सी. मिशनच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.

Monday, 27 December 2021

आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे.

आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे.
       
"धार्मिकदृष्ट्या आपण जेवढी क्रांती केली आहे तेवढी क्रांती कोणत्याही अन्य समाजाने केलेली नाही, हे कोणालाही नाकारता येणार नाही.न्याय, नीती, समता, बंधुत्व यावर या हिंदु धर्मामध्ये भर नाही. मनुष्याला जाणाऱ्या उपाधी मात्र भरपूर आहेत. धर्माच्या नावाखाली आपल्याला जे विघातक ते आपण सर्व करीत होतो.आपण आता पूर्वीप्रमाणे भक्तीभावाने पोथ्या पुराणे वाचीत नाहीत. आपल्यातील मंत्रतंत्र, साधुसंत सर्व नामशेष झाले आहेत आणि त्यामुळे आपला समाज अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ दिसू लागला आहे राजकीय प्रगतीबद्दलही तोच प्रकार आहे. अत्यंत अल्प अशा काळामध्ये आपण राजकीय प्रगती करून घेतली आहे, तेवढी इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही, हे प्रत्येकास मान्य करावे लागेल आपण फक्त त्यांची गलिच्छ कामे करण्यासाठी होतो आपला एकही अधिकारी नव्हता ज्यांची सावली घेण्यात येत नव्हती, जे राजकारणात अनाधिकारी ठरले होते ते अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मांडीला मांडी लावून आज देशाच्या कारभारात लक्ष पुरवीत आहेत."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं. ३९४)
   दि. २६ एप्रिल १९४२ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.

क्रांतिबा ज्योतीराव...अनंत राऊत कविता

क्रांतिबा ज्योतीराव...अनंत राऊत


क्रांतिबा ज्योतीराव....

ऐतखाऊ अहंकारी 

अन् माजलेल्या बुरुजांवर

घातलेत तुम्ही जबरदस्त घाव

म्हणूनच माझ्या काळजावर

कोरलंय तुमचं नाव


तुम्ही रायगडावरच्या राजाची दुर्लक्षित समाधी

जिज्ञासू जिद्दीने शोधून काढलीत

तिच्यावर श्रद्धेची सुमने वाहिलीत

अन् हा राजा गोब्राह्मणप्रतिपालक नसून

कुळवाडीभूषण असल्याची द्वाही

सर्वभर पसरवलीत


एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या

पण सेठाभटांनी पिळल्यामुळे 

कंगाल झालेल्या बळीराजासाठी 

तुमचा जीव तीळ तीळ तुटायचा

अन् तुमच्या हातातला विद्रोही असूड

साऱ्याच बांडगुळांना फोडून काढायचा


तुम्ही उघडा पाडलात इथला बामणी कावा

अन् गुलामलेल्या बळीस्थानाच्या मुक्तीसाठीचा

ठोकलात प्रभावी दावा


हजार हातकड्यांनी तुरूंगलेल्या

अन् युगायुगांपासून तहानलेल्या पाखरांसाठी

तुमच्या काळजातल्या करुणेचा झरा   

उचंबळून यायचा

अन् गंज पेठेतला मानवतावादी वाडा

आपल्या विहिरीतलं नितळछंग पाणी  

सर्वांसाठी खुलं करायचा


विद्येविना मती गेली मतीविना गती गेली

गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले 

इतके अनर्थ एका अविद्येने केले

या महाकाव्याचे निर्माते तुम्ही


कसं ओळखलंत इथल्या घोर अनर्थांचं मर्म

भकासलेल्या माळरानावर

मुक्तवणारे ज्ञानमोती पेरण्याचं

 केलंत कसं कर्म?


क्रांतिबा....

कुठून आणलंत हे आभाळाएवढं काळीज?

कसं जमलं तुम्हाला...

विधवांच्या आकांताशी एकरूप होणं?

अन् कसं साकारलंत 

मरणाला कवटाळू पाहणाऱ्या

आनेक काशीबाईंसाठीचं प्रसूती गृह?


तुम्ही नाकारलंत पूर्वजन्मीच्या पापाचं

भाकडकथी  कर्म

स्पष्टपणे नाकारलात बांडगुळांच्या हातातला

पीळणारा धर्म

अन् सुरू केली सत्याच्या शोधाची

मानवतावादी वाटचाल


तुम्ही माझ्या गुरूचेही गुरु

अन् आगीत होरपळलेल्या पाडसांना

सावली देणारे कल्पतरू


अमानुष व्यवस्थेच्या मर्मावर

आवेशपूर्ण घाव

हाच तुमचा स्वभाव

म्हणूनच तरली हो ही...

भरकटलेली नाव


क्रांतिबा ज्योतीराव...

ऐतखाऊ अहंकारी 

अन् माजलेल्या बुरुजांवर

घातलेत तुम्ही जबरदस्त घाव

म्हणूनच माझ्या काळजावर

कोरलय तुमचं नाव

▪️▪️▪️▪️

शायर मिर्जा गालिब

Ajit Anushashi 

ये मसाईल-ए-तसव्वुफ़ ये तिरा बयान 'ग़ालिब'
तुझे हम वली समझते जो न बादा-ख़्वार होता

तुझी ही प्रतिभेची भरारी
तुझी ही (जबरदस्त) अभिव्यक्ती
हाय रे गालिब
आम्ही तर तुला संत समजलो असतो
जर तू बेवडा नस्तास...!!

हे उद्गार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर खुद्द गालिबने आपल्या एका सुप्रसिद्ध गजलमध्ये स्वतःविषयी काढलेले आहेत. आणि खरोखरच, गालिबच्या साहित्याची प्रतिभा आणि प्रत्यक्षातली त्याविषयीची प्रतिमा, यात अगदी हेच अंतर आहे. उर्दू साहित्याची आणि खासकरून गालिबची उडतउडत माहिती असणाऱ्यांना गालिब म्हटलं, की 'हाय कम्बख्त, तूने पी ही नहीं।' किंवा 'इश्क़ ने ग़ालिब निकम्मा कर दिया', वगैरे तेवढा आठवतो आणि त्या नादात त्याच्या काव्याचा चतुरस्त्र संचार, त्याच्या भाषेची गेयता, त्यातली अतिशयोक्तीपूर्ण अलंकारीकता आणि त्यातून मांडलेलं तत्त्वज्ञान हे सगळं आपल्यापर्यंत पोचतच नाही.

१७९७ साली, म्हणजेच तब्बल २२० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्माला आलेला गालिब, हा उर्दूतला सर्वाधिक ज्ञात आणि बहुदा लोकप्रियही शायर आहे. त्याच्या काळात मोगली सत्ता संपूर्णतः कमकुवत होऊन लयाला गेली. अर्थात त्याचवेळेला ढासळत्या पण संपन्न सरंजामशाहीत पाहायला मिळतो, तो कला, नृत्य, पाककौशल्य, संगीत, साहित्य, स्थापत्य याचा अद्भुत आणि अजोड असा आविष्कारही घडत होता. राजसत्ता लयाला गेली, तरी या आविष्काराचा समृद्ध वारसा अडीचशे वर्षांनंतर आजही लोकमानसाची घट्ट पकड ठेवून आहे. गंगा-जमनी तहजीब म्हटल्या गेलेल्या या संस्कृतीच्या सुवर्णयुगाचा गालिब निव्वळ एक शिलेदार नव्हता, तर अत्यंत जागरूक साक्षीदारही होता. मोगली सत्तेचं क्रमशः होत गेलेलं अधःपतन, १८५७ ची थरारक वर्षं, त्यानंतर झालेली दिल्लीची कत्तल, या सर्वांची गालिबने आपल्या लिखाणात दखलही घेतलेली आहे. किंबहुना इतिहासकारांना तो एक बहुमूल्य माहितीचा स्त्रोत आहे, हे अनेकांना अज्ञात आहे. 

मात्र अशा उपभोगप्रधान संस्कृतीतला असला, तरी गालिब त्याच्याच मश्गुल नाही. त्याच्या काव्यात हतबलता, दुःख आणि जीवनेच्छा, आवेग याचा मिलाप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिर्बंध आणि ठाम व्यक्तिवाद आहे. 

रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था 

असं म्हणून तो मीर तकी मीर या शायराची थोरवी मान्य करतो.

बे-ख़ुदी बे-सबब नहीं 'ग़ालिब'
कुछ तो है जिस की पर्दा-दारी है

ही तो स्वतःला आठवण करून देतो.

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

असा तो वास्तववादीही होतो.

उर्दू शायर नेहमीच काव्यात स्वतःचं टोपणनाव वापरतात. पण गालिब स्वतःचं नाव वापरताना त्याचा सभोवताल, स्वभाव, कुव्वत आणि अगदी मर्यादा, यावरही तटस्थ आणि कठोर भाष्य करतो. सरंजामी युगातला असूनही भारतीय समाजाच्या रेनेसान्सचा तो हिस्सा आहे, तो म्हणूनच.

अर्थात गालिबचं व्यक्तिगत आयुष्यही दैवाने आणि कर्मानेही दुःखी होतं. मुलं जगली नाहीत, स्थिर उत्पन्न मिळालं नाही, नातेवाईकांनी फसवलं, बादशहाने पुरेशी दखल योग्य वेळी घेतली नाही. या सर्वांसोबत जुगार आणि दारूचा शौक होताच. किंबहुना आयुष्यातलं दुःख, व्यसनं आणि असामान्य नवनवोन्मेषाची ओढ यातलं द्वंद्व गालिबच्या काव्यात ठायीठायी दिसत राहातं. यातूनच जन्माला येते ती त्याची अतिशयोक्तीची आस… त्याच्या आकांक्षा दोन पाच नाहीत, तर…

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

अश्या आहेत. त्याची प्रेयसी नुसती दुर्लक्ष करत नाही, तर…

आह को चाहिए इक उम्र असर होते तक
कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक

एवढी कठोर होते.

पण ही तडफड, नुसती प्रेयसीच्या विरहाची वगैरे नाही. गालिब उर्दूतला पथदर्शी महान शायर बनला, करण प्रेम आणि प्रेमभंगाच्या पारंपरिक कवितेच्या पलीकडे त्याची लेखणी पोचली.

न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता

किंवा

मौत का एक दिन मुअय्यन* है
नींद क्यूँ रात भर नहीं आती

*निश्चित

असे गहन प्रश्न त्याला पडले, तशीच…

रहिए अब ऐसी जगह चल कर जहाँ कोई न हो
हम-सुख़न कोई न हो और हम-ज़बाँ कोई न हो

अशी विरक्ती त्याने मांडली. 

रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है

अशी रसरशीत जीवनाकांक्षा जशी त्याला सुचली, तशीच 

'ग़ालिब' हमें न छेड़ कि फिर जोश-ए-अश्क# से
बैठे हैं हम तहय्या-ए-तूफ़ाँ* किए हुए
#अश्रूंचा महापूर
*वादळाची तयारी

अशी जिद्दही त्याला सुचली. आणि या सर्वांसोबत त्याची विनोदाची एक तीक्ष्ण तैलबुद्धीही शाबूत होती. बादशाहाचा प्रिय असलेल्या जौकला उद्देशून तो उपहासाने म्हणाला…

हुआ है शह का मुसाहिब* फिरे है इतराता
*गुलाम

पण हे बादशाहाच्या कानावर गेल्यावर, दुसऱ्या ओळीत त्याने अर्थ फिरवला…

वगर्ना शहर में 'ग़ालिब' की आबरू क्या है

१८५७ नंतर मुस्लिमांची जी कत्तल ब्रिटीशांनी दिल्लीत केली, त्यात गालिबही सापडला. तेव्हा तू मुसलमान आहेस का? या प्रश्नाला चतुर गालिब म्हणे, "आधा मुसलमान हूँ। शराब पीता हूँ, सुअर नहीं खाता।”

गालिबच्या या प्रतिभेची भुरळ भल्याभल्याना पडली. अगदी।आपल्या पाडगावकरांनी 
'हाती धनुष्य ज्याच्या
त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या
त्यालाच दुःख ठावे'

हे थेट गालिबच्याच 

कोई मेरे दिल से पूछे तिरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता

याच्यावरून घेतलेलं आहे. गुलाजारांच्या सुप्रसिद्ध 

दिल ढूँडता है फिर वही फ़ुर्सत कि रात दिन
बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किए हुए

गाण्यातल्या या दोन ओळी गालिबच्याच. त्यांनी तर त्याच्यावर मालिकाही बनवली आणि पुस्तकही लिहिलं. गुलाम अली, मेहदी हसन, बेगम अख्तर, इकबाल बानो, जगजीत सिंग, अश्या अनेक गुणवान गायकांनी गालिबच्या शब्दांना आपल्या संगीताने अमर केलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्याच्या जयंतीला आयुष्याची गुपितं उलगडून सांगणारा हा शायर आठवायलाच हवा, तोही त्याच्याच शब्दात…

हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे
कहते हैं कि 'ग़ालिब' का है अंदाज़-ए-बयाँ और

२७ डिसेंबर ~ मशहूर शायर मिर्जा गालिब जन्मदिवस


📚 *गालिब*
चांगला लांब कुर्ता, ढगळा पायजमा, डोक्यावर उंच टोपी आणि पायात चर्र चर्र करणारी मोजडी हा असा पेहेराव होता दिल्ली दरबाराच्या शाही शायरचा, मिर्जा असदउल्‍लाह खां गालिबचा. गालिब हा त्यांच्या नावाचा भाग नाहीये तर गालिब ही उर्दू शायरीतली एक उंची आहे, जी गाठण्यासाठी उर्दूतले शायर फार प्रयत्नशील असायचे, आजही आहेत. 
*आज या गालिबचा   जन्मदिवस.*

या गालिबला गालिब नाही तर इतर कुठलीही उपाधी असूदेत सहजासहजी मिळाली नाहीच. शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्या कृपेने गालिबला उर्दू शायरीतल्या तीन महत्त्वाच्या उपाधी मिळू शकल्या कारण हा बादशाह स्वतः एक शायर होता, त्यामुळे शायर लोकांची चांगली वाईट ओळख पटवणं त्याला शक्य होतं आणि तो ते करत असे. या शेवटच्या बादशहाच्या दरबारातले गालिब हे एक अतिशय महत्त्वाचे दरबारी होते. त्यांच्यावर दरबारातल्या काही महत्वाच्या जबाबदार्‍या तर होत्याच पण त्याशिवाय बादशाहने आपल्या मुलाचे शिक्षक म्हणूनही गालिब यांची नियुक्ती केली होती. 

गालिब ४-५ वर्षांचेच असतील तेव्हा त्यांचे वडील वारले, काका आणि आजोबा यांनी गालिब यांना लहानाचं मोठं केलं. त्या काळी गालिब यांची आई चांगली शिकलेली होती पण घरच्या परिस्थितीमुळे गालिब यांचं शिक्षण घरीच झालं आणि त्यामुळे ते फारसं चांगलं व नियमित होऊ शकलं नाही. गालिबचे पूर्वज बर्‍याच ठिकाणी स्थलांतर करत करत भारतात आले होते त्यामुळे गालिबला फारसी ही भाषा यायची, लहान वयातच प्रयत्नपूर्वक ही भाषा त्यांनी पक्कीही केली. गालिब ज्या भागात रहायचे तो भाग मोठमोठ्या शायर लोकांचा भाग होता आणि नकळत हेच संस्कार गालिब यांच्यावर झाले. अगदी लहान वयातच गालिब नज्‍म, शेर लिहू लागले पण ते ही फारसी भाषेत. 

ते तखल्लुस ही पदवी किंवा उपाधी लावून शेर लिहीत, नंतर याची जागा गालिब या उपाधीने घेतली. त्यांची एक सवय होती, ते शेर रचत आणि आपल्या कपड्यांना गाठ बांधत आणि नंतर एकेक गाठ सोडून सगळे शेर लिहून काढत. 

वयाच्या १३ व्या वर्षीच गालिब यांचं लग्न झालं. घरची गरिबीच पण दारू आणि झुगार यांचा नाद गालिबने कधीही सोडला नाही. हातात पैसे आले की ते मेरठची दारू आणत, या मेरठच्या दारूचे गालिब अक्षरशः वेडे होते. दारूच्या रिकाम्या बाटल्याही ते शक्यतो फेकत नसत. या नादापायी ते बर्‍याचदा लोकांकडून पैसे उधारही घेत. 

ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्याप्रमाणे गालिबही विचार करत असत पण तो विचार ते नज़्ममध्ये करत असत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगावर बहुतेक करून गालिब यांनी नज़्म लिहिली आहे आणि त्याच नज़्म लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्याला अपत्य नाही हे दुःख गालिब यांच्या मनात खूप खोलवर जाऊन बसलं होतं. त्यांची सातीच्या साती अपत्ये जगली नाहीत आणि या आपल्या दुःखाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आपल्या नज़्मच्या वाटे. त्यांच्या दुःखी रचना या बहुतेक करून याच दुःखात रचलेल्या आहेत. त्यातलीच एक रचना फार लोकप्रिय आहे - 

हजारों ख्‍वाहिशें ऐसी कि हर ख्‍वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमां, लेकिन फिर भी कम निकले

गालिब यांचा धर्माशी कधीही संबंध आला नाही. ते कधीही मशिदीत गेले नाहीत की कधी नमाज़ पढली नाही. त्यांच्यासाठी धर्म नाही तर तो समोरचा माणूस महत्त्वाचा असायचा. जुन्या दिल्लीत गालिबचे काही किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातलाच हा एक किस्सा. एकदा एका दिवाळीत मिर्झा गालिब त्यांच्या एका हिंदू मित्राच्या घरी गेले होते. दिवाळीची पूजा झाली आणि भटजींनी सगळ्यांना कपाळावर कुंकूने टिळा लावला पण गालिब यांना मात्र त्यांनी वगळलं. आपल्यालाच फक्त वगळलेलं पाहून गालिब त्या भटजींना म्हणाले की मलाही टिळा लावा. त्या दिवशी त्यांनी दिवाळीच्या पूजेचा प्रसाद घेतला आणि घरी जायला निघाले. कपाळावर लावलेला टिळा आणि हातातली मिठाई बघून रस्त्यातच एका मुसलमानाने यावर आक्षेप घेतला आणि तो म्हणाला की, "मिर्झा, दिवाळीची मिठाई खाणार, अल्लाहला कसं तोंड दाखवणार ?" यावर मिर्झा यांनी उत्तर दिलं, "जर बर्फी हिंदू आहे तर काय इमरती मुस्लिम आहे !" त्यांच्यासाठी धर्म नाही तर समोरचा माणूस महत्वाचा होता म्हणूनच त्यांनी दिवाळीचा टिळा लावून घेतला आणि तसेच टिळा लावूनच ते घरीही परतले. 

मिर्झा गालिब यांना भारत आणि पाकिस्तानात महत्वाचं स्थान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाची स्थिती बघून दुःखी झालेल्या गालिब यांनी आपल्या भावना नज़्म लिहून व्यक्त केल्या. आग्रा, दिल्ली, जयपूर आणि कलकत्ता या भागात आपलं आयुष्य घालवणाऱ्या गालिब यांच्या उर्दू गझल आवडीने ऐकणार्‍यांची संख्या आजही खूप मोठी आहे. उर्दू शायरीत मिर्झा गालिब यांना सर्वोच्च मानलं जातं. स्वतःबद्दल लिहिताना गालिब म्हणतात, "दुनिया में यूं तो बहुत से अच्छे कवि-शायर हैं, लेकिन उनकी शैली सबसे निराली है." 

खरं तर माझा आणि नज़्म, शेरो शायरीचा फारसा संबंध नाही पण काही उर्दू कवींच्या रचना मला आवडतात आणि त्यातले मिर्झा गालिब खासच. या खास असणार्‍या गालिबसाठी त्यांच्यावर पोस्ट लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला.

Sunday, 26 December 2021

बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?- प्रा. हरी नरके

बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?-                    
 प्रा. हरी नरके  
       
   मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून ते एक कायद्याचे पुस्तक होय. बाबासाहेब म्हणतात, मनुस्मृती वॉज लिगल ॲण्ड पिनल कोड. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्याप्रमाणे ब्रिटीशांचे अन्याय कायदे आम्ही मानत नाही. असं सांगण्यासाठी कायदेभंगाचे आंदोलन केले गेले. तसंच आंदोलन म्हणजे मनुस्मृतीचे दहन करणे होय. विदेशी कापडांची होळी करणं जसं जन आंदोलन होतं.

तसंच मनुस्मृती या माणूसघाण्या पुस्तकाची प्रत जाळण्याचे कृत्य प्रतिकात्मक होते. बाबासाहेब पुस्तकप्रेमी असताना त्यांनी पुस्तक कसे जाळले? मनुस्मृतीत काहीच चांगले नव्हते का? मनुचा काय दोष, त्याने तर तत्कालीन कायद्यांचे संकलन केले, मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता, अशा नानाविध युक्तीवादांद्वारे या गलिच्छ पुस्तकाचे व कर्त्याचे समर्थन केले जाते.
कोण असतात हे लोक?
१. मनुस्मृतीचे पिढीजादा लाभार्थी,

२. अशा लाभार्थ्यांकडे बुद्धी गहान टाकलेले स्त्री किंवा = पाळीव पोपट,

३. आंत्यंतिक अज्ञानी, सनातनी, विकृत, वेडे

मनुस्मृतीचे समर्थन करणारा कुणीही प्राणी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा असत नाही. अशा विकृतांना चार जोडे मारून एक मोजला पाहिजे. अशी घाण दूरच ठेवलेली बरी. पिढ्यानपिढ्या वरील ३ वर्गात मोडणार्‍या या इसमांची किव किंवा किळसच करायला हवी. मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, सराईत गुन्हेगार किंवा राष्ट्रद्रोही इसमांच्या वर्तनाचे समर्थन करणे होय.मूठभर त्रैवर्णिक पुरूषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनू, उच्चवर्णियांचे हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तिनदाच काय पुन्हापुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत मनुची पिलावळ जिवंत आहे, तोवर नियमितपणे जाळायला हवा. नाकारायला हवा. समर्थकांच्या तोंडावर थुंकण्यासाठी गटारात फेकायला हवा.

बाबासाहेबांना कुठे संस्कृत येत होते? त्यांना काय माहित मनुस्मृतीत काय होते? असले साळसूद प्रश्न विचारणार्‍या हरामखोरांना जोड्यानेच मारायला हवे. भडव्यांनो, तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिले नाही. त्यांना शाळेत त्याऎवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजे मनूने [ ती व्यक्ती असो, संस्था असो, मठ असो, ब्राह्मण किंवा क्षत्रिय असो ] गटारगंगा पसरवली, ज्या नीच प्रवृत्तीने ८५ % स्त्री शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही, संडासला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून बसावे, ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाणे ठेवावे, स्त्री- शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती. काय आहे मनुस्मृतीत?

▣ "व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]

▣ "लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

▣ " पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]

▣ "स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]

▣ "पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात.’’ [9/15]

▣ "नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते." [9/46]

सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व सामाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी वाचायला हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, "मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही... स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे"

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टीका सर्वमान्य आहेत."

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनाने प्रकाशित केलेले आहेत. आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत.

बापटशास्त्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]
👇

▣ "सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [2/13]

▣ "माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [2/15]

▣ "ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8]

▣ "जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11]

▣ "ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [3/56]

▣ "नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [4/43]

▣ "आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [5/47]

▣ " स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [5/48]

▣ " पिता, पती, पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [5/49]

▣ " पती जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150]

▣ " लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

▣ " पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]

▣ "पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155]

▣ "स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये" [5/162]

▣ "स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपलीपतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166]

▣ " पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168]

▣ " पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [6/2]

▣ " विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ 6/3]

▣ " स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [9/13]

▣ "स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]

▣ "पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]

▣ " स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात." [9/18]

▣ "व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]

▣ "नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते." [9/46]

आय हेट मनुस्मृती. आय सॅल्युट बाबासाहेब, कुरूंदकर, गोखले, साळुंखे ॲण्ड कौशल्यायन.

२५ डिसेंबर १९२७ ला पहिल्यांदा, भारतीय राज्यघटनेच्या १३ व्या कलमाद्वारे दुसर्‍यांदा आणि बौद्ध धर्म स्विकारून तिसर्‍यांदा भारतरत्न बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.

मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, राष्ट्रद्रोही इसमांचे समर्थन करणे होय. अशांना जवळपासही फिरकू देऊ नका. हे प्लेगचे उंदीर जाळलेलेच बरे. कारण ते निकोप आरोग्याला घातक आहेत. भयंकर व्हायरस आहेत. त्यातनं साथीचे रोग पसरतात. 

संत श्रेष्ठ नामदेव महाराज


ll संत श्रेष्ठ नामदेव महाराज ll

वारकरी संत परंपरेतील नामदेव प्रमुख संत .आज त्यांची जयंती. नामदेवांनी देशभर भ्रमंती केली. पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ,हरियाणा, उत्तरांचल मध्ये नामदेवांची मंदिर आहेत. बाबा पुरणदास यांनी पंजाबी भाषेत नामदेवांचे चरित्र लिहिले आहे.

पंजाब मध्ये नामदेव वीस वर्षे राहिले. या काळात त्यांनी हिंदी आणि पंजाबी भाषेतून भजन, ओव्या लिहिल्या. शीख धर्मावर त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. शीख धर्मियांचा धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथसाहेब मध्ये नामदेवांच्या ६१ रचना समाविष्ट केलेल्या आहेत. त्यातील एक रचना -

हिंदू पुजे देहुरा'मुसलमान मसीत
नामा सोई सेविया, जहा देहुरा ना मसीत
अर्थ -हिंदू देवळात तर मुसलमान मशिदीत पुजा करतात.

पण मी जिकडे पुजा करतो तिकडे,
ना देऊळ आहे ना मशीद 

संत नामदेवांची ही रचना सध्या देखील मार्गदर्शन करणारी आहे. संत नामदेव भारतातील सहिष्णू आणि मिश्र संस्कृतीचे प्रसारक होते.

आपण ही परंपरा पुढे नेऊयात. नामदेवांना अभिवादन. 🙏

"आमुचा विठ्ठल प्रचंड | इतर देवाचे न पाहू तोंड ||१|| एका विठ्ठलावाचून |न करू आणिक भजन||

ll संत श्रेष्ठ नामदेव महाराज ll

टोकाला जाऊन नेहरूंचा द्वेष का केला जातो.........?

टोकाला जाऊन नेहरूंचा द्वेष का केला जातो.........? 

१९४७ साली पाकिस्तान-भारत दोन्ही देशांचा जन्म झाला. 
मोहम्मद अली जीनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची वाटचाल सुरु झाली. 
ह्या ७५ वर्षात पाकिस्तान अधिकृतरीत्या इस्लामिक देश बनलेलं आहे. 
ह्या ७५ वर्षात अनेकदा पाकिस्तानची राज्यघटना पूर्णपणे बदलण्यात आली. 
ह्या ७५ वर्षात देशाचे दोन तुकडे झाले. 

ह्या ७५ वर्षात तब्बल ३९ वर्षे थेट लष्करी हुकुमशहा सत्तेवर होते आणि उरलेल्या काळात सरकार नावाच लष्कराच्या तालावर नाचणार बाहूल. 
ह्या ७५ वर्षात ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली माणसांना ठार मारण्यात आल,

थोडीफार शहाणी सुरती माणस होती , त्यांना मारण्यात आल , मारलेल्या लोकांच्या मारेकर्यांना गाझी धर्मवीर म्हणून डोक्यावर घेण्यात आल. ह्या गोंधळात आर्थिक आघाडीवर, शैक्षणिक आघाडीवर पाकिस्तान कुठे आहे ? ह्याच उत्तर पाकिस्तानी नागरिकांना परदेशात गेल्यावर जास्त चांगल समजत. 

पाकिस्तान सोबत जन्माला आलेल्या भारतात नेहरूंनी सगळ्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणली आणि देशाला त्या मार्गावर नेल. अलिप्त राष्ट्र परिषद असो कि विज्ञान तंत्रज्ञान ह्याला प्राधान्य असो कि देशाची नवी तीर्थक्षेत्र म्हणजे कारखाने आहेत अस म्हणन हे सगळ करताना नेहरूंनी देशाला दिशा दिली. नुसतीच दिशा दिली नाही तर त्यांनी ज्या रस्त्यावरून पाकिस्तानची वाटचाल झाली त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला भारताला नेल. 

त्यामुळे गांधींचा खून करूनही जे साध्य झाल नाही ते भारताच हिंदू पाकिस्तान करायच्या प्रयत्नाला २०१४ पर्यंत ७० वर्षे वाट बघावी लागली. आणि तेही अजून नजरेच्या टप्प्यात नाहीये. अजूनही नेहरूंच्या मार्गावर चालणारे असंख्य समंजस नागरिक या देशात आहेत. 

आपल्याच देशबांधवांचे “ धर्मविरोधी “ म्हणून केलेले खून, धर्माच्या नावाने दंगली , धर्माच्या नावाने झुंडीन केलेले हल्ले हे सगळ प्रत्यक्षात यायला एवढा काळ गेला त्याला कारण आहेत ते नेहरू......... 

धार्मिक राष्ट्रवादी परिवाराच्या दृष्टीने “ हिंदुराष्ट्र “ होण्याऐवजी भारताला 'संविधानाच्या 'दिशेला नेण्याचं “पाप” नेहरूंच्या माथी आहे म्हणून नेहरूंचा इतका पराकोटीचा द्वेष केला जातो . 

आता आपल्याला म्हणजेच भारतीय नागरिकांना ठरवायचं आहे. 

आपल्याला हिंदू पाकिस्तान बनायचं आहे कि भारत बनायचं आहे ? 

आपल्याला धर्मग्रंथ प्रमाण मानून हिंदू आश्रित म्हणून जगायचं आहे कि घटनेला प्रमाण मानून भारतीय नागरिक म्हणून जगायचं आहे ? 

आर्थिक-रोजगार-शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य ह्या विकासाच्या मुलभूत आघाड्यांवर जसा पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलेला आहे म्हणून लोकांना भडकावून द्यायला त्यांना सतत भारताच शत्रुत्व जाग ठेवाव लागत तस आपल्याला ह्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारला आपल्याला फक्त एकमेकांची डोकी फोडायला लावण्यात रस आहे.

ज्यांची उद्दिष्टच मुळात धार्मिक आधारावर राष्ट्राची निर्मिती आहे त्यांना आर्थिक- रोजगार- शेती- उद्योग- शिक्षण- आरोग्य ह्या विकासाच्या मुलभूत प्रश्नांवर ना काही व्हिजन आहे ना काही रस आहे. 

बाकी हिंदू राष्ट्रवाद हा सगळा भंपकपणा उधडून काढायला आणि सगळे बुरखे फाडायला एकच साधा प्रश्न कुठल्याही माणसाला विचारावा...

“ फाळणीला जेवढे गांधीजी जबाबदार तेवढेच जीना जबाबदार , मग मुसलमान जीना सोडून गोडसेने गांधीना का मारल ? जीनांना का मारल नाही ? “ 

हा प्रश्न मागली ७५ वर्षे अनुत्तरीत आहे आणि पुढली अनेक वर्षेही अनुत्तरीत राहील याची खात्री आहे.


#बखर_लोकशाहीची 

#आयडिया_ऑफ_इंडिया

#Thanks_Ambedkar

#नेहरू

जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा*

https://www.icrr.in/Encyc/2020/12/17/Dead-sea-scrolls-and-crisis-of-Christianity-.html

*जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा*

प्रत्येकाची धार्मिक निष्ठा आणि श्रद्धा हा नेहमीच आदराचा विषय असतो आणि असावा. मात्र जेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धांना धक्का लागावा आणि धर्माधिष्ठित समाजरचना कोलमडून पडावी यासाठी करोडो रुपये  ओतून मुद्दाम प्रयत्न केले जातात तेव्हा ते एकप्रकारे वैचारिक आणि धार्मिक युद्धच असते. आणि अशी युद्धे लढताना अशा धार्मिक भावना किंवा श्रद्धांचा विचार करता येत नाही!
तर... थोडं भूतकाळात..

*इसवी सन १९४७-४८*

आजच्या इस्त्राएलमधला, मृत समुद्राजवळचा कुमरान नावाचा भाग होता. तिथल्या डोंगराळ भागात काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरवायला घेऊन गेले होते. मेंढ्यांना चरायला सोडून तिथल्याच जवळच्या गुहांमधून भटकत असताना त्याना एका गुहेत काही जुनी मडकी आणि त्या मडक्यांमध्ये काही भेंडोळी सापडली. काहीतरी जुनी आणि फारच प्राचीन वस्तू दिसते असा अंदाज आल्यामुळे त्यांनी ती मडकी बेथलेम *(जेरुसलेम)* मधील एक फ्रेंच कॅथेलिक चर्चच्या स्वाधीन केली. नंतर तेथील आजूबाजूच्या एकूण अकरा गुहांमध्ये शोध घेण्यात आला आणि अशी आणखीही काही, एकूण ९८१, भेंडोळी त्या भागात सापडली. त्यातील भेंडोळ्यांच्या प्राथमिक पहाणीत ती साधारण दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची असून काही भेंडोळी अरेमाईक भाषेत लिहिली असल्याचा अंदाज तेथील फ्रेंच कॅथोलिकांना आला. अतिशय कोरड्या हवेमुळे अतिशय सुस्थितीत असणारी ती भेंडोळी पाहून त्यात साधारण काय लिहिले असू शकेल याचा अंदाज येऊन तत्काळ ती भेंडोळी दडपून टाकली गेली..

*इसवी सन १९८४-८५*

एकोल बिब्लिक *(Ecole Biblique)* जेरुसलेम येथे जवळजवळ गेलं अर्धशतक नुसती पडून असणाऱ्या या भेंडोळ्यांचा सुगावा ऑक्सफर्डमधील रॉबर्ट आयसेनमन नावाच्या एका अमेरिकन अभ्यासकाला लागला.  अनेक खटपटी करून त्याने या  भेंडोळ्यांचे फोटो मिळवले. शेवटचा फोटो हाती आल्यावर त्याने या गोष्टीचा उच्चार जाहीरपणे केला, आणि मग ही भेंडोळी अभ्यासासाठी खुली केली गेली. अभ्यासाअंती असे लक्षात आले की ही भेंडोळी म्हणजे एक जुनं गॉस्पेल आहे. जेम्स नावाच्या एका मसीहा किंवा देवदूताचं गॉस्पेल. सध्या प्रचलित असणारे बायबल किंवा न्यू टेस्टामेंट आणि जेम्सचे गॉस्पेल यात बरेच साधर्म्य होते, किंबहुना ते एकच होते.....

इसवी सनाचे पहिले शतक किंवा त्यापूर्वीचा काळ..

ज्यूंवर रोमनांची सत्ता होती. तत्कालीन ज्यूंमध्येसुद्धा देवदूताची संकल्पना होती. *(Massionic concept)* कोणतंही संकट आलं किंवा एखादी रोगाची साथ पसरली तर एखादा देवदूत येईल आणि आपलं रक्षण करेल अशा भावनेतून त्याचं एखादं गॉस्पेल लिहिलं जाई. अशी सुमारे ४५० जुनी गॉस्पेल्स त्याकाळी अस्तित्वात होती. अशाच जेम्स नावाच्या एका देवदूताचं बायबल त्यावेळी त्यांनी त्यांच्या त्यावेळी प्रचलित असणाऱ्या अरेमाईक भाषेत लिहिलं होतं. जेरुसलेम तेव्हा रोमनांच्या ताब्यात होतं. आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी रोमन्स आटोकाट प्रयत्न करत होते. ज्यूंच्या सततच्या बंडांमुळे रोमनांना आपलं राज्य राखणं आणि कठीण जात होतं. त्यावेळी रोमन administrative officer किंवा तत्सम जबाबदारी असणारा पॉल नावाच्या सरदाराने याला सगळ्याला कंटाळून एक वेगळाच उपाय शोधला. आपले राज्य आणि संस्कृती यहुदी स्वीकारत नाहीत म्हटल्यावर त्याने यहुद्यांची संस्कृतीच उचलण्याचे ठरवले. त्याकाळी लिहिले गेलेले जेम्स गॉस्पेल जसेच्या तसे रोमनमध्ये भाषांतरीत करून घेतले. मूळ जेम्सच्या जागी जिझस निर्माण केला गेला. आणि त्याचा जन्म दिवस म्हणून त्याकाळी यहुद्यांमध्ये प्रचलित असणारा सूर्यदेवतेचा जन्मदिवस- २५ डिसेंबर लिहिला गेला! मूळ जेम्सच्या टेस्टामेंटमध्ये जेम्सच्या जन्मदिवसाबद्दलचा कोणताही उल्लेख नाही. किंबहुना जीझस येशू, मदर मेरी किंवा जीझसचे क्रूसीफिकेशन यातला कोणताही उल्लेख मूळ टेस्टामेंटमध्ये नव्हता. मूळचे यहुदी असणारे जेम्सचे गॉस्पेल विविध बदल करून न्यू टेस्टामेंट म्हणून प्रचलित केले गेले. *(सध्या देखील हेच टेस्टामेंट प्रचलित आहे.)* २५ डिसेंबर या दिवशी सूर्यदेवतेचा उत्सव सोडून जीझसचा जन्मदिवस साजरा करायला सुरुवात केली गेली. अर्थातच प्रजेने स्वीकारावा म्हणून रोमन राज्यकर्त्यांनीसुद्धा, आपली मूळ रोमन संस्कृती सोडून या नव्याच पंथाचा स्वीकार केला, आणि प्रजेलाही तो सक्तीने करायला लावला. ज्यांनी तो नाकारला, त्यांना क्रूरपणे मारले गेले. कित्येक ज्यू या दहशतीने आपला मूळ प्रदेश सोडून जगभर विखुरले. पुढे रोमन सम्राट कॉन्स्टेंटाईन द ग्रेट याने जीझस ख्राईस्टच्या तथाकथित जन्मानंतर अडीचशे वर्षांनी ,त्याकाळी प्रचलित अन्य सर्व ४५० गॉस्पेल्स जाळून नष्ट केली आणि फक्त न्यू टेस्टामेंटचे पालन करण्याचा हुकुम सोडला आणि न्यू टेस्टामेंटच्या आधी नेमकी काय व्यवस्था होती ही समजण्याचे मार्गच बंद झाले. न्यू टेस्टामेंटमधल्या जीझस येशू सकट सगळ्या धादांत खोट्या आणि अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींमागे हा पंथ आणि याचे अनुयायी चालू लागले.. मात्र या संहारातून वाचलेलं चर्च ऑफ जेम्सचं गॉस्पेल अचानक मृत समुद्राजवळच्या त्या गुहांमध्ये सापडलं.. आणि ख्रिश्चन धर्माच्या मुळालाच भयानक मोठा हादरा बसला.
हेच सत्य पुढल्या पिढ्यांसमोर उघड होऊ नये, म्हणून न्यू टेस्टामेंट सोडून अन्य ४५० गॉस्पेल्स आणि त्यांना मानणारी माणसे निर्दयपणे नष्ट केली गेली.  हेच सत्य उघड होऊ नये, म्हणून ती भेंडोळी कॅथलिकांनी आजवर दडवून ठेवली. मात्र सत्य दडून रहात नाहीच.

ज्या यहुद्यांची मूळ भाषा अरेमाईक किंवा नंतर हिब्रू होती, त्यांचा धर्मग्रंथ रोमन भाषेत का लिहिला गेला असेल? या प्रश्नाचं उत्तर इथे सापडतं. जेत्यांनी जितांवर वर्चस्व मिळविण्यासाठी अजिबात अस्तित्वात नसलेला एक मसीहा किंवा देवदूत निर्माण केला आणि जगावर त्याचं अस्तित्व मान्य करायला लावण्यासाठी रक्तरंजित संघर्ष मांडला, जो आजही संपलेला नाही.

आर्टीफिशीअल इंटेलिजन्समधील पहिल्या पिढीचे शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ एन.एस.राजारामन यांनी आपल्या *‘dead sea scrolls & crisis of Christianity’* या पुस्तकात यासंदर्भातली अनेक  गुपिते उघड केली आहेत. सखोल माहितीसाठी हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे.

वेद आणि पुराणांच्या, उपनिषदांच्या सत्यतेवर, हिंदू धर्मातील सणांवर सतत टीका करणारे दोन्ही धर्म- मुसलमान आणि ख्रिश्चन यांचा मूळ पाया किती डगमगलेला आहे याची कल्पना करता येते का? अतिशय समृद्ध तत्वज्ञान, कला, सखोल अभ्यास, अत्यंतिक श्रमातून विकसित केलेली विविध शास्त्रे, असा स्वत:चा वारसा असणारा हिंदू धर्म केवळ धर्मप्रसारासाठी कधीही रक्तरंजित लढाई मांडत नाही हे इतिहास सांगतो. तरीही यासगळ्याकडे डोळेझाक करत, दिवाळीच्या फटाक्यांचे आणि होळीच्या रंगांचे दाखले पुराणात शोधू पहाणारे हाच प्रश्न ख्रिसमसच्या बाबतीत उघडपणे कधी विचारतील?

*https://www.icrr.in/Encyc/2020/12/17/Dead-sea-scrolls-and-crisis-of-Christianity-.html*

-मैत्रेयी गणपुले-जोशी

Saturday, 25 December 2021

तुरुंगात असतानाही बाहेर पाठविलेल्या बऱ्याचश्या पत्रात त्यांची मुख्य मागणी ही नवनव्या पुस्तकांचीच असायची....

भारत हृदय सम्राट
.........................

तुरुंगात असतानाही बाहेर पाठविलेल्या बऱ्याचश्या पत्रात त्यांची मुख्य मागणी ही नवनव्या पुस्तकांचीच असायची....

भगत सिंहांचे मित्र जयदेव गुप्ता यांना २४ जुलै १९३० रोजी त्यांनी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे. ज्या पत्रातून त्यांचं पुस्तक प्रेम कमालीचं ठळकपणे दिसून येतं.ते छोटंसं पण महत्वाचं पत्र इथे वाचकांसाठी उपलब्ध करून देतोय. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सेंट्रल जेल
लाहोर
24 जुलै 1930

प्रिय मित्र जयदेव,
खाली लिहिलेली पुस्तकं द्वारकानाथ ग्रंथालयातून माझ्या नावावर नोंदवून घेऊन शनिवारी कुलबीरच्या हस्ते पाठवावीत. पुस्तकांची नावं अशी....

Militarism ( Karl Liebknecht )
soviet at work ( Lenin )
Left wing Communism ( Lenin )
FIELDS FACTORIES AND WORKSHOPS ( Prince Peter Alekseyevich Kropotkin )
why men fight ( B russell )
Collapse of the Second International ( Lenin )
Mutual Aid: A factor of evolution ( Alekseyevich Kropotkin )
Civil War in france ( Karl Marx )
The Spy ( Upton Sinclair )

शक्य असेल तर कृपया मला आणखी एक पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करावी.....

त्याचे नाव, historical materialism, bukharin असं आहे हे पुस्तक पंजाब लायब्ररीतून मिळेल आणि ग्रंथालयाच्या अध्यक्षांकडून माहिती करून घ्या की काही पुस्तकं बोर्स्टल तुरुंगात पाठवली आहेत काय? त्यांच्याकडे पुस्तकांचा भयंकर दुष्काळ पडला आहे. त्यांनी सुखदेवचे बंधू जयदेव यांच्याकडे एक यादी पाठवली होती.परंतू त्यांना अजून पुस्तकं मिळाली नाहीत. ग्रंथालयाकडे अशी एखादी यादी नसेल तर कृपया लाला फिरोजचंद यांच्याकडून माहिती मिळवून त्यांच्या पसंतीनुसार काही मनोरंजक पुस्तके पाठवा. या रविवारी मी जेंव्हा तिकडे पोहोचेन तोवर पुस्तकं तिकडं पोहोचायला हवीत. हे काम काहीही करून शीघ्र करून घ्यावं. याच बरोबर डार्लिंग लिखीत Peasant in Prosperity आणि याच सारखी आणखी ( शेतीच्या समस्याविषयक ) काही पुस्तकं डॉक्टर आलम यांच्यासाठी सुद्धा पाठवावीत. 

तुम्हाला हे कष्ट जास्त वाटणार नाहीत अशी अशा करतो. भविष्यकाळात तुम्हाला कधी कष्ट, त्रास देणार नाही असे वाचन देतो. सर्व मित्रांना माझी आठवण करून द्या. लज्जावतीजी यांना नमस्कार सांगा. दत्तच्या भगिनी आल्या तर त्या माझीही भेट घेतील अशी अशा करतो. 

आपला नम्र,
भगत सिंह
~~~~~~~~~~~~~~~
या त्यांच्या पत्राव्यतिरीक्त 26 एप्रिल 1929 साली वडिलांना पाठवलेल्या एका पत्रात ते "गीतारहस्य" आणि "नेपोलियनचं चरित्र" वडीलांकरवी मागवून घेताना दिसतात.  

🙏

इंदिरा गांधींनी प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा १९६९ साली महत्वाचा निर्णय घेतला.ठराविक उद्योगपतींसाठीच चालणाऱ्या देशातल्या १४ प्रमुख बँकांचे इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केले.

इंदिरा गांधींनी प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा १९६९ साली महत्वाचा निर्णय घेतला.ठराविक उद्योगपतींसाठीच चालणाऱ्या देशातल्या १४ प्रमुख बँकांचे इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केले. 

टाटांच्या अधिपत्याखाली चालणारी सेंट्रल बँक यापैकी सर्वात मोठी ज्यांत सुमारे चारशे कोटी रूपयांच्या ठेवी होत्या.तुलनेने सर्वात लहान बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. प्रा.व्ही.जी.काळे आणि डी.के.साठेंनी १९३५ साली पुण्यात सुरू केलेल्या या बँकेत जवळपास ७० कोटींच्या ठेवी होत्या,याखेरीज बिर्ला समूह त्याकाळी युनायटेड कमर्शिअल बँक चालवायचा तर डालमिया जैन यांच्याकडे पंजाब नॅशनल बँकेची सूत्रे होती.देना बँकेत
काही गुजराती उद्योगपतींचे हितसंबंध गुंतले होते.

सर्वांनाच राष्ट्रीयीकरणाच्या धडक निर्णयाचा झटका बसला.देशातल्या अग्रगण्य बँकांच्या तत्कालिन आर्थिक सर्वेक्षणानुसार १८८ संचालक बँका चालवायचे देशातल्या अन्य १४५२ कंपन्यांचेही संचालक होते.प्रचंड प्रमाणात खाजगी आणि अधिकार मिळवण्यासाठी बँकांचा बराच निधी सर्वांनी बिनदिक्कतपणे वापरला. बँकांची दारे आता उच्चवर्गाऐवजी जनसामान्यांसाठी खुली झाली.

संदर्भ : २४ अकबर रोड , पृष्ठ क्र.३६
लेखक : रशीद किदवाई.


© सत्यजित चव्हाण

संतती नियमनाच्या पल्याड, र.धों. च कार्य समजून घेणं गरजेचं आहे!

राजू परुळेकर सर 


'संतती नियमनाच्या पल्याड, र.धों. च कार्य समजून घेणं गरजेचं आहे!'

कामजीवन अश्लील आणि घाणेरडे असून ते पावित्र्याला बाधा आणते, असं समजणाऱ्या कालखंडामध्ये संतती नियमनाच्या पल्याड जाऊन कामजीवनावर शास्त्रीय आणि तर्कशुद्ध भूमिकेतून लिखाण करणारे समाजस्वास्थकार र.धों. कर्वे यांचा आज आठवण दिवस.

खरं तर आजही आपल्या समाजामध्ये लैंगिक शिक्षण वर्ज्य मानलं जातं. लैंगिकतेबद्दल जर का लिहिलं, बोललं तर ते अश्लाघय आणि अपवित्र मानलं जातं. आजही जर अशा पद्धतीने लैंगिकतेबद्दल लिखाण केल गेलं तर त्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जात. याच कारण म्हणजे, मानवाचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन. लैंगिकतेकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन असणं गरजेचा आहे तो आपण विकसित करू शकलेलो नाही आहोत. 

अशा लिखानाद्वारे (शास्त्रीय आणि तर्कसुसंगत लिहिलेलं लेखन असलं तरी) लोकं, मुलं बिघडतात अशी धारणा कमी अधिक प्रमाणात प्रगत अप्रगत राष्ट्रांमध्ये पाहायला मिळते. सगळ्याच बाबतीत प्रगत असणाऱ्या, प्रगती करू पाहणाऱ्या समाजामध्ये याच विषयाच्या बाबतीत मागासलेपण पाहायला मिळत. अगदी विवाहित असणाऱ्या जोडप्यामध्ये देखील या विषयावर फार क्वचित चर्चा होत असेल. 

प्रा.र.धो कर्वे यांनी  लैंगिकता, संतती नियमन वगैरे गोष्टींवर केलेलं लेखन हे पाश्चात्य लेखकांच्या तुलनेत मला भारतीय समाजाचा विचार करता खुच क्रांतिकारक वाटतं. मी २००५ साली ' Masters and Johnson on Sex and Human Loving ' पुस्तक खरेदी केलं त्यावेळी या पुस्तकाची पंचवीसावी आवृत्ती प्रकाशित झालेली होती.  पण अवघ्या एक दोन वर्षापूर्वी मला र.धो यांचं लेखन वाचावयास मिळालं त्यावेळी जाणवलं की प्रचंड क्षमता आणि अभ्यासू असणारा हा लेखक काळाच्या किती तरी पुढे होता. तर असो...

खर तर आज आपण जे शासकीय पातळीवर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना सुचवतोय ते उपाय र.धो नी १९२१ साली मुंबईमध्ये परळ येथे ' संतती नियमन केंद्र ' काढून केले! लोकसंख्या आणि संतती नियमन हे विषय त्यांनी प्रथमतः इंग्रजी आणि नंतर मराठीतून लिहिले. अर्थातच त्यावेळी हे विषय वर्ज्य मानले जायचे. आजही मी संसोधनाच्या अनुषंगाने पुरुषांना कंडोम, कॉपर T, पिल्स, इंजेक्शन किंवा शारीरिक संबंध ठेवताना काय काळजी घेता? बायकोची मर्जी विचारात घेता का? असे प्रश्न विचारतो तेंव्हा पुरुष मोकळेपणाने बोलत नाहीत. आजही सेक्स हा विषय बायकोसोबत मिळून बोलला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. वैवाहिक सुसंवाद ही गोष्ट आजही आपल्या पचनी पडत नाही. ही अवस्था आजमितीला मोबाईल वर एका क्लिकवर अनेक साईट ओपन होणाऱ्या काळातील आहे. पण र.धो नी अशा काळात लोक प्रबोधन केलं ज्या काळात हे लैंगिकता, निरोध, कुटुंब नियोजन वगैरे ऐकण पाप मानल जायचं! 

असं असलं तरी त्यांनी त्यांचं लेखन थांबवलं नाही सन१९२७ पासून त्यांनी लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन वगैरे विषय डोळ्यासमोर ठेऊन ' समाजस्वास्थ्य ' मासिक सुरू केलं काही अपवाद वगळता  २६ वर्षे त्यांनी अखंड हे मासिक चालू ठेवलं होत पण आर्थिक अडचणी मुळे त्यांच्या मृत्यूनंतर हे मासिक बंद पडल. याच मासिकातून त्यांनी ' संतती नियमन ' , ' विवाह संस्था ' , ' विनय म्हणजे काय? 'व्यभिचाराचा प्रश्न' इत्यादी लेख लिहिले. दुर्दैवाने यातील काही लेखाबद्दल आक्षेप घेत त्यावेळेस च्या काही मंडळींनी त्यांच्यावर खटले भरले त्यातील एक खटला तर खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी र.धो.कर्वे यांच्या बाजूने लढला होता. एका खटल्यासंदर्भातील नोटीस तर र.धो गेल्यानंतर आली होती. 

र.धोंच लेखन वादग्रस्त वाटायचं खर तर काहीच कारण नाही कारण ' विनय म्हणजे काय ' या त्यांच्या लेखात ते म्हणतात की ' विनय किंवा लज्जा हा स्त्रियांचा स्वाभाविक गुण नसून सामाजिक परिस्थितीमुळे उत्पन्न होतो, हे थोड्याशा विचारांती सहज दिसून येईल. मुलींमध्ये स्वाभाविक रीतीने लज्जा उत्पन्न होत नसून आया मुलीस लाजण्यास शिकवतात, असे आमच्या पाहण्यात आहे.' (या संदर्भात त्यांनी काही उदाहरण दिली आहेत) त्याच्यापुढे जाऊन ते याच लेखात एके ठिकाणी म्हणतात की,' समागम म्हणजे पाप ही कल्पना रानटी लोकांत नसते व म्हणूनच या कल्पनेची अनुषंगिक लज्जा ही त्यांच्यात दिसत नाही ' पुढं जाऊन ते लिहितात की, ' विनय म्हणजे ढोंग आहे '! 

मानवी नग्नते संदर्भात अगदी तर्कनिष्ठ विश्लेषण त्यांनी केलं आहे. ते खालील  परिच्छेदातून आपल्याला दिसेल,
'वस्तुतः स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या नग्न शरीरात तटस्थ वृत्तीने पाहणाराला लाज वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु नैसर्गिक प्रवृत्ती दडपून टाकू पाहणाऱ्या सामाजिक निर्बंधाच्या तडाख्यात मनुष्याची तटस्थ वृत्ती राहावी कशी? स्त्री पुरुषाच्या परस्पर आकर्षणामुळे परस्परांचे अनावृत्त शरीर पाहण्याची दोघांस ही इच्छा असणे स्वाभाविक आहे. ही इच्छा नैसर्गिक असल्यामुळे ती दाबण्याचा जितका प्रयत्न करावा, तितकी ती अधिक प्रबळ होते.'  

स्त्री पुरुष समागम याबद्दल ते लिहितात,
' अविवाहित स्त्री पुरुषांच्या समागमाचीही हीच स्थिती आहे, स्त्रियांचे बाबतीत कौमार्य हा एक भयंकर मोठा सद्गुण मानला जातो. परंतु पुरुषांच्या बाबतीत ते कळणेच शक्य नसते. विशिष्ट वयापूर्वी समागमाने स्त्रीचे नुकसान होईल व ते कायद्याने बंद केलेले आहे, हे योग्यच आहे. परंतु त्यापुढे समगमने नुकसान न होता फायदा होतो व यात विवाहाचा काही संबंध येत नाही. तेंव्हा शास्त्रीय दृष्टीने यात काही नुकसान नाही' 
असे अनेक मुद्दे प्रा.र.धो कर्वे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले परंतु आपण आजही या गोष्टी समजून घ्यायला कितपत तयार झालो आहोत हादेखील कळीचा प्रश्न आहे!

🍁 योगेश कुदळे repost

हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहेपण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? -डॉ. बाबासाहेब आंबेडकर


हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे
पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ?
               -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
~~~~~~~~~~~~~~~~~

       मुंबई येथील बौद्धधर्म सल्लागार समितीतर्फे  दिनांक १४ जानेवारी १९५५ रोजी वरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले.   सभेला ५० हजारापेक्षा जास्त समुदाय हजर होता.
      या सभेला संत गाडगे महाराज, श्री. अनंत हरी गद्रे, श्री. संत मोडके महाराज, कांबळे, करमाळेकर तसेच दलित फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
      "बऱ्याच दिवसांपासून मी असा एक निर्णय घेतला होता की, कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहावयाचे नाही.   कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आला आहे.   व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे.  तथापि, माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही, असे नाही.   आज माझ्यापुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येत आहे, ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो.

      जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीचे मुख्य अंग असले तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही.   समाजाच्या उन्नतीकरिता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता आहे. समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मरणानंतर समाजाला दिशा दाखविणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरुष निर्माण झाला नाही, तर एकखांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो.

      मला आता काहीतरी विधायक कार्यक्रम करायला पाहिजे.   परंतु त्याकरिता पैशाची अत्यंत जरूर आहे.   त्यासाठी पैसा हवा आहे.   मी एक मोठा याचक आहे.   समाजातील इतर लोकांचे अंतरंग जर निर्मळ असेल व त्या निर्मळ अंतकरणाच्या लोकांना आपले कार्य मंगल आहे असे वाटले व त्यांनी जर द्रव्याची मदत केली तर आम्हाला ती हवीच आहे; परंतु त्यांच्या मदतीवर आपण विसंबून राहून चालणार नाही.   आपण आपल्या बळावर उभे राहिले पाहिजे.

      "ज्याचे मढे तोच खांद्यावर उचलतो"   तद्वतच आपल्या कार्याचा भार आपणच उचलला पाहिजे.   आपल्या कार्याला आपणच मुक्त हस्ताने दान दिले पाहिजे.

      आज माझा धर्मोपदेशाचा उपोद् घात आहे.   बौद्ध धर्मासंबंधी मला सांगावयाचे आहे.   बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी चौदा वर्षांचा विद्यार्थी होतो तेव्हापासूनची आहे.   चौदा वर्षांचा असताना बौद्ध धर्माशी माझा परिचय झाला.  चौदा  वर्षांचा असतानाच रामायण, महाभारत, कृष्णलीलामृत, शिवलीलामृत, श्रीधराख्यान वगैरे सर्व मराठी ग्रंथ माझ्या वडिलांनी मजजवळून दहा दहा वेळा वाचून घेतले होते.   वडिलांच्या अशा वागण्याचा निदान त्यावेळी तरी मला कंटाळा आला होता.

      एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असताना मी कुठली तरी एक परीक्षा पास झालो होतो.   ज्या ' ' बटाट्याच्या चाळीत ' मी राहात होतो तेथील लोकांनी मी पास झाल्याबद्दल अभिनंदनपर सभा घ्यावयाचे ठरविले.   दादा केळूस्करांना मध्यस्थी घालून मोठ्या प्रयासाने तेथील लोकांनी माझ्या वडिलांची परवानगी घेतली.   एक टेबल खुर्ची मांडून सभेस सुरुवात झाली.   पण काय, सभेला काही निवडक लोक सोडून कोणीच हजर नाही.   जो तो लंगोटी लावून आपापल्या उंबरठ्यावर व ओट्यावर पान, तंबाखू चघळीत बसलेला होता.   सभेचे महत्त्व कोणालाच समजलेले नव्हते.

      पण आज परिस्थिती निराळी आहे.   आज अस्पृश्य समाज जागृतीने बराच पुढे आहे.   लहानपणी माझ्या अभिनंदनाप्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली तिचे अध्यक्ष श्री. दादा केळूसकर होते.   त्यावेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो असेन ते मला आता आठवत नाही.   भाषण संपल्यानंतर केळूस्करांनी गौतम बुद्धाचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले.   रामायण-महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते.   तसेच हेही पुस्तक मी वाचले.   परंतु बुद्धाची शिकवण व इतर ग्रंथांची शिकवण यात बरीच तफावत आहे, असे मला आढळून आले.   पुढे या पुस्तकासारखी नवीन नवीन पुस्तके जसजशी मी वाचू लागलो तसतसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला.   बुद्ध धर्म कसा व हिंदू धर्म कसा, दोहोत किती भेद आहे, किती निराळी दृष्टी आहे हे मला कळू लागले.

      माझे वडील म्हणत असत की, आपण गरीब आहोत.   पण आपली महत्त्वाकांक्षा अत्यंत दांडगी पाहिजे.   महाभारतातील द्रोणाचार्य गरीब होते.   द्रोणाच्या मुलांना त्यांची आई पाण्यात बाजरीचे पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे.   कर्ण हा गरीबीतूनच वर आला.   थोर पुरुष नेहमी गरीबीतून जन्माला येतात.   हाती पडलेले गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन डळमळू लागले आणि मग इतर धर्मग्रंथांचे पठण मला बरोबर वाटले नाही.   वडील वारल्यानंतर अशा धर्मग्रंथ पठणाची ब्याद माझ्या मागून निघून गेली.

उच्च शिक्षणासाठी म्हणून मी अमेरिकेला गेलो.   तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला.   बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरिता व बुद्ध धर्म-चरित्राने मनात उडविलेली खळबळ शमविण्याकरिता मी तेथे बरेच वाचन केले.   बराच विचार केला.   तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळून चुकले.   बौद्ध धर्माचे माझे वेड बरेच पुरातन आहे.
   
      लोक म्हणतात राजकारणात माझी हानी झाली.   आता बुद्ध धर्मानेही माझे नुकसान होणार आहे.   परंतु नुकसान माझे होणार आहे, ते नुकसान सोसण्यास मी तयार आहे.   धर्म ही माझी खाजगी बाब आहे.   बुद्ध धर्म मला पटला.   तो मी उचलला.   राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत.   खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन; पण ते मला नको.   राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ नव्हे.   तो एक सांप्रदाय आहे.   रामानंदी, कबीरपंथी माणसाला तू पंथ सोड, असे सांगितल्याने तो पंथ सोडणार नाही.   त्याचप्रमाणे माझा धर्म अटळ आहे.   हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला त्या मार्गानेच गेले पाहिजे.

      बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे.    तुम्हीही स्वीकारा.   नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या  भारताने व त्याबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा, अशी माझी इच्छा आहे. (टाळ्या)

      *बुद्ध धर्म मी का स्वीकारला, ते तुम्हास सांगतो.   याची कारणमीमांसा करणे योग्य आहे.   गौतम बुद्धाला पहिल्या प्रथम पाच शिष्य मिळाले.   त्यांना पंचवर्गीय भिक्खु असे म्हणतात.   एकंदर चाळीस शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले आपण शिष्यांना अनुज्ञा करावी.   धर्मप्रचारासाठी दूरदूर पाठवावे.   त्यावेळी बुद्ध धर्माची व्याख्या गौतम बुद्धाने शिष्यांना सांगितली ती अशी : ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, हिताय, सुखाय, देव मनुस्सानं, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अंति कल्याणं '.
     
       बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे.   हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारून चालणार नाही, तर देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे. (टाळ्या)   ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो व शेंड्यासही गोड असतो, त्याचप्रमाणे बुद्ध धर्म सुरवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे.   या धर्माचा आदि, मध्य, अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असे आहेत.  

       पण कोणीही मला सांगावे की, आमचा हिंदू धर्म-ज्याला मी ब्राह्मणी धर्म समजतो-हा  ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' आहे काय ?   ब्राह्मण व इतर विद्वान लोक सांगतात की, ब्राह्मणी धर्माची संस्कृती १० हजार वर्षांपूर्वीची आहे.   जुनी संस्कृती आहे, पण आजही हिंदू धर्मात ७ कोटींच्यावर अस्पृश्य आहेतच.   समाजातून बहिष्कृत केल्यामुळे जंगलात राहाणारे वन्य व चोऱ्या करून उपजीविका करणारे असंख्य गुन्हेगार लोकही या धर्मात आहेत.   सांगा, अशा हिंदू धर्माला  ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' धर्म म्हणता येईल काय ?

      जगातील काही कम्युनिस्ट वगळले तर असा एकही मनुष्य आढळणार नाही, ज्याला धर्म नको आहे.   त्याचप्रमाणे धर्म आम्हालाही पाहिजे.   पण तो सत् धर्म हवा.   असा सत् धर्म म्हणजे जेथे सर्व लोक समसमान राहातील, सर्वांना सारखीच संधी मिळेल, तोच खरा धर्म.   बाकीचे सारे अधर्मच होत.

      हिंदू धर्माच्या शिकवणीप्रमाणे जर सर्वत्र ब्रह्मच आहे तर मग महारात, मांगात, चांभारातही ते असले पाहिजे.   मग हिंदू धर्मात अशी असमानता का ?

      इ. स. १९१० साली जेव्हा हिंदु-मुसलमानात जातीयवादावर बखेडा सुरु झाला तेव्हा हिंदू कोणास म्हणावे, हिंदूची व्याख्या काय, असा कठीण प्रश्न उपस्थित झाला.   तेव्हा भारतातील अकरा विद्वानांनी अकरा निरनिराळ्या व्याख्या केल्या.   हिंदू शब्दाच्या व्याख्येतील बेबनाव व बेबंदशाही खरोखरच हास्यास्पद आहे.   कुणाचाही ताळमेळ बसत नाही.   सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या पाहा-
     ' आसिंधु: सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका ।
     पितृभुभु: पुण्यभुश्चैव सवै हिंदु: इति उच्यते ।।
      तर राधाकृष्णन यांची व्याख्या काही निराळीच आहे.   ती टिळकांच्या व्याख्येशी जुळते घेत नाही.   टिळकांचा ' हिंदू ' म्हणजे-
    ' प्रामाण्य बुद्धिर्वेदषु साधनानाम् अनेकता उपास्या नाम नियम: '
      असे मानणारा आहे.   टिळकांच्या दृष्टीने  ' हिंदू '  म्हणजे वेदांना प्रमाण मानणारा पुरुष.   मग धर्माचरणात त्याची साधना काही जरी असली तरी चालेल.   एखाद्या हिंदू मनुष्याने वेदांना प्राधान्य देऊन  ' पिराची '  जरी पूजा केली तरी हरकत नाही, तो हिंदूच.   टिळकांच्या या व्याख्येला काय ठाव आहे.   मग सांगा, असा धर्म  ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' होईल काय ?  (टाळ्या)

बुद्ध धर्माची प्रतिष्ठापना पाहून बऱ्याच लोकांनी कोल्हेकुई सुरू केली आहे.   वर्तमानपत्रातून ओरड केली.   पण मला आताच त्यांच्याकडे पाहावयास वेळ नाही.   एकदा सर्वांचे लिखाण होऊन जाऊ दे.   माझ्याविरुद्ध कोण कोण काय लिहितात हे बघू.   त्यांची लेखणी बंद झाली म्हणजे मी माझी लेखणी उचलीन.

      धर्म हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक व पोषक आहे.   इतर धर्माप्रमाणे आत्मा आहे काय ?   तो कोठे बसला आहे, हे मला माहीत नाही.   अंगठ्याएवढा आहे, की तो काळजाजवळ बसला आहे, कोणास ठाऊक ?   देव मला अजून दिसला नाही.   हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे.   पण मनुष्याच्या जीवनाला कोठे जागा आहे ?

      बुद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही.   सर्वत्र समसमानता आढळून येईल.   बुद्धधर्मात देव, आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागले पाहिजे, याचा विचार केलेला आढळतो.   या धर्मात नीतीचे संबंध सांगितले आहेत, म्हणून हा सत् धर्म आहे.   बाकीचे धर्म झूट आहेत.   ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनविला आहे.   बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून देण्यासाठी ख्रिश्चन लोकांसारखे पाद्री नाहीत व आत्म्यास सद्गती देणारे, पूजाविधी व यज्ञयाग करणारे ब्राह्मण तर मुळीच नाहीत.

      जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच धर्म.   बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे.   म्हणून या धर्माची महती आहे.

      अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा प्रादुर्भाव फार पुरातन कालापासून होता व आहे; परंतु अमेरिकेसारख्या प्रभावी राष्ट्रात दोन हजारावर बुद्ध भिक्षु आहेत.   पिढ्यान् पिढ्या चालत आलेला ख्रिस्ती धर्म लोकांनी सोडला व बौद्ध धर्म घेतला आहे.

      अमेरिकेमध्ये फौजेतील शिपाईसुद्धा बुद्ध धर्म अनुयायी आहेत.   एवढेच नव्हे तर बुद्ध धर्माबद्दल आस्था म्हणून शिपाई लोक आपल्या ड्रेसवर (गणवेश) बुद्ध धर्माचे चिन्ह लावतात.   अमेरिकन सरकारला बौद्ध चिन्ह वापरण्याबद्दल कायदे करण्यास त्यांनी भाग पाडले आहे.   अमेरिकेत एक नुकताच अवाढव्य विहार बांधण्यात आला.   त्याला साऱ्या जगातील देशांमधून जवळजवळ २० लाख रुपये देणगी मिळाली.

      जर्मनीत तर विचारायलाच नको.   बुद्ध धर्म प्रचारसंस्था हजारोंनी गणल्या जातात.   युरोपात असा एकही देश नाही की, जेथे बुद्ध धर्माचा प्रचार होत नाही.   भगवान गौतम बुद्ध हा जगप्रसिद्ध युगपुरुष आहे.   तेथील लोकांना रामाची, कृष्णाची, विष्णुची ओळख नाही.

      जगाला हिंदुस्थानची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय.   हिंदुस्थान देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभू म्हणून ओळखला जातो.   अजाणपणे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले हिंदी विद्वान लोक आज पश्चातापाने विव्हळ होऊन असे कबूल करीत आहेत की, तुलनात्मक दृष्टीने बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे.

      आपणाला कल्याणकारक बुद्ध धर्म पाहिजे.   आपले पूर्वज अज्ञानी होते.   महारकी, भीक मागणे हीच यांची वर्तने.   त्यांना धर्माची काय आवड ?   पण आपण स्वावलंबी बनलो आहोत.   इतर वर्गांच्या जोडीला जाऊन आपल्याला उभे राहायचे आहे.  धर्मामध्ये उन्नतीचा मार्ग मोकळा हवा.

      माझ्या इतर मित्रांचा असा समज आहे की, धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल.   मी काही आर्थिक प्रश्न हाती घेणार आहे.   धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, असे ' एखाद्या गड्याचे अथवा भाऊचे ' म्हणणे असेल तर त्याने मला आपली आर्थिक योजना दाखवावी.   मला जर त्या योजनेची कल्पना पटली तर मी माझी सर्व शक्ती त्या कार्याला वेचीन.

      ख्रिस्ती धर्मात व बुद्ध धर्मात अंतर आहे.   ख्रिस्ती धर्मात येशूने सांगितले आहे की,. गरीब लोकहो, तुम्ही दारिद्र्याला भिऊ नका.   मेल्यावर सारे जग तुमचेच आहे.   (हंशा)   अशी बुद्ध धर्मात आर्थिक बाब डावलेली नाही.   

      एकदा अनाथपिंडीकाने भगवंताला आर्थिक बाबीबद्दल प्रश्न विचारला होता.   तेव्हा भगवंताने उत्तर दिले, " संपत्ती ही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यक आहे.   संपत्ती गोळा करावी.   पण तिचा उपयोग दुसऱ्याला नाडण्यासाठी, गुलामगिरीत डांबण्यासाठी कधीही करू नये.   ती शुद्ध साधनांनी मिळवून तिचा सदुपयोग झाला पाहिजे. "   धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी माणसाला अत्यंत आवश्यक आहेत.   जीवनोपयोगी वस्तुंच्यासाठी धर्म व अर्थही पाहिजेत.

      वर्षातून एकदा तरी शेती नांगरण्याचे काम मालकाने केले पाहिजे, अशी शाक्य लोकांत रूढी होती.   त्याप्रमाणे भगवंताने वडिलांना प्रश्न केला, " दुसऱ्याच्या कष्टाचे फळ आम्ही खावे हे रास्त आहे काय ? "   आमचे अन्न आम्हीच कष्टाने मिळवून खाल्ले पाहिजे.   धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी जोडीनेच केल्या पाहिजेत.   तेव्हा आपल्या योजनेने आर्थिक हानी होईल हे त्यांनी मला पटवून द्यावे.   नुसत्या अर्थानेही अनर्थ होईल.   अर्थामध्ये धर्म हवा आहे.

कम्युनिझम हा कसा जगला ?   तो कसा टिकून राहिला ?   ही शक्तीची बाब आहे.   शक्ती आणि जबरदस्तीने तो टिकला आहे.   त्यांना प्राँपर्टी, मालमत्ता हवी.   रशियामध्ये प्राँपर्टीसाठी यादवी माजली आहे.   रशियातील कडक शिस्त बाळगणारे जमीनदार लुप्त होताच लोक उसळी मारून उठतील, बेबंदशाही माजेल आणि मग समाजाचा व्यवहार बेबंदशाहीने चालू लागेल.   बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्ये आहे.   बुद्ध धर्मातील भिक्षुंप्रमाणेच कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तू ठेवण्याचा अधिकार आहे.   तांब्या, पाणी गाळण्यासाठी कापड व वस्तरा या तीन वस्तू होत.   

      भगवान बुद्धाचा अंत होऊन दोन हजार वर्षे लोटली पण अजूनही हा धर्म जोमाने फोफावतो आहे, त्याला कुणी शास्ता नाही की सर्वाधिकारी नाही.   अंत:काळी भगवंताला त्यांच्या शिष्याने विचारले,  ' भगवंत तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचे काय होणार ? याला कुणीतरी शास्ता ठेवा ' तेव्हा भगवंताने उत्तर दिले की  " माझ्या गैरहजेरीत धर्म हाच तुमचा शास्ता आहे.   तो जर पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग ? विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हाच तुमचा शास्ता."

      जगाचा व्यवहार धर्माने चालला आहे.   एखाद्या बाळंत झालेल्या बाईला सांगितले की हे मूल तुझा शत्रू आहे.   तू त्याला दूध पाजू नकोस.   त्यामुळे तू अशक्त होशील, म्हातारी होशील, तुझे सौंदर्य कमी होईल, हे मूल तुला काळ ठरणार आहे.   तर त्या मुलाची आई हे ऐकेल काय ?   ती कितीही दु:ख झाले, आजारी असली तरी मुलाला दूध पाजील.   मुलाचे प्रतिपालन करणे हा तिचा धर्म आहे.   जगाचे सर्व व्यवहार धर्माने चालले आहेत.

      पुण्यातील अर्धपोटी राहून खाना घेऊन (जेवणाचे डबे) जात असतात.   बिरयाणी, पुलाव अशा प्रकारचे जेवण असते.   पण ते लोक कर्तव्य बुद्धीने व प्रामाणिकपणे डबे पोचते करतात.   म्हणून धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे.   तो सत् धर्म पाहिजे.   अधर्म नको-तो सुकर्म पाहिजे.   दुष्कर्म नको.

      धर्मासंबंधी लोकांच्या मनावर किती परिणाम आहे, हे स्वतः जाऊन बघायला पाहिजे.   मी नुकताच ब्रह्मदेशाला जाऊन आलो.   तिकडे काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत.   तिथे दर्जात कमी अगर जास्त असा भेदभाव नाही.   कोणत्याही प्रकारच्या उच्चनीच भावनेला, वासनेला थारा नाही.   जातीयतेला थारा नाही.   तिथे खरी खरी लोकशाही नांदत आहे.   त्यांची घरे म्हटली म्हणजे टेबल किंवा खाटेसारखी वाटतात.   १५-२० फूट आकाराची.   वरती लाकडे व त्यावर चटया लावलेल्या असतात.   भिंती, विटा, चुना, लोखंड वगैरे पाहिजे तितकी काळजी आपल्याकडे घेतली जाते.   त्यांच्या घराचा दरवाजा चटयांचाच असतो.   लाथ मारली तर ही घरे कोसळून पडतील.   

      तेथील लोक संध्याकाळी ६ वाजता जेवतात.   संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत भटकतात.   तेथील चहाची दुकाने बंद झाली की ते चहाचं सामान जेथल्यातेथेच ठेवतात; परंतु सामानाची चोरी होत नाही.   आपल्याकडे सिमेंटमध्ये लोखंड घातलेल्या भिंतीसुद्धा चोर फोडतात. (हंशा)

      दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मी लोक पैसा जपून ठेवत नाहीत.   खायचं व दानधर्म करायचा, हाच पैशाचा उपयोग. त्यांचा बँकेत पैसा नाही.   बुद्धाचं सांगणं आहे की काहीच नित्य नाही.

      मंडाले पर्वतावरील बुद्धाचे मंदीर मी पाहावयास गेलो.   मंदीर बघण्यासाठी मी १,०८० पायऱ्या चढलो.   अर्थात् मनाचा निश्चय म्हणून.   एरव्ही मला चढायला त्रास होतो.   या मंदिरात बुद्धाची १४ फूट उंचीची उभी मूर्ती आहे.   ही संपूर्ण सोन्याची बनविलेली आहे.   तेथेच उंच ठिकाणी एक पागोडा बांधला आहे.   त्यात जवळ जवळ अर्धा कोटी रुपयांचे सोने आहे.   सकाळी ते रात्री ११ वाजेपर्यंत लोक प्रार्थनेला येतात व जातात.   रात्री ११ नंतर तेथे कोणी बसत नाही.   मूर्तीला जवळ जवळ ६०० वर्षे झालीत.   पण कोणीही गुंजभर सोने चोरलेले नाही.   पण आमचे इकडे देवीचे दागिने ब्राह्मण पुजारीच चोरून नेतो.  (हंशा)

      तेथील लोक खोटे बोलत नाहीत.   चोरी करीत नाहीत.   कारण बुद्ध धर्माची शिकवणच तशी आहे.   

      येथे जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत महारवाडा, मांगवाडा हे राहाणारच.   या धर्माची नीतीच  अशी आहे.  झुणकाभाकरीसारखा कार्यक्रम धर्म व रूढी यात बदल करू शकत नाहीत.   समाजसुधारणेचे घोंगडे पांघरणारे ब्राह्मण, धर्ममार्तंड जोपर्यंत येथे आहेत तोपर्यंत हे असंच चालणार.   झुणकाभाकर, सत्यनारायण करणाऱ्यांनीही बुद्ध धर्मात यावे, असे माझे सांगणे आहे.   

      एकदा बुद्धाला विशाखा नावाच्या शिष्याने प्रश्न विचारला की  ' धर्म म्हणजे काय ? '   " मलीन मनाला साफ करणे हाच धर्म होय " असे उत्तर मिळाले.   अस्पृश्यता काही रस्त्यात पडलेला धोंडा नाही, की समाजसुधारकांना बाजूला फेकून देता येईल.   जेव्हा आपला मनोधर्म बदलेल तेव्हाच धर्म बदलेल.

जगात प्रथम धर्माची आवश्यकता खालच्या लोकांना वाटू लागली.   रोमन, इटालियन साम्राज्यात ख्रिस्ती धर्म प्रथम गरीबांनीच स्वीकारला.   

      ह्या देशाची संस्कृती एकस्वरूप आहे.   असा विद्वानांचा दावा आहे पण त्यांचा इतिहास खोटा आहे.   येथे संस्कृतीचे दोन प्रवाह सुरू आहेत.   एक ब्राह्मणी धर्म व दुसरा बौद्ध धर्म.   ब्राह्मणी धर्माचं घाण पाणी बुद्ध धर्माच्या स्वच्छ पाण्यात एक झालं.   हिंदू धर्माच्या घाण पाण्याला नाली काढून स्वच्छ पाणी बाजूला काढू या.

       कृष्णाने गीतेत काय सांगितले आहे ?   मारा, हत्या करा.   गरीबांच्या उद्धाराबद्दल काही सांगितले आहे ?   तिचा काही उपयोग नाही.   मी गीतेवर लिहिणार आहे.

      मी या धर्माची माहिती मिळवण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे.   हा धर्म कसा खालावला याची कारणमीमांसा मी लिहित असलेल्या पुस्तकात करणार आहे.   धर्मांतरासाठी घाई करणार नाही.   आताच तुम्हाला मेंढरासारखा घेऊन जाणार नाही.   त्यासाठी मी एक पुस्तक लिहितोय.

      बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमानुसार वागायला पाहिजे.   तरवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे पाचच अनुयायी जरी मिळाले तरी पुष्कळ झाले !

      नंतर श्री. संत गाडगे महाराज व इतरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्यावर सभा विसर्जित झाली.
 ◆◆◆
संदर्भ : *डॉ. बाबासाहेब आंबेडकर 😗
           लेखन आणि भाषणे
           खंड_१८, भाग_३
क्रमांक : ३३० (पृष्ठ क्र. ४२५)
तारीख : १४ जानेवारी १९५५

_स्मृती जाळली,आता मनु प्रवृत्ती जाळणं हे आधुनिक समतामुल्य समाज निर्मितीसाठी काळाची गरज आहे..

*_स्मृती जाळली,आता मनु प्रवृत्ती जाळणं हे आधुनिक समतामुल्य समाज निर्मितीसाठी काळाची गरज आहे..!_*
                        
मनुस्मृती हा मनु नावाच्या भट ऋषीने लिहीलेला ग्रंथ होता? काय होते यात?
यात समाजाचे चार वर्ण होते म्हणजे वर्ण व्यवस्था होती.चार वर्णात स्री ही शुद्र म्हणुनच गणली जात होती स्रीयांवर असंख्य बंधने होती फक्त स्रियांवरच नाही तर समाजातील सर्वच लोकांनी त्या प्रमाणे वागायचे. ब्राम्हणा ना वेगळा न्याय,क्षत्रियांना वेगळा, शुद्रांना वेगळा असे वेगवेगळे नियम त्यात होते व ते अन्यायकारक होते महिला माहिती नसल्यामुळे हे सर्व  महिलांना माहीत व्हावे म्हणुन लिहीत आहे मनुस्मृतीत महिलांनी बालपणी तरुणपणी,किंवा म्हातारपणी सुध्दा कुठलेच काम स्वतंत्र पध्दतीने करु नये.महिलांनी बाल्य अवस्थेत पित्याच्या तरुणपणी नवऱ्याच्या व नवरा मेल्यानतंर मुलाच्या ताब्यात रहायचे.स्वंतत्र रहाण्याची ईच्छा ती करु शकत नव्हती.पती कितीही नालायक असला तरी त्याला देवच मानायचे.नवरा मेल्यावरही पुनर्विवाहा चा विचार करायचा नाही.असली बंधने पुरुषाला नव्हती. पुरुषांना दुसऱ्या विवाहाची परवानगी होती पण महिलेला नव्हती मनु म्हणतो पुरुषांना दोष देण्याचा स्रियांचा स्वभावधर्मच आहे.स्रियांच्या अंगी दुर्गुण असतात त्या विद्वान किंवा मुर्ख माणसाला वाम मार्गाला लावु शकतात.असले गलिच्छ आरोप या मनुने स्रियांवर लावले व त्या मनुस्मृतीच्या आधारे स्रियांना जोखडुन ठेवले. स्रीला स्वातंत्र नव्हते...

               आता मला शुद्र हा शब्द लिहावासा वाटत नाही तरीही लिहीत आहे कारण ते शब्द आमच्या डिक्शनरीत आता नाहीत.आणि अशी ही मनुस्मृती बाबासाहेबांनी २५ डिसेंबर ला जाळली म्हणुन तो दिवस महिला मुक्ती दिन म्हणुन पाळला जातो.

         डॉ.बाबासाहेबांने मनुस्मृती का जाळली.कारण ज्या धर्मग्रंथाने छत्रपती शिवराय महाराजांचा राज्यभिषेक नाकार ला ज्या मनुस्मृतीने महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच मनुस्मृतीचे दहन  रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी केले.मनामनात क्रांतीची ज्योत शिवरायांनी चेतवली रायगडाच्या पायी भिमरायानं मनुस्मृती पेटवली.ज्या मनुस्मृतीने सर्वसामान्यांना जनावरां सारखे वागवले चातुर्वर्ण व वर्ग व्यवस्था जोपासत जाती भेद मोठ्या प्रमाणात वाढवला व पोसला.इतकेच काय तर ज्या छत्रपती शिवरायांनी अठरापगड समाजाला एकत्र करुन रयतेच्या स्वप्नातील शिव  स्वराज्य स्थापन केले.
अशा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेका ला वैदिक ब्राम्हणांनी मनुस्मृतीच्या सहाय्याने विरोध करुन छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याच अपमानाचा बदला  डॉ बाबासाहेब आंबेडकरानी प्रथमतः रायगडावर जाऊन शिव समाधीस अभिवादन करुन शिवाजी महाराज की जय,शाहु महाराज की जय अशा घोषणा देऊन नंतर रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे जाहीर रित्या मनुस्मृती हा वैदिक ग्रंथ जाळुन मनुवाद्यांच्या काळजाचा थरकाप उडवला.धर्म अंधश्रध्दा व कर्मकांडात गुंतवून मराठा बहुजनांना मानसिक व सामाजिक गुलामगिरीत अडकून ठेवणाऱ्या कधी काळी धर्म भेद जातभेद न मानता एकसंघपणे राहणाऱ्या मानवसमूहा मध्ये भेदाभेद करून जातीव्यवस्था निर्माणकरणाऱ्या सर्व स्त्री जातीला शूद्र मानणाऱ्या,ज्या मनूस्मृतीने संभाजी राजांना हालहाल करून मारले,ज्या मनूस्मृतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबांना शूद्र म्हणून हिनवले.ज्या मनूस्मृतीने बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून वर्गाबाहेर बसवले.
मनूस्मृती मानसिक गुलामी लादणाऱ्या व गुलामगिरी करणाऱ्यात आजही जिवंत आहे.समाज हितासाठी मराठा बहुजनांच्या सर्वांगीणप्रगतीसाठी तिला जाळलेच पाहिजे...

 अरे बघा त्या जळलेल्या मनुस्मृतीच्या राखेतून,
पुन्हा डोकावतोय मनू
त्याला वेळीच ठेचला पाहिजे..

बाबासाहेबांनी पेटवलेली क्रांतीची मशाल,
विझू देऊ नका बंधू-भगिनीनों..

पुन्हा एकदा लावावीच 
मनुच्या बुडाखाली आग

 मनुस्म्रुती  मानवतेला कलंक होती तीचे सार्वजनिकपणे दहन करुन ईथल्या गुलांमांची गुलामी मोडीत ज्यांनी काढली त्या महामानव विश्वरत्न  क्रांतीसुर्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..।

२५ डिसेंबर मनुस्मुर्ती दहन दिवस


"पत्नी पतीच्या मालकीची वस्तू असते.
--- मनुस्मृती अध्याय 5,
    श्लोक 152
.........................................
"पती पत्नीचा मालक नाही.
--- भारतीय संविधान

बाबासाहेब आंबेडकरांनी
स्त्रियांना गुलाम करणाऱ्या
मनुस्मृती या धर्मग्रंथाचे
दहन रायगडच्या
पायथ्याशी करून 
' स्त्रियांना 'माणूस म्हणून
व्यक्तीं म्हणून सन्मानित केले.
तो आजचा शुभ दिवस.

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायला हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे"

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत."

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत.

आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत.

मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत त्यापैकी काही.

बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8]

" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11]

" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155]

" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [5/162]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166]

"पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168]

" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही." [ 6/3]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात." [9/18]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते."[9/46]

-प्रा.हरी नरके

Friday, 24 December 2021

टायटॅनिक

#टायटॅनिक♥️

लिओनार्दो डि-कॅप्रियो आणि केट विंस्लेट अर्थातच कित्येक वर्षापूर्वी टायटॅनिक पाहिल्यावर या दोघांच्या अक्षरशः प्रेमात पडलो होतो आणि माझ्यासारखे कित्येक. हा मुव्ही खूप वेळा पाहिलाय पण त्यातल्या रोमँटिक कॅरेक्टरपेक्षा जॅक चित्रकार म्हणून जास्त भावतो काय माहीती मला कदाचित चित्रकार लोकांबद्दल, त्यांच्या कलेबद्दल आधीपासूनच जास्त आकर्षण आहे म्हणून असेल. खऱ्या आयुष्यात एखाद पात्र जगायची संधी मिळाली असती, जर ते कल्पनेत शक्य असत तर जॅक म्हणून जगायला आवडलं असत. केटबद्दल सांगायच तर कित्येक वर्षांनी अवाढव्य श्रीमंतीतून बाहेर पडून तिच्या मनासारखं मिळालेल मोकळ आयुष्य जगतानाची ती पाहताना कमालीची निरागस भासलीये जणू काही जॅक नावाच्या राजपुत्राने राक्षसांच्या कैदेतून बाटलीबंद केटला कायमसाठी मुक्त केलय.

ज्या स्वैर आणि बिंधास्त पध्दतीने ते चित्रपटात जगलेत, जी एनर्जी आहे ती कमाल. एक टपोरी आयुष्य स्वतःच्या मश्गुलतेत जगणाऱ्या जॅकला जगातील सर्वात मोठ्या जहाजावर जहाजवारी करण्याची संधी मिळते आणि योगायोगाने त्याची गाठ होते रोझशी. आपल्या गर्भश्रीमंतीला, वरवरच्या बेगडी आयुष्याला कंटाळलेली, रोझ आत्महत्या करायला जाताना जॅकच तिला वाचवणं आणि त्याच्या साधेपणाची तिला भुरळ पडून दोघांची कहाणी वळणावळणाने पुढे सरकत जाते आणि त्याचा शेवट मात्र करुण होतो.

एका सीनमध्ये दोघे झिंग येऊन जे बेभानपणे नाचतात ते डोळ्यांच पारणं फेडणार आहे. तेव्हा तिच्या आयुष्याच्या सोफिस्टीकेटेड शृंखला अचानक गळून पडतात, बुटांच्या टॅपिंगवर सुरू झालेला जॅकचा डान्स पाहून रोझ ही काहीतरी नवीन गवसल्याच्या अविर्भावात तिचे सँडल उतरून फेकू देते. ब्लॅक गाऊन, सोनेरी कुरळे केस आणि तीच जॅकच्या हातात हात घालून कसलीच भीडभाड न ठेवता जस मुक्त झालेल्या पक्ष्याप्रमाणे जॅकसोबत डान्स करणं जस काय हा एक क्षण जगण्यासाठीच ती जिवंत असते एवढा क्लासिक सिन आहे तो. एकामागे एक गिरकी घेताना मनमुराद हसणारी रोझ अतिशय सुंदर दिसतीये. जॅकला भेटल्यावर ती प्रथमच एवढं भरभरून आयुष्य जगलीये हे क्षणोक्षणी जाणवत. एखाद्या अंध व्यक्तीला पहिल्यांदा कुतूहलमिश्रित जग दिसत तेच भाव तेव्हा केटच्या चेहऱ्यावर आहेत.

कधी श्रीमंतीची झालर ही नसलेला जॅक जेव्हा फर्स्ट क्लासमध्ये त्यांच्या आग्रहावरून सुटमध्ये जेवायला येतो तेव्हा त्याच्या वागण्यातला उच्चभ्रूपणा शॅम्पेनच्या एक एक घोटागणिक झळकत असतो. त्याच्या बोलण्यातून जणू आव्हान देत सांगत असतो "Dont worry, i am perfect for her". तेव्हा रोझ तीच्या कुटुंबाच्या धाकात असल्याने जास्त बोलू शकत नाही पण त्या मौन भावना ही जॅक समजून घेतो.

कुमारवय सरून नुकताच तरुणपणात पदार्पण करणारा जॅक कधी फार उत्कट तर कधी प्रचंड हळवा होतो. चोरून, लपूनछपून प्रेम करताना ते जग विसरतात जस काय ते जगाच काहीच देणं लागत नाही. ते अनोख थ्रिल अनुभवण्यासाठी दोघे जहाजातल्या कोणत्याही भागात जायला तयार होतात. त्या वयात रिस्क वगरे शब्द फिके पडतात, कृती होते फक्त अनुभवण्याची, एकमेकांत सामावण्याची आणि त्या उत्कट भावनेत बेभान होऊन मनसोक्त न्हाहून निघण्याची. आयुष्यभर सोबत साथ देण्याच्या आणाभाका त्यांच दोघांच कोवळ नि निरागस वय दर्शवतात. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची जॅक-रोझची तगमग, रोझसाठी जगाशी विद्रोह करून भिडणार जॅकच सळसळत रक्त कुठेतरी चेहऱ्यावर निरागस भाव ही सोडून जातं. इकडच जग तिकडे झालं तरी तुझी साथ सोडणार नाही ही विश्वासार्हता कधीकधी दारुण पराभवाची सुरवात वाटत असली तरी प्रेक्षक म्हणून everything will be alright असच भासत राहत. या सर्वात रोझला आपल्या सोकॉल्ड प्रियकराशी प्रतारणा करण्यात कसलीच खंत नाही वाटत कारण प्रेमाच्या नावाखाली खोट स्टेटस जपण्यात धन्यता मानणारे लोकं यांचा तिला प्रचंड तिटकारा असतो जो की जॅक भेटल्यावर बाहेर येतो तो तिच्या प्रत्येक कृतीतून बोलका होताना दिसतो.

रोझच्या न्यूड पेंटींगवेळी जेव्हा त्या रूमच्या मंद लाईट्सच्या एकांतात रोझची एन्ट्री होते तेव्हा जॅक पेन्सिलला टोकच करत असतो, तिला पाहताक्षणी जॅकच्या चेहऱ्यावरचे भाव अर्थातच लाजरे होतात, तो गडबडतो आणि जेव्हा तिच्या अंगावरचा काळा गाऊन निखळून हळूच खाली पडतो, तिचा आरस्पानी देह समोर आल्यावर जॅकच्या अभिनयातली नजाकतता कमालीची नाजूक झालीये. काही सेकंदासाठी त्याच्या श्वासांची लय जरी बिघडली असेल, हालचालीमध्ये अस्वस्थपणा आला असेल पण त्याच्या डोळ्यात मात्र वासनेचा यत्किंचित ही लवलेश नसलेला जॅक तिथे मात्र सच्चा प्रोफेशनल कलाकारच दाखवलाय जो की तिथे फक्त समोर ऑब्जेक्ट आहे आणि त्याला कागदावर उतरवायच आहे हेच त्याला ठाऊक असत. काही क्षण तिला न्याहाळत तो स्तब्ध जरूर होतो, पण ते पाहण म्हणजे नजरेने तिच्या विविध वळणांची नजरेने मापं घेणं असतं. स्केच काढताना तिला स्पर्श ही न करता फक्त हातवारे करतच जॅक पोज समजाऊन सांगत असतो. तितक्या मर्यादेच पालन करताना खऱ्या हिरोके माफिक जेंटलेमनच वाटतो.
चित्र काढताना जॅकपेक्षा पोज घेतलेली रोझ जास्त कम्फर्टेबल असते. कदाचीत तिला हा विश्वासच असतो जॅक प्रति की या पेंटिंग साठी स्वखुशीने रोझ राजी झालेली असते. तेव्हा दोघांच्या ही नजरा लॉक होतात आणि त्या ही धुंद वातावरणात ,परिस्थितीत त्याचे हात सफाईदारपणे कागदावर फिरत असतात. चित्रपटातले ते काही मिनिट्स मात्र मंत्रमुग्ध करणारे आहेत की खरच संपूच नये वाटत एवढा सुंदर चित्रित झालाय तो सिन. चित्रपट बघताना त्या वातावरणाचा भारावलेपणा प्रेक्षक म्हणून आपल्या ही मनावर जाणवू लागतो.

शेवटी मात्र व्हायोलीनवर My heart will go on ची हृदयद्रावक धून चालू असताना, सगळ्या कोलाहलात ही त्याच तिला जिवंत ठेवण्यासाठीचा आटापिटा, अट्टहास त्याची असहायता नाही दाखवत पण शेवटच्या श्वासापर्यंत त्याच लढण मात्र दाखवत.

वैयक्तिक मला चित्रपटाच्या शेवटी त्याच मरण वेदना नाही देत कारण त्या दोन अडीच तासात त्याने आपल्याला प्रेक्षक म्हणून इतकं भरभरून दिलेलं असत की तो शेवट अपूर्ण नाही वाटत. स्वतःच सर्वस्व पणाला लावून, सगळं मातीमोल आहे हे माहीत असूनही जी काही प्रेमाची निरपेक्ष उधळण दोघांनी केलीये त्यामुळे कसलतरी गारुड होऊन जातं मनावर. रोझ त्याला फक्त शरीराने गमावते पण तिच्यात जॅकमुळे झालेला अंतर्बाह्य चेंज यामुळे जॅक तिच्या मनात अमर होतो.

रोझ सारखे कित्येक पात्र आपल्या आयुष्यात आजुबाजुला पाहायला मिळतात. उडण्यासाठी पंख असूनही समाज, कुटुंबव्यवस्था यांनी घालून दिलेल्या पिंजऱ्यात अडकून पडावं लागत.

याच कारणासाठी रोझ जास्त भावते कारण उशिरा का होईना जॅकमुळे तीच्या स्वातंत्र्याची किंमत तिला कळते, त्या वेळच्या कुटुंब संस्थेविरोधात बंड पुकारून खऱ्या अर्थाने ती कचकड्याचा सोनेरी पिंजरा तोडते आणि थोडया काळासाठी का होईना मुक्त पक्षी म्हणून मनसोक्त बागडते. हा चेंज स्वीकारून अंमलात आणण तेवढं ही सोपं नव्हतं.

आज ही जहाजाच्या टोकावर उभं राहून i am flying पोज शिवाय कपल्स फोटोग्राफी अधुरी वाटते. केट विंस्लेट आणि लिओनार्दो डि-कॅप्रियो यांनी शेकडो चित्रपट केले तरी हे दोघे म्हटले की टायटॅनिकच हीच फ्रेम आहे अजूनही डोळ्यासमोर. बेभान आणि वाऱ्यागत सैरावरा केलेलं प्रेम म्हणजे टायटॅनिक. स्वतःला मधला स्व विसरून, परीणामांची तमा न बाळगता प्रेम करणं म्हणजे जॅक अँड रोझ. दोन पातळीच्या समाजात असणारी श्रीमंत आणि गरीबीची असणारी दरी आणि त्या अनुषंगाने फुलत जाणारी हृदयस्पर्शी गोड कथा म्हणजे टायटॅनिक.

पूर्ण चित्रपट संपल्यावर रोझ अलगद जिना उतरून जॅकसाठी खाली येते आणि वाटत,
"सारी कायनात ने आप को मिलाने को लाख कोशीशे की है" तेव्हाचा तो कल्पनेतला हॅप्पी एंडिंगचा सिन अजूनही जॅकच्या जाण्याच दुःख जाणवू देत नाही की रोझ एकटी पडल्याच शल्य ही बोचत नाही. टायटॅनिक ही कलाकृती किती ही वेळा पाहिली तरी मन भरत नाही. कित्येक परिस्थितीमुळे एक होऊ न शकणाऱ्या प्रेमींना टायटॅनिक त्यांचं स्वतःच दर्पण वाटतो. जस पहिल प्रेम चिरतरुण आहे तसच टायटॅनिक आमच्या मनात अमर आहे कधी ही न पुसण्यासाठी. थँक्स जेम्स कॅमेरून की ज्यांनी एवढी सुंदर कलाकृती देण्यासाठी जी की शतको नि शतकं रसीकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही.

© प्रशांत

All Articles of Indian Constitutionअनुच्छेद (Articles) नम्बर व नाम

All Articles of Indian Constitution
अनुच्छेद (Articles) नम्बर व नाम

अनुच्छेद (Article) 1 - संघ का नाम और राज्य क्षेत्र
अनुच्छेद (Article) 2 - नए राज्यों का प्रवेश या स्थापना
अनुच्छेद (Article) 3 - राज्य का निर्माण तथा सीमाओं या नामों मे परिवर्तन
अनुच्छेद (Article) 4 - पहली अनुसूचित व चौथी अनुसूची के संशोधन तथा दो और तीन के अधीन बनाई गई विधियां
अनुच्छेद (Article) 5 - संविधान के प्रारंभ पर नागरिकता
अनुच्छेद (Article) 6 - पाकिस्तान से भारत आने वाले कुछ व्यक्तियों के नागरिकता के अधिकार
अनुच्छेद (Article) 7 - भारत से पाकिस्तान जाने वालों को कुछ व्यक्तियों के नागरिकता के अधिकार
अनुच्छेद (Article) 8 - भारत के बाहर रहने वाले व्यक्तियों के नागरिकता के अधिकार
अनुच्छेद (Article) 9 - विदेशी राज्य की नागरिकता स्वेच्छा से लेने पर भारत का नागरिक ना होना
अनुच्छेद (Article) 10 - नागरिकता के अधिकारों का बना रहना
अनुच्छेद (Article) 11 - संसद द्वारा नागरिकता के लिए कानून का विनियमन किया जाना
अनुच्छेद (Article) 12 - राज्य की परिभाषा
अनुच्छेद (Article) 13 - मूल अधिकारों को असंगत या अल्पीकरण करने वाली विधियां
अनुच्छेद (Article) 14 - विधि के समक्ष समानता
अनुच्छेद (Article) 15 - धर्म जाति लिंग मूलवंश या जन्मस्थान के आधार पर भेद का प्रतिषेध
अनुच्छेद (Article) 16 - लोक नियोजन में अवसर की समानता
अनुच्छेद (Article) 17 - अस्पृश्यता का अंत
अनुच्छेद (Article) 18 - उपाधियों का अंत
अनुच्छेद (Article) 19 - वाक् की स्वतंत्रता
अनुच्छेद (Article) 20 - अपराधों के दोष सिद्धि के संबंध में संरक्षण

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 21 - प्राण और दैहिक स्वतंत्रता का संरक्षण
अनुच्छेद (Article) 21 क - 6 से 14 वर्ष के बच्चों को शिक्षा का अधिकार
अनुच्छेद (Article) 22 - कुछ दशाओं में गिरफ्तारी से सरंक्षण
अनुच्छेद (Article) 23 - मानव के दुर्व्यापार और बाल आश्रम
अनुच्छेद (Article) 24 - कारखानों में बालक का नियोजन का प्रतिषेध
अनुच्छेद (Article) 25 - अंतःकरण की और धर्म का आचरण और प्रचार की स्वतंत्रता
अनुच्छेद (Article) 26 - धार्मिक कार्यों के प्रबंध की स्वतंत्रता
अनुच्छेद (Article) 29 - अल्पसंख्यक वर्गों के हितों का संरक्षण
अनुच्छेद (Article) 30 - शिक्षा संस्थाओं की स्थापना और प्रशासन करने का अल्पसंख्यक वर्गों का अधिकार
अनुच्छेद (Article) 31 - सम्पत्ति के अधिकार (44वें संविधान संशोधन द्वारा हटा दिया गया।)
अनुच्छेद (Article) 32 - अधिकारों को प्रवर्तित कराने के लिए उपचार
अनुच्छेद (Article) 36 - राज्य की परिभाषा
अनुच्छेद (Article) 38 - राज्य लोक कल्याण की अभिवृद्धि के लिए सामाजिक व्यवस्था बनायेगा
अनुच्छेद (Article) 39 - पुरुष और स्त्री दोनों को समान कार्य के लिए समान वेतन
अनुच्छेद (Article) 39 क - समान न्याय और निशुल्क विधिक सहायता
अनुच्छेद (Article) 40 - ग्राम पंचायतों का संगठन

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 41 - काम शिक्षा और लोक सहायता पाने का अधिकार
अनुच्छेद (Article) 43 - कर्म कारों के लिए निर्वाह मजदूरी का प्रयास
अनुच्छेद (Article) 43 क - उद्योगों के प्रबंध में कर्मकारो का भाग लेना
अनुच्छेद (Article) 44 - नागरिकों के लिए एक समान सिविल संहिता
अनुच्छेद (Article) 45 - राज्य 6 वर्ष से कम आयु के बालकों के लिए प्रारंभिक बाल्यावस्था देखरेख और शिक्षा का उपबंध
अनुच्छेद (Article) 48 - कृषि और पशुपालन संगठन
अनुच्छेद (Article) 48क - पर्यावरण वन तथा वन्य जीवों की रक्षा
अनुच्छेद (Article) 49- राष्ट्रीय स्मारक स्थानों और वस्तुओं का संरक्षण
अनुच्छेद (Article) 50 - कार्यपालिका से न्यायपालिका का प्रथक्करण
अनुच्छेद (Article) 51 - अंतर्राष्ट्रीय शांति और सुरक्षा
अनुच्छेद (Article) 51क - मूल कर्तव्य
अनुच्छेद (Article) 52 - भारत का राष्ट्रपति
अनुच्छेद (Article) 53 - संघ की कार्यपालिका शक्ति
अनुच्छेद (Article) 54 - राष्ट्रपति का निर्वाचन
अनुच्छेद (Article) 55 - राष्ट्रपति के निर्वाचन की रीती
अनुच्छेद (Article) 56 - राष्ट्रपति की पदावधि
अनुच्छेद (Article) 57 - पुनर्निर्वाचन के लिए पात्रता
अनुच्छेद (Article) 58 - राष्ट्रपति निर्वाचित होने के लिए आहर्ताए
अनुच्छेद (Article) 59 - राष्ट्रपति पद के लिए शर्ते
अनुच्छेद (Article) 60 - राष्ट्रपति की शपथ

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 61 - राष्ट्रपति पर महाभियोग चलाने की प्रक्रिया
अनुच्छेद (Article) 62 - राष्ट्रपति पद पर व्यक्ति को भरने के लिए निर्वाचन का समय और रीतियां
अनुच्छेद (Article) 63 - भारत का उपराष्ट्रपति
अनुच्छेद (Article) 64 - उपराष्ट्रपति का राज्यसभा का पदेन सभापति होना
अनुच्छेद (Article) 65 - राष्ट्रपति के पद की रिक्त पर उप राष्ट्रपति के कार्य
अनुच्छेद (Article) 66 - उप-राष्ट्रपति का निर्वाचन
अनुच्छेद (Article) 67 - उपराष्ट्रपति की पदावधि
अनुच्छेद (Article) 68 - उप राष्ट्रपति के पद की रिक्त पद भरने के लिए निर्वाचन
अनुच्छेद (Article) 69 - उप राष्ट्रपति द्वारा शपथ
अनुच्छेद (Article) 70 - अन्य आकस्मिकता में राष्ट्रपति के कर्तव्यों का निर्वहन
अनुच्छेद (Article) 71. - राष्ट्रपति और उपराष्ट्रपति के निर्वाचन संबंधित विषय
अनुच्छेद (Article) 72 - क्षमादान की शक्ति
अनुच्छेद (Article) 73 - संघ की कार्यपालिका शक्ति का विस्तार
अनुच्छेद (Article) 74 - राष्ट्रपति को सलाह देने के लिए मंत्रिपरिषद
अनुच्छेद (Article) 75 - मंत्रियों के बारे में उपबंध
अनुच्छेद (Article) 76 - भारत का महान्यायवादी
अनुच्छेद (Article) 77 - भारत सरकार के कार्य का संचालन
अनुच्छेद (Article) 78 - राष्ट्रपति को जानकारी देने के प्रधानमंत्री के कर्तव्य
अनुच्छेद (Article) 79 - संसद का गठन
अनुच्छेद (Article) 80 - राज्य सभा की सरंचना

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 81 - लोकसभा की संरचना
अनुच्छेद (Article) 83 - संसद के सदनो की अवधि
अनुच्छेद (Article) 84 - संसद के सदस्यों के लिए अहर्ता
अनुच्छेद (Article) 85 - संसद का सत्र सत्रावसान और विघटन
अनुच्छेद (Article) 87 - राष्ट्रपति का विशेष अभिभाषण
अनुच्छेद (Article) 88 - सदनों के बारे में मंत्रियों और महानयायवादी अधिकार
अनुच्छेद (Article) 89 - राज्यसभा का सभापति और उपसभापति
अनुच्छेद (Article) 90 - उपसभापति का पद रिक्त होना या पद हटाया जाना
अनुच्छेद (Article) 91 - सभापति के कर्तव्यों का पालन और शक्ति
अनुच्छेद (Article) 92 - सभापति या उपसभापति को पद से हटाने का संकल्प विचाराधीन हो तब उसका पीठासीन ना होना
अनुच्छेद (Article) 93 - लोकसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
अनुच्छेद (Article) 94 - अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना
अनुच्छेद (Article) 95 - अध्यक्ष में कर्तव्य एवं शक्तियां
अनुच्छेद (Article) 96 - अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का संकल्प हो तब उसका पीठासीन ना होना
अनुच्छेद (Article) 97 - सभापति उपसभापति तथा अध्यक्ष,उपाध्यक्ष के वेतन और भत्ते
अनुच्छेद (Article) 98 - संसद का सविचालय
अनुच्छेद (Article) 99 - सदस्य द्वारा शपथ या प्रतिज्ञान
अनुच्छेद (Article) 100 - संसाधनों में मतदान रिक्तियां के होते हुए भी सदनों के कार्य करने की शक्ति और गणपूर्ति

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 101 - स्थानों का रिक्त होना
अनुच्छेद (Article) 102 - सदस्यता के लिए निर्योग्यताएं
अनुच्छेद (Article) 106 - सदस्यों के वेतन भत्ते
अनुच्छेद (Article) 108 - कुछ दशाओं में दोनों सदनों की संयुक्त बैठक
अनुच्छेद (Article) 109 - धन विधेयक के संबंध में विशेष प्रक्रिया
अनुच्छेद (Article) 110 - धन विधायक की परिभाषा
अनुच्छेद (Article) 111 - राष्ट्रपति की विधेयकों पर अनुमति
अनुच्छेद (Article) 112 - वार्षिक वित्तीय विवरण
अनुच्छेद (Article) 114 - विनियोग विधेयक
अनुच्छेद (Article) 115 - अनुपूरक अतिरिक्त या अधिक अनुदान
अनुच्छेद (Article) 116 - लेखानुदान प्रत्ययानुदान व अपवादानुदान
अनुच्छेद (Article) 117 - वित्त विधेयकों के बारे में विशेष उपबंध
अनुच्छेद (Article) 118 - प्रक्रिया के नियम
अनुच्छेद (Article) 120 - संसद में प्रयोग की जाने वाली भाषा

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 122 - न्यायालय द्वारा संसदीय कार्यवाही की जांच नहीं किया जाना
अनुच्छेद (Article) 123 - संसद विश्रांति काल में राष्ट्रपति की अध्यादेश शक्ति
अनुच्छेद (Article) 124 - उच्चतम न्यायालय की स्थापना और गठन
अनुच्छेद (Article) 124 (1) - भारत का एक उच्चतम न्यायालय होगा
अनुच्छेद (Article) 124 (2) - राष्ट्रपति उच्चतम न्यायालय के प्रत्येक न्यायाधीश की नियुक्ति करेगा
अनुच्छेद (Article) 124 (3) - न्यायाधीशों की योग्यताएं
अनुच्छेद (Article) 124 (6) - शपथ प्रतिज्ञान
अनुच्छेद (Article) 124 (क 1) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ति आयोग
अनुच्छेद (Article) 125 - न्यायाधीशों का वेतन
अनुच्छेद (Article) 126 - कार्यकारी मुख्य न्याय मूर्ति की नियुक्ति
अनुच्छेद (Article) 127 - तदर्थ न्यायमूर्तियों की नियुक्ति
अनुच्छेद (Article) 128 - सेवानिवृत्त न्यायाधीशों की उपस्थिति
अनुच्छेद (Article) 129 - उच्चतम न्यायालय का अभिलेख नयायालय होना
अनुच्छेद (Article) 130 - उच्चतम न्यायालय का स्थान
अनुच्छेद (Article) 131 - उच्चतम न्यायालय की आरंभिक अधिकारिता
अनुच्छेद (Article) 137 - निर्णय एवं आदेशों का पुनर्विलोकन

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 143 - उच्चतम न्यायालय से परामर्श करने की राष्ट्रपति की शक्ति
अनुच्छेद (Article)144 - सिविल एवं न्यायिक पदाधिकारियों द्वारा उच्चतम न्यायालय की सहायता
अनुच्छेद (Article) 148 - भारत का नियंत्रक महालेखा परीक्षक
अनुच्छेद (Article) 149 - नियंत्रक महालेखा परीक्षक के कर्तव्य शक्तिया
अनुच्छेद (Article) 150 - संघ के राज्यों के लेखन का प्रारूप
अनुच्छेद (Article) 153 - राज्यों के राज्यपाल
अनुच्छेद (Article) 154 - राज्य की कार्यपालिका शक्ति
अनुच्छेद (Article) 155 - राज्यपाल की नियुक्ति
अनुच्छेद (Article) 156 - राज्यपाल की पदावधि
अनुच्छेद (Article) 157 - राज्यपाल नियुक्त होने की अर्हताएँ
अनुच्छेद (Article) 158 - राज्यपाल के पद के लिए शर्तें
अनुच्छेद (Article) 159 - राज्यपाल द्वारा शपथ या प्रतिज्ञान

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 163 - राज्यपाल को सलाह देने के लिए मंत्री परिषद
अनुच्छेद (Article) 164 - मंत्रियों के बारे में अन्य उपबंध
अनुच्छेद (Article) 165 - राज्य का महाधिवक्ता
अनुच्छेद (Article) 166 - राज्य सरकार का संचालन
अनुच्छेद (Article) 167 - राज्यपाल को जानकारी देने के संबंध में मुख्यमंत्री के कर्तव्य
अनुच्छेद (Article) 168 - राज्य के विधान मंडल का गठन
अनुच्छेद (Article) 170 - विधानसभाओं की संरचना
अनुच्छेद (Article) 171 - विधान परिषद की संरचना
अनुच्छेद (Article) 172 - राज्यों के विधानमंडल की अवधि
अनुच्छेद (Article) 173 - राज्यों के विधानमंडल की सदस्यता के लिए योग्यताएं
अनुच्छेद (Article) 174 - राज्यों के विधानमंडल की सत्र सत्रावसान एवं विघटन
अनुच्छेद (Article) 176 - राज्यपाल का विशेष अभिभाषण
अनुच्छेद (Article) 177 - सदनों के बारे में मंत्रियों और महाधिवक्ता के अधिकार
अनुच्छेद (Article) 178 - विधानसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
अनुच्छेद (Article) 179 - अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना या पद से हटाया जाना
अनुच्छेद (Article) 180 - अध्यक्ष के पदों के कार्य व शक्ति

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 181 - अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का कोई संकल्प पारित होने पर उसका पिठासिन ना होना
अनुच्छेद (Article) 182 - विधान परिषद का सभापति और उपसभापति
अनुच्छेद (Article) 183 - सभापति और उपासभापति का पद रिक्त होना पद त्याग या पद से हटाया जाना
अनुच्छेद (Article) 184 - सभापति के पद के कर्तव्यों का पालन व शक्ति
अनुच्छेद (Article) 185 - संभापति उपसभापति को पद से हटाए जाने का संकल्प विचाराधीन होने पर उसका पीठासीन ना होना
अनुच्छेद (Article) 186 - अध्यक्ष उपाध्यक्ष सभापति और उपसभापति के वेतन और भत्ते
अनुच्छेद (Article) 187 - राज्य के विधान मंडल का सचिवालय 
अनुच्छेद (Article) 188 - सदस्यों द्वारा शपथ या प्रतिज्ञान
अनुच्छेद (Article) 189 - सदनों में मतदान रिक्तियां होते हुए भी साधनों का कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
अनुच्छेद (Article) 199 - धन विदेश की परिभाषा
अनुच्छेद (Article) 200 - विधायकों पर अनुमति

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 202 - वार्षिक वित्तीय विवरण
अनुच्छेद (Article) 213 - विधानमंडल में अध्यादेश सत्यापित करने के राज्यपाल की शक्ति
अनुच्छेद (Article) 214 - राज्यों के लिए उच्च न्यायालय
अनुच्छेद (Article) 215 - उच्च न्यायालयों का अभिलेख न्यायालय होना
अनुच्छेद (Article) 216 - उच्च न्यायालय का गठन
अनुच्छेद (Article) 217 - उच्च न्यायालय न्यायाधीश की नियुक्ति पद्धति शर्तें
अनुच्छेद (Article) 219 - शपथ व प्रतिज्ञान
अनुच्छेद (Article) 221 - न्यायाधीशों का वेतन
अनुच्छेद (Article) 222 - एक न्यायालय से दूसरे न्यायालय में न्यायाधीशों का अंतरण
अनुच्छेद (Article) 223 - कार्यकारी मुख्य न्याय मूर्ति के नियुक्ति
अनुच्छेद (Article) 224 - अन्य न्यायाधीशों की नियुक्ति
अनुच्छेद (Article) 226 - कुछ रिट निकालने के लिए उच्च न्यायालय की शक्ति
अनुच्छेद (Article) 231 - दो या अधिक राज्यों के लिए एक ही उच्च न्यायालय की स्थापना
अनुच्छेद (Article) 233 - जिला न्यायाधीशों की नियुक्ति
अनुच्छेद (Article) 241 - संघ राज्य क्षेत्र के लिए उच्च-न्यायालय

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 243 - पंचायत नगर पालिकाएं एवं सहकारी समितियां
अनुच्छेद (Article) 244 - अनुसूचित क्षेत्रो व जनजाति क्षेत्रों का प्रशासन
अनुच्छेद (Article) 248 - अवशिष्ट विधाई शक्तियां
अनुच्छेद (Article) 249 - राज्य सूची के विषय के संबंध में राष्ट्रीय हित में विधि बनाने की संसद की शक्ति
अनुच्छेद (Article) 252 - दो या अधिक राज्य के लिए सहमति से विधि बनाने की संसद की शक्ति
अनुच्छेद (Article) 254 - संसद द्वारा बनाई गई विधियों और राज्यों के विधान मंडल द्वारा बनाए गए विधियों में असंगति
अनुच्छेद (Article) 256 - राज्यों की और संघ की बाध्यता
अनुच्छेद (Article) 257 - कुछ दशाओं में राज्यों पर संघ का नियंत्रण
अनुच्छेद (Article) 262 - अंतर्राज्यीय नदियों या नदी दूनों के जल संबंधी विवादों का न्याय निर्णय
अनुच्छेद (Article) 263 - अंतर्राज्यीय विकास परिषद का गठन
अनुच्छेद (Article) 266 - संचित निधि
अनुच्छेद (Article) 267 - आकस्मिकता निधि
अनुच्छेद (Article) 269 - संघ द्वारा उद्ग्रहित और संग्रहित किंतु राज्यों को सौपे जाने वाले कर
अनुच्छेद (Article) 270 - संघ द्वारा इकट्ठे किए कर संघ और राज्यों के बीच वितरित किए जाने वाले कर

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 280 - वित्त आयोग
अनुच्छेद (Article) 281 - वित्त आयोग की सिफारिशे
अनुच्छेद (Article) 292 - भारत सरकार द्वारा उधार लेना
अनुच्छेद (Article) 293 - राज्य द्वारा उधार लेना
अनुच्छेद (Article) 300 क - संपत्ति का अधिकार
अनुच्छेद (Article) 301 - व्यापार वाणिज्य और समागम की स्वतंत्रता
अनुच्छेद (Article) 309 - राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की भर्ती और सेवा की शर्तों
अनुच्छेद (Article) 310 - संघ या राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की पदावधि
अनुच्छेद (Article) 312 - अखिल भारतीय सेवाएं
अनुच्छेद (Article) 313 - संक्रमण कालीन उपबंध
अनुच्छेद (Article) 315 - संघ राज्य के लिए लोक सेवा आयोग
अनुच्छेद (Article) 316 - सदस्यों की नियुक्ति एवं पदावधि
अनुच्छेद (Article) 317 - लोक सेवा आयोग के किसी सदस्य को हटाया जाना या निलंबित किया जाना
अनुच्छेद (Article) 320 - लोकसेवा आयोग के कृत्य
अनुच्छेद (Article) 323 क - प्रशासनिक अधिकरण
अनुच्छेद (Article) 323 ख - अन्य विषयों के लिए अधिकरण

md-smart-classes

अनुच्छेद (Article) 324 - निर्वाचनो के अधिक्षण निर्देशन और नियंत्रण का निर्वाचन आयोग में निहित होना
अनुच्छेद (Article) 329 - निर्वाचन संबंधी मामलों में न्यायालय के हस्तक्षेप का वर्णन
अनुच्छेद (Article) 330 - लोक सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिये स्थानो का आरणण
अनुच्छेद (Article) 331 - लोक सभा में आंग्ल भारतीय समुदाय का प्रतिनिधित्व
अनुच्छेद (Article) 332 - राज्य के विधान सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियों के लिए स्थानों का आरक्षण
अनुच्छेद (Article) 333 - राज्य की विधानसभा में आंग्ल भारतीय समुदाय का प्रतिनिधित्व
अनुच्छेद (Article) 338 - राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग
अनुच्छेद (Article) 338 (क) - राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग
अनुच्छेद (Article) 343 - संघ की परिभाषा
अनुच्छेद (Article) 344 - राजभाषा के संबंध में आयोग और संसद की समिति
अनुच्छेद (Article) 350 क - प्राथमिक स्तर पर मातृभाषा में शिक्षा की सुविधाएं
अनुच्छेद (Article) 351 - हिंदी भाषा के विकास के लिए निर्देश
अनुच्छेद (Article) 352 - आपात की उदघोषणा का प्रभाव
अनुच्छेद (Article) 356 - राज्य में संवैधानिक तंत्र के विफल हो जाने की दशा में उपबंध
अनुच्छेद (Article) 360 - वित्तीय आपात के बारे में उपबंध
अनुच्छेद (Article) 368 - सविधान का संशोधन करने की संसद की शक्ति और उसकी प्रक्रिया
अनुच्छेद (Article) 377 - भारत के नियंत्रक महालेखा परीक्षक के बारे में उपबंध
अनुच्छेद (Article) 378 - लोक सेवा आयोग के बार संकलन

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...