सुविचार आणि सुभाषिते

राजर्षी शाहू महाराज - नाशिक, १५ एप्रिल १९२०. उदाजी मराठा वसतिगृह कोनशिला समारंभ प्रसंगी, नाशिक

"सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे". 
-----------------------------------------------------------------------------------------------------------

-विश्वरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर.. Ref:२५-१२-१९२७ महाडचे भाषण

तुम्ही शुरवीरांची संतान आहात...ही गोष्ट काल्पनिक नव्हे...! भिमा कोरेगाव ला जावून बघा, तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत...! तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात...

- विश्वरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर., दि.०१/०१/१९२७...!

“ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे, 
पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का ? स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्यामांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून, पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाइलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे.” 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

- प्रबोधनकार ठाकरे संदर्भ - देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तकातून..

महात्मा फुले, शाहू महाराज, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी शाळा बंधण्याऐवजी देवळे बांधली असती तर बहुजन समाजाची आज काय अवस्था राहिली असती ! त्यांना शिक्षण मिळाले असते का? परंतु दुर्दैवाने या महापुरुषांच्या शाळांतून शिकलेली पिढी, नवी शाळा बांधण्या ऐवजी मंदिरांची निर्मिती करीत आहेत. याला दुर्दैव म्हणावे नाहीतर काय म्हणावे? - प्रबोधनकार ठाकरे संदर्भ - देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तकातून..

-----------------------------------------------------------------------------------------------------------

क्रांतीवीर भगत सिंग

"धार्मिकतेतून आलेली अंधश्रद्धा आणि धार्मिक कट्टरपणा हे आपल्या देशाच्या प्रगतीमधील मोठे अडथळे आहेत. त्यांच्यापासून आपण आपल्याला काहीही करून सोडवून घेतलं पाहिजे. मुक्त विचारस्वातंत्र्यावर घाला घालणारा कोणताही विचार आपण संपवून टाकायला हवा."
-----------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...