Saturday, 25 December 2021

तुरुंगात असतानाही बाहेर पाठविलेल्या बऱ्याचश्या पत्रात त्यांची मुख्य मागणी ही नवनव्या पुस्तकांचीच असायची....

भारत हृदय सम्राट
.........................

तुरुंगात असतानाही बाहेर पाठविलेल्या बऱ्याचश्या पत्रात त्यांची मुख्य मागणी ही नवनव्या पुस्तकांचीच असायची....

भगत सिंहांचे मित्र जयदेव गुप्ता यांना २४ जुलै १९३० रोजी त्यांनी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे. ज्या पत्रातून त्यांचं पुस्तक प्रेम कमालीचं ठळकपणे दिसून येतं.ते छोटंसं पण महत्वाचं पत्र इथे वाचकांसाठी उपलब्ध करून देतोय. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सेंट्रल जेल
लाहोर
24 जुलै 1930

प्रिय मित्र जयदेव,
खाली लिहिलेली पुस्तकं द्वारकानाथ ग्रंथालयातून माझ्या नावावर नोंदवून घेऊन शनिवारी कुलबीरच्या हस्ते पाठवावीत. पुस्तकांची नावं अशी....

Militarism ( Karl Liebknecht )
soviet at work ( Lenin )
Left wing Communism ( Lenin )
FIELDS FACTORIES AND WORKSHOPS ( Prince Peter Alekseyevich Kropotkin )
why men fight ( B russell )
Collapse of the Second International ( Lenin )
Mutual Aid: A factor of evolution ( Alekseyevich Kropotkin )
Civil War in france ( Karl Marx )
The Spy ( Upton Sinclair )

शक्य असेल तर कृपया मला आणखी एक पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करावी.....

त्याचे नाव, historical materialism, bukharin असं आहे हे पुस्तक पंजाब लायब्ररीतून मिळेल आणि ग्रंथालयाच्या अध्यक्षांकडून माहिती करून घ्या की काही पुस्तकं बोर्स्टल तुरुंगात पाठवली आहेत काय? त्यांच्याकडे पुस्तकांचा भयंकर दुष्काळ पडला आहे. त्यांनी सुखदेवचे बंधू जयदेव यांच्याकडे एक यादी पाठवली होती.परंतू त्यांना अजून पुस्तकं मिळाली नाहीत. ग्रंथालयाकडे अशी एखादी यादी नसेल तर कृपया लाला फिरोजचंद यांच्याकडून माहिती मिळवून त्यांच्या पसंतीनुसार काही मनोरंजक पुस्तके पाठवा. या रविवारी मी जेंव्हा तिकडे पोहोचेन तोवर पुस्तकं तिकडं पोहोचायला हवीत. हे काम काहीही करून शीघ्र करून घ्यावं. याच बरोबर डार्लिंग लिखीत Peasant in Prosperity आणि याच सारखी आणखी ( शेतीच्या समस्याविषयक ) काही पुस्तकं डॉक्टर आलम यांच्यासाठी सुद्धा पाठवावीत. 

तुम्हाला हे कष्ट जास्त वाटणार नाहीत अशी अशा करतो. भविष्यकाळात तुम्हाला कधी कष्ट, त्रास देणार नाही असे वाचन देतो. सर्व मित्रांना माझी आठवण करून द्या. लज्जावतीजी यांना नमस्कार सांगा. दत्तच्या भगिनी आल्या तर त्या माझीही भेट घेतील अशी अशा करतो. 

आपला नम्र,
भगत सिंह
~~~~~~~~~~~~~~~
या त्यांच्या पत्राव्यतिरीक्त 26 एप्रिल 1929 साली वडिलांना पाठवलेल्या एका पत्रात ते "गीतारहस्य" आणि "नेपोलियनचं चरित्र" वडीलांकरवी मागवून घेताना दिसतात.  

🙏

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...