काल परवा आम्ही
पांढवांची घलई म्हणनून असणाऱ्या जागेला भेट दिली. हे ठिकाण खानावच्या (तालुका खालापूर)
जंगलात आहे बऱ्याच वर्ष हे ऐकून होतो पण साक्षात भेट दिली न्हवती काल परवा तो योग आला.
ठिकाण खूप उंच आणि चढायला थोडं अवघड आहे. तेथे पोहोचल्यावर मनाला मोहणारा दुष्य पाहवयास
मिळाला. घलईच्या समोर अफाट सह्याद्रीच्या पर्वतरंगा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून
देतात. सह्याद्रीच्या मनमोहक पर्वत रांगा, उंचीवरून शुद्ध आणि शितल हवा तसेच वरून खालपर्यंत
झाडांची उंची गाठाणारी शर्यत पाहवयास मिळते. खालून वरपर्यंत चढताना वाढले शरीरातील
रक्तप्रवाह वरती गेल्यावर मात्र शांत आणि शितल समुद्रसारखा होऊन जातो. वरून खाली पाहण्याचा
आनंद हा उच्च कोटींचा होता यात काही शंकाच नाही.
या जागेला पांढवांची घलई असं नवं कोणी आणि कसा
दिला याचा काही खुलासा करता आला नाही पण हे नांव बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे. तेथे
आम्हाला कोरलेलं एक नाव आणि काही कोरीव काम सापडलं. थोडं निरखून पाहिल्यावर ते नाव
मराठीत असल्याचं आढळलं. दगडावर कोरलेले मराठीतलं नाव हे एक आश्चर्य आहे या संदर्भात
आम्ही थोडी चौकशी केली असता ते नाव "नाना धोंडू पाटील" असे आढळले. आत्ता
हि व्यक्ती कोण? याचा पुन्हा खुलासा चालू झाला आणि माहित झालं की ही व्यक्ती जवळपास
85 ते 90 वर्षांपूर्वी खानाव गावात गवंडी काम करून उदार निर्वाह करायची. सदर व्यक्ती
नजदिकी ठाकुरवाडी मध्ये घर बांधण्याची कामे करायची आणि कधी काळी उशीर झालं तर या ठिकाणी
आराम करायची. ते आपल्या सोबत गवंडी कामाची लागणारी सर्व हत्यारे सोबत बाळगायचे.
या जागेचा पाच पांडवांशी काही संबंध आहे कि नाही
याचे काही ठाम पुरावे नाहीत पण आसपास ची चर्चा पाहता हे आपण नाकारू शकत नाही. सदर माहित
आम्हास खानाव रहिवाशी पाटील काका म्हणजेच घलईत कोरीव काम करणारे स्व. नाना धोंडू पाटील
यांचे पुतणे आहेत.
- यशवंत द. ओव्हाळ

No comments:
Post a Comment