Monday, 30 January 2023

आज भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यापेक्षा मानवतेचा राष्ट्र बनवणे जास्त गरजेचं आणि महत्वाचे आहे!

इतिहासातून प्रेरणा मिळते आणि हीच आमची अस्सल संपत्ती आहे. आमचे महापुरुष, संत, महात्मे, आमच्या माता भगिनी यांच्या त्यागातून आणि संम्यक विचारातून आम्हास जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आम्ही भाकडं कथेतून मांडलेल्या कोणालाही आमचा गुरु किंवा आमचा प्रेरणास्थान मानलेला नाही. महाराष्ट्र ही भूमी आहे संतांची, महापुरुषांची आणि त्यांच्या त्यागाची. याभूमीत अगणित विचारवंत ही निर्माण झाले. उगाच आम्ही काहीही बोलत नाही जर एकीनं नसेल तर इतिहासात जाऊन बघा, वाचा आणि बोलण्यापूर्वी विचार करा.
आपण काय बोलतो, कोठे बोलतो याचे भान असायला हवे. स्वतःला बाबा किंवा स्वामी म्हणून घेणारे तुम्ही देवाच्या नावाने पैसे कामावणारे तुम्ही. देवाच्या नावाने अगणित संपत्ती कमविणारे तुम्ही. समजता काय स्वतःला! हे आत्ता तर स्वतःला देवाचं समजू लागलेत.
महाराष्ट्रातील संतांनी मनुष्याला माणूस बनवण्यासाठी आपले शरीर झिझवलं, होतं न्हवतं तेवढ समाजात वाटून ते खाली हात राहिले. अमाप नेक विचाराचा ठेवा आम्हाला दिला. मानवतेचा धडा शिकवला. कोणीपण उठतो आणि आमच्या संतांवर, महापुरुषांनवर, आमच्या माता भगिनीवर बोलतो. काय अधिकार तुमचा?? तुम्ही बोलाना तुमच्याचं लोकांवर. देवावर बोला, देवींवर बोला कोणी रोकलाय तुम्हाला. तुमच्या भाविकांवर बोला, तुमच्या इस्टेटीवर बोला. पण आमच्या वर बोलू नका. एवढे उपकार करा कारण तुम्ही आमच्या महापुरुषांनवर बोलणं म्हणजे तुमच्या आकलन शक्तीच्या पतिकडचं आहे. आमच्या संतांवर बोलण्यासाठी आमच्या कडे आहेत आमचा वारकरी संप्रदाय आहे, कर्तनकारी मंडळ आहे, अभ्यासक आहेत, लेखक आहेत तुम्हाला कोणी पान सुपारी दिली आहे का?
आज एक बगाड बुवा म्हणे की "संत तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारे म्हणून ते राम राम करीत होते." जणू हा तेव्हा जिवंत होता याने ते पहिले होते. आरे बघड्या ते काय बोलायचे तेच तुला नाही. अन उगाच काहीही बोलून जातो.
आज महाराष्ट्रात संत, महात्मे, महापुरुष, माता, भगिनी जिवंत आहे ते त्यांच्या कर्माणी आणि त्याच्या विचारांनी.
आत्ता कोणी राजकारणी बोलणार नाही कारण हिंदू राष्ट्र बनवणार अशी गोळी दिलीय याने. पण याद राखा जेव्हा महाराष्ट्र लोकांच्या सहनशक्तीचा बांद फुटेल तेव्हा तुमचा नाश करण्याची ताकत ही पैदा होईल. आम्ही शांत आहोत ते यांच्या संत महात्माच्या दिलेल्या संस्कारांनी. आम्ही दुर्बल नाही आहोत यकीन नसेल तर आमचा इतिहास चालून बघा.
"आज भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यापेक्षा मानवतेचा राष्ट्र बनवणे जास्त गरजेचं आणि महत्वाचे आहे!"

- यशवंत द. ओव्हाळ
https://yashovhal23.blogspot.com

Monday, 23 January 2023

हम ना हिन्दू हैँ ना मुसलमान

हम ना हिन्दू है, ना हम मुसलमान है।
हम अल्ला और ईश्वर का खूबसूरत तौफा है।
तौफा बनाते वक्त हममे ना भेद हुआ है।
भेद सिर्फ औरत और मर्द का हुआ हैं।

कुछ रखवालदारों ने हमें जाती मैं बाटा है । 
हमनें आँख बन्द करके उसे स्वीकार किया है ।
दिखाने मै हम एक जैसे ही है ।
फर्क सिर्फ पहराव और संस्कृति का है ।

हम सब अपनी अपनी रोटी कमाने मै मग्न है ।
कुछ लोग हमारे नाम पर अपनी रोटिया शेखते है ।
अपने स्वार्थ के लिये कुछ लोग हमें बाटते फिरते है ।
पागल हम उन्ही ही अपना मसीहा मानकर बैठे हैं ।

कोई अल्ला का नाम लेके हमें भड़कता हैं।
तो कोई भगवान के नाम पे हमें लूटता हैँ।
हमें तो सिर्फ नेक रास्ते पर ही चलना अब तय करना हैँ।
अब इंसानियत के नाते हमें एक दूसरे के साथ चलना हैँ।

- यशवंत द. ओव्हाळ 
https://yashovhal23.blogspot.com

शौक

शौक तो बचपन में पुरे किये अभी सिर्फ एडजस्टमेंट करता हूँ।
मैं जीने के लिए आज कल रोज तकलीफ सहन करता हूँ।

रोज काम पर इसलिए जाता हूँ के जिम्मेदारी पूरी कर सकूँ।
कभी समझ नहीं आया के जिंदगीको कैसे ख़ुश कर सकूँ।

सबको खुश करते करते खुद के आंसू छुपाता हूँ।
अपने आँसू छुपाने के लिए दूसरोंसे मज़ाक कर लेता हूँ।

कितने मज़ाकिया हो ये लोग मुझे कहते हैं।
उन्हें क्या पता कितने दुख ये दिल मैं छुपे हैं।

कुछ चीजें पाने के लिए बचपन मैं सिर्फ रोना पढ़ता था।
कमाकर भी खुद की चीजें खरीदनेके लिए रोना आता है।

कमाता हूँ किसके लिए ये जिंदगी कभी खुद के लिए जीने दे।
मुझे खुले आसमान के निचे बेवजाय थोड़ा घूमनेतो दे।

ये जिंदगी मुझे एक तो थोड़ा सुकून दे।
नहीं तो मेरा अगला पिछला हिसाब बना दे।

तंग आगया हूँ तेरे हर वक्त के इम्तिहानसे।
कटपुतली बंद गया हूँ मैं तेरे इशारोपे।


- यशवंत द. ओव्हाळ 
https://yashovhal23.blogspot.com

Saturday, 21 January 2023

साहेबांचा चमचा....






चमचा निवाला केवळ मुखात भरवतो
जेवणाशेवटी तो उस्टाच ताटात उरतो
मालकाचं खाऊन झालं की त्याची तिचं वाट असते 
इतर भांड्यांसोबतचं त्याचीहि धुलाई होत असते

धुलाई साठी त्याची काय विशेष प्रक्रिया नसते
याची अवस्था इतरांच्यात कुत्र्या सारखी असते
वाटायला वाटत की मालकाचा आपल्यात फार जीव असतो 
याफक्त अफवा असतात मालकाला कुत्रा पाळायचा असतो 

तो मात्र भ्रमात असतो की मी साहेबांशी एकनिष्ठ असतो 
खरं हेच असतं की मालक त्याला धुलनिष्ठ समजत असतो 
मालक खुश असतो कारण त्याला आढावा मिळत असतो 
याचा भलताच रुबाब की मालक माझ्या मुठीत असतो

मालकाचे खबरी हजार त्यातला हा एक प्यादा असतो
हा जणू काही मालकाला आपला मित्रच समजत असतो 
मालकांचा काय ओ तो अशांचा उपयोग करून घेतो
काम संपल्यावर कुळ्यांवर जोरदार लाथ मारतो

चमचा ज्या भरलेल्या वस्तूत असतो ती वस्तू खाली करतो
हाच त्याच अभिमान आणि हाच त्याचा संकल्प असतो
दाबक्यातल्या बेडकासारखं जगणारा हा याला स्वतःचा स्वाभिमान नसतो
चमच्यागिरी करण्यातच तो स्वतःच सुख, समाधान शोधात असतो

पगार वाढीच्या काळात हा अव्वल नंबरला असतो
स्वतःच्या स्वर्थासाठी इतरांची वाट लावत बसतो
इमानदारांचं काय ते तसें ही साहेबासमोर मेलेले असतात
चमचे मात्र धुर्त गोडी गुलाबीने आपला पगार वाढून घेत असतात 

चमच्याची एक संपणारी तारीख फिक्स असते
ईमानदारी मात्र दीर्घकार मजबूत आणि टिकाऊ असते
ईमानदारीचं फळ खूप टिकाऊ आणि मजबूत असतं
कितीही त्याला दगडावर घसा ते नसंपणार पीक असतं

- यशवंत द. ओव्हाळ 

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...