Tuesday, 2 December 2025

भारतीय देशभक्तीचा आत्मा "वंदे मातरम्"

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्रह नव्हती, तर लाखो भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे अमर गीत “वंदे मातरम्!” भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णाक्षर होती आणि आजही आहे. हे गीत प्रथम त्यांच्या "आनंदमठ" (१८८२) या कादंबरीत प्रकाशित झाले होते, जे बंगालमधील संन्यासी बंडाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते. तथापि, ते लवकरच संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चेतनेचे प्रतीक बनले. "वंदे मातरम्" म्हणजे "मी मातृभूमीला वंदन करतो." हे केवळ अभिवादन नाही, तर मातृभूमीसाठी पूर्ण समर्पण आणि बलिदानाची घोषणा होती.

इंग्रज भारतात व्यापाराच्या उद्देशाने इ.स. १६०० मध्ये आले होते. परंतु इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने प्रथमतः ३१ डिसेंबर १६०० रोजी ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याचा अधिकारपत्र (चार्टर) दिले. कंपनीने भारतात व्यापारासाठी आपला प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स याला मुघल बादशाह जहांगीरच्या दरबारात पाठवले आणि त्यांस तेव्हपासून व्यापाराचा अधिकार प्राप्त झाला. इ.स. १६११ मध्ये मसुलीपट्टणम येथे इंग्रजांनी आपली पहिली तात्पुरती व्यापारी वखार (Factory) स्थापन केली आणि त्याचं बरोबर आपला देश इंग्रजांचा गुलाम बनण्यासाठी पहिला पाऊल पडलं. सुरुवातीला त्यांचा उद्देश केवळ व्यापार करणे हाच होता परंतु, नंतर मुघल सत्तेच्या कमकुवतपणामुळे त्यांनी हळूहळू भारतीय राजकारणात आणि समाजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आणि आपले साम्राज्य विस्तारले अगदी थोड्याचं काळात आपला देश इंग्रजांच्या अधीन झाला त्यानंतर "सोन्याची चिडिया" म्हटलं जाणारा हा देश इंग्रजांनी आपल्या दोन दोन हातांनी अगदी जान जाई पर्यंत लुटला, त्यामध्ये आपण बऱ्याच मौल्यवान वस्तुंना आणि अधिकारांना मुकलो ते अगदी कायमचे. आपला देश गुलामीच्या बेढ्यामध्ये अडकलेला, जरी माणूस म्हणून जन्म झाला असला तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र न्हवता, एखाद्या पशु सारखी वागणूक इंग्रजांनी भारतीयांना दिली. स्वतःच्या देशात सन्मान तर सोडाच काही ठरविक ठिकाणी देखील जाण्याचा किंवा त्या जागेच्या आसपास फिरण्याचा हि अधिकार नव्हता.

इ.स. १६०० ते इ.स. १८८२ पर्यंत अनेकदा स्वतंत्रवीरांनी स्वातंत्र्याचा घाट घालण्यात प्रयत्न केला पण दुर्दैव भारतभूमीचे योग्य दिशा नसल्याने आणि काहिक गद्दारांमुळे ते स्वप्न कधी सत्यात उतरलेचं नाही. त्याचं वेळी उच्च शिक्षित बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या लेखणीतून शब्दबंध केलेल्या "आनंदमठ" या कादंबरीतून १८८२ मध्ये "वंदे मातरम्" या गीताच्या माध्यमातूम आजादीचा नवा नारा दिला. निद्रिस्त जनतेला जागृत करण्यासाठी शब्द-अग्नीचे डागच द्यावे लागतात अगदी याचं प्रमाणे या "वंदे मातरम" ने देशभक्तीची आग जनसमुदायामध्ये पेटविली आणि निर्माण झाला एक नवीन जणसमुदाय जो देशाच्या स्वतंत्रताची मागणी करू लागला. अशा परिस्थितीत, "वंदे मातरम्" ने भारतीयांना आठवण करून दिली की त्यांची मातृभूमी ही एक सामान्य भूमी नाही तर एक जिवंत देवी आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप. गाण्याच्या ओळी - "सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलम्, शस्यशामलम् मातरम्" - भारताच्या नैसर्गिक संपत्तीचे, नद्या, पर्वत, शेते आणि फळांचे चित्र रेखाटतात ज्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या रक्तात देशभक्तीची लाट निर्माण झाली. हे गाणे अगदी कमी वेळात स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आणि जनसमुदायामध्ये लोकप्रिय झाले.

 सदर गीताने भारतीयांना आठवण करून, “आपली मातृभूमी जिवंत आहे… आणि तिचं रक्षण करायचं दायित्व आपल्या रक्तात आहे!” त्या काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसेवकाच्या तोंडात “वंदे मातरम्” हा मंत्र होता. ब्रिटिशांची सत्ता हादरली कारण या दोन शब्दांत संपूर्ण भारत एकवटला होता. ज्यांच्या हातात तलवार नव्हती पण त्यांनी “वंदे मातरम्”च्या हाकेचा लढा दिला. त्या हाकेत बंदुकीची गोळी नव्हती, पण त्यात हृदयात झिरपणारा बाण होता.

स्वदेशी चळवळीदरम्यान आणि बंगालच्या फाळणीविरुद्धच्या निदर्शनांमध्ये त्याचा वापर झाला, ते अवज्ञाचे एक शक्तिशाली प्रतीक बनले. स्वातंत्र्य आणि एकतेचे प्रतीक बनले. सदर गाण्याने वेगवेगळ्या प्रदेशातील, धर्मातील आणि पार्श्वभूमीतील लोकांना एक निष्ठ आणि सक्षम बनवण्यासाठी अनमोल सहकार्य केले. निषेध आणि निदर्शने दरम्यान ते एक रॅलींग ओरड आणि प्रेरणा स्रोत म्हणून याचा उपयोग झाला. श्री अरबिंदों यांसारख्या नेत्यांनी तर या गाण्याला सामूहिक चेतना जागृत करणारा आध्यात्मिक "मंत्र" म्हणून याचा वापरला आणि त्यामुले निर्माण झाली सर्वात मोठी ऊर्जा याच ऊर्जेचा वापर राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचं सर्वात मोठं काम करण्यात आलं.

"वंदे मातरम्" हे पहिल्यांदा १८९६ च्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. या अधिवेशनाला भारतीय इतिहासात अनेक कारणांमुळे खूप महत्त्वाचे स्थान आहे, त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे इतक्या महत्त्वाच्या व्यासपीठावर "वंदे मातरम्" चे पहिले सार्वजनिक सादरीकरण झाले. या महत्त्वपूर्ण सत्रात आदरणीय कवी, संगीतकार आणि नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांना "वंदे मातरम्" हे अमर गीत गाण्याचा मान मिळाला. त्यांच्या सादरीकरणाने हे गाणे व्यापक राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि वाढत्या स्वातंत्र्य चळवळीत त्याची भावना खोलवर रुजवली. सार्वजनिक सादरीकरणानंतर, सदर गीत हे भारतीय राष्ट्रवादी चळवळीसाठी वेगाने एक शक्तिशाली गाणे बनले. त्याच्या भावपूर्ण बोल आणि शक्तिशाली संदेशाने देशभरातील असंख्य व्यक्तींना ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले. स्वातंत्र्यसैनिकांसाठी ते एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनले. सदर गीत लाला राजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल यांसारखे क्रांतिवीर याचं गीताचा वापर बार बार आपल्या भाषणातून करीत असत, तसेच क्रांतिकारी संघटनांनी तर यास आपलं ब्रीद वाक्य बनवलं होतं हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन एसोसिएशनचे सदस्य तर हे गाणी गात हसत हसत फाशीवर चढले, भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव हे तर जेल मध्ये  “वंदे मातरम्” चे जयघोष देत असत. बटुकेश्वर दत्त ने तर असेम्ब्लीत बॉम्ब फेकताना देखील याचा वापर केला होता. पुरुष पुढे होतीच त्याचं प्रमाणे महिलाही मागे न्हवत्या मादाम कामा, दुर्गा , प्रीतिलता वावेदार यांसारख्या रण रागिणींनी पण आपला संकल्प मंत्र बनवला.

गुलाम भारतात "वंदे मातरम्" हे देखील वादात सापडले. काही मुस्लिम संघटनांनी आणि कट कारस्थान्यांनी या गाण्याच्या काही भागात धर्माच्या काही त्रुटी काढल्या गाण्याच्या काहिक भागास मूर्तिपूजक मानले, म्हणून स. न. १९३७ मध्ये काँग्रेसने सदर गाण्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला असता काही अटी मजूर केल्या आणि  वादामुळे फक्त पहिले दोन श्लोक स्वीकारले गेले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस दोघेही याला अनुकूल होते, परंतु काँग्रेसने तडजोड केली. तरीही, ते लोकांच्या मनात राहिले आणि याच एकमेव कारणाने गुलाम भारतात "वंदे मातरम्" चा प्रभाव कमी पडू लागला. पण नामशेष झाला नाही. "वंदे मातरम्" हे केवळ एक गाणे नाही तर भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. ते आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य ही देणगी नाही, तर लाखो बलिदानांच्या किंमतीवर मिळवलेला विश्वास आहे. जेव्हा जेव्हा आपण हे गाणे गातो तेव्हा आपण त्या असंख्य क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहतो ज्यांनी त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. हे गाणे आपल्याला हे देखील शिकवते की मातृभूमीपेक्षा मोठा कोणताही धर्म, पंथ, श्रद्धा नाही. हेच त्याचे सार आहे. भारत मातेचा आदर, भारत मातेला पूर्ण समर्पण.

किती पिढ्या गेल्या, किती झेंडे फडकले, किती नद्या कोरड्या झाल्या...पण या गीताचा एकही स्वर जुना झाला नाही. आजही शाळांमध्ये मुलं हे गीत गातात, सैनिक सीमारेषेवर पुटपुटतात आणि कुणी राष्ट्रीय गीताच्या आवाजात उभं राहतो तेव्हा अंगावर काटा येतो. मातृभूमीच्या रक्तात, तिच्या पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये आणि आपल्या प्रत्येक श्वासात, क्रांतीचा जयघोष बनलेलं असं हे गीत १५० वर्ष पूर्ण करत आहे, पण या १५० वर्षांच्या टप्प्यावर प्रश्न फक्त एकच आहे, आपण काय करतो त्या मातृभूमीसाठी? आपण त्या मातेला परत काय दिलं? आपण तिची माती जपली का? तिचं पाणी, तिचं आकाश, तिच्या भाषेची शुद्धता जपली का? की आपण तिच्या कुशीत राहूनही परकीय मोहात हरवलो?

 आईचा हात डोक्यावर ठेवतोतेव्हा मिळणारा आशीर्वाद म्हणजे “वंदे मातरम्”.

सैनिकाची रक्ताळलेली माती पाहतोतेव्हा त्या मातीने घेतलेला श्वास म्हणजे “वंदे मातरम्”.

राष्ट्रध्वज वाऱ्यात फडफडताना दिसतोतेव्हा त्या तिरंग्याच्या रंगांत मिसळलेले शब्द म्हणजे “वंदे मातरम्!”

 वंदे मातरम्” म्हणणं सोपं आहे, पण त्याचा अर्थाने जगणं म्हणजे प्रामाणिक राहणं, देशासाठी काहीतरी करणं आणि प्रत्येक क्षणी मातृभूमीचा सन्मान राखणं. १५० वर्षांपूर्वी लिहिलेलं गाणं आजही आपला आत्मा हलवून जातं. कारण त्यात भक्ती, वेदना, प्रेम आणि  समर्पण आहे आणि म्हणूनच ते केवळ राष्ट्रगीत नाही, तर भारताचं धडधडतं हृदय आहे, वंदे मातरम् !

म्हणूनच "वंदे मातरम्" हा केवळ स्वातंत्र्याचा मंत्र न्हवता तर प्रत्येकाच्या जीवनाचा मंत्र आहे. जोपर्यंत भारतातील एक व्यक्तीही हे गाणे मनापासून गाऊ शकते, तोपर्यंत भारताचा आत्मा जिवंत राहील.

शेवटी आदराचा आणि अभिमानाचा "वंदे मातरम्"

 

वंदे मातरम्, वंदे मातरम्,

सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्,

शस्य-श्यामलाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ १॥
शुभ्र-ज्योत्सनां पुलकित यामिनीम्,

फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर-भाषिणीम्।

सुखदाम् वरदाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ २॥

 

भारत माता चिरंजीव हो!


Wednesday, 9 October 2024

नेहमीच सामाजिक जाणीव जपणाऱ्या पदमविभूषण रतनजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

 


उद्योगक्षेत्रातील गौरवशाली कामगिरीने भारताची मान जगात उंचावणारे उद्योजक पदमविभूषण रतन टाटा यांची प्राणज्योत आज मावळली. यांच्या सारखी माणसं अमर व्हावीत, यांच्या शिवाय माणुसकीचा विश्वास कायम होत नाही. अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे तसेच चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पदमविभूषण रतन टाटा सर. आज जरी त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी ते सदैव भारतीयांच्या मनात जिवंत राहतील. त्यांचे नेक विचार, साधेपणा आणि जगण्याची जीवन प्रणाली कायम स्मरणात राहावी, अजरामर व्हावी ही मनःपूर्वक इच्छा!

नेहमीच सामाजिक जाणीव जपणाऱ्या पदमविभूषण रतनजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

- यशवंत द. ओव्हाळ


Sunday, 21 April 2024

जग बदलणारा बापमाणूस


*"जग बदलणारा बापमाणूस"* या पुस्तकाला आणि सदर पुस्तकावर काम करणाऱ्या प्रत्येकाला माझा क्रांतिकारी आणि स्वाभिमानी जयभीम..  
पुस्तकाची सुरुवात येवढ़ी सुंदर कि त्यामुळे वाचकाला भुरळ पडते आणि तो वाचायला मजबूर होतो... लेखक जगदीश ओहोळ यांची शब्द रचना अगदीच अप्रतिम. साहेबांचा "मनातून" मांडलेला प्रकरण अगदी मनाला छेदून जातो. "आजवर हे पुस्तक माझं होतं, पण आता या क्षणापासून हे पुस्तक तुमचं आहे." हि ओळ वाचकाचं हृदय भेदून जाते. मी खुप सारी पुस्तकं वाचली, पहिली पण कोणी आपलं श्रेय लोकांना बहाल करणारे लेखक खूप कमी आहेत. हि मनाची श्रीमंती केवळ नेक विचारवंताकडेच असते. सदर पुस्तकाचे १० वे प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १३३ व्या जयंती निम्मितच्या कार्यक्रमात थोरा मोठ्याच्या उपस्थितीत करण्यात आले हि आम्हा सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. लेखक जगदीश ओहोळ यांच्या संकल्पनेला, लिखाणाला, विचारांना माझा निळा सलाम कारण तुमच्या लिखाणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाचा परीस स्पर्श  आहे. तुमच्या रूपाने  महाराष्ट्राला एक सूर्य प्रभावी लेखक मिळालेला आहे...हे केवळ "पुस्तक नाही तर, बाप पुस्तक आहे."  पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया जरूर देण्यात येईल... 
~ यशवंत द. ओव्हाळ 

Tuesday, 12 September 2023

तावडे आईसाहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

माऊलीला 75व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

"तावडे आईसाहेब" अर्थात "भारती रमेश तावडे" हे एक नाव नाही "ब्रँड" आहे. Harlequin Paint Pvt. Ltd. चे व्यवस्थापक श्री. उमेशजी तावडे यांच्या आईसाहेब. माऊलीचा स्वभाव एवढा छान कि जणू संत महात्म्याची जिती-जागती मिसाल. माझी ओळख या माऊलीशी सण 2004 मध्ये दसरा की दिवाळीत झाली असावी. माझ्या करिअरची सुरुवात याच कंपनी मधून आणि याच वर्षी झाली. आईचा स्वभाव म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा याचं अगदी ज्वलंत उदाहरणं. जगात माणुसकी संपली असे ज्यांना वाटत असेल त्यांनी या माऊलीच्या संपर्कात यावे. रिल्स आणि चित्रपट बनवन्यासाठी माणुसकी कोणीही दाखवतो पण खरं माणुसकीचं शंभरटक्के उदाहरणं येथे आहे. ज्या प्रमाणे स्वतःच्या मुलांवर प्रेम आणि माया त्याच प्रमाणे त्यांच्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांवर देखील तेवढीच माया. अगदी जवळ जाऊन विचारपूस करणे, मायेने डोक्यावर मायेचा हाथ फिरवणे, भरभरून आशिर्वाद देणे यात ही माऊली कधी फरक करीत नाही. बोलण्यातला मधुरपणा अगदी स्वर्गसुखासारखा. काल परवा अचानक या माऊलीची भेट झाली आणि कामाच्या तणावाने थकलेली शरीराला चैत्राची नवीन पालवी आल्यागत झालं. मोठा आनंदाई उम्मीद घेऊन मी घरी आलो. दिवसातचा आनंद अगणित आणि मन प्रसन्न झाला. 
आज मला Harlequin सोडून जवळपास 12 वर्ष झाली पण अजूनही सर्वांची आठवण आली की मी या कंपनी मध्ये जातो आणि जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा कंपनी सोडल्याच दुःख अनुभवतो पण जेव्हा तेथ जातो तेव्हा सोबत खुशीची पोटली भरून घेऊन येतो. मग त्या पोटलीत उमेश साहेब आणि पल्लवी मॅडमचा आशीर्वाद, गुरूजी राऊरकर यांचा आशीर्वाद आणि संमस्त काम करणाऱ्या स्टाफचा आणि कामगारांचा आशीर्वाद असतो तसेच मागच्या आठवणी यासर्व घेऊन मी पुढची आठवण येईपर्यंत पुरवून घेत असतो.
माऊलीच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने मुलाने शून्यातून विश्व निर्माण केले आणि त्याचं मुलाने माझ्या सारख्यां कितेकांना उत्तम जीवन जगण्यास लायक बनविले. आमच्या जीवनाला तावडे फॅमिलीचा परिस स्पर्श झाला नसता तर कदाचित आमची ही प्रगती नसती हे बिंदासपणे आणि बिनमिळावटी पणे बोलू शकतो.
या माउलीला उत्तम आरोग्य लाभो तथा शंभरीचा जीवनमान प्रवास लाभो ही छत्रपती शिवचरणी प्रार्थना.....

Ex_Harlequin_Employee_Yashwant_D_Ovhal...

Wednesday, 9 August 2023

प्रा. हरी नरके नामक पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला



*प्रा. हरी नरके नामक पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला* 

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आणि अखंड समाज एक पुरोगामी चळवळीला पोरका झाला. शाहू, फुले आणि आंबेडकरी विचाराचा ज्वालामुखी आज शांत झाला. सरकारचं जेव्हा जेव्हा चुलक तेव्हा तेव्हा खडवून लेखन करून त्यांनी सरकारला जाग्यावर आणण्याचे काम केले. परखड विचारा मांडणारे प्रा. हरी नरके आज काळाच्या पडद्याड गेले. अशा लेखकाला *भावपूर्ण श्रदांजली ..*🙏🙏💐💐

यशवंत द. ओव्हाळ

Thursday, 13 July 2023

प्रेमाला मर्यादा नसतात आणि बंधन ही. सीमा हैदर आणि सचिन प्रेम कथा


प्रेमाला मर्यादा नसतात आणि बंधन ही. अशाच एका आंतरराष्ट्रीय प्रेमाची कहाणी आज बहुतांशी चर्चित आहे. पाकिस्तानची सीमा गुलाम हैदार आणि भारताचा सचिन ठाकूर. प्रियसी आपल्या प्रेमासाठी चार मुलांसमवेत पाकिस्तान मधून भारतामध्ये आली. कसं आणि कुठे यायचं हे युट्युब ने सांगितलं आणि एक नवा इतिहास कायम झाला. 
सीमा मूळची पाकिस्तानची आपल्या चार मुलांना सोबत ती मायदेशी राहायची नवरा पैसे कामाविन्यासाठी विदेशात असायचा. नवरा बायको मधील दुरी कमी करण्यासाठी सीमाने मोबाईल मध्ये पपजी खेळायची. खेळता खेळता ती सचिनच्या संपर्कात आली आणि गेम पार्टनरचे रूपांतर प्रेमात झालं आणि सुरुवात ती  झाली नव्या पर्वाला. नेपाळ मध्ये मंदिर शादी झाल्यावर तयारी झाली भारत प्रवासाची. 
भारतात आल्यावर सीमाने हिंदू धर्म स्वीकारला आणि नवीन बंधनाने ती खुश हि आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमाला जात, धर्म, पंथ, भाषा आणि देशसीमा  कदापि अडवू शकत नाहीत कारण प्रेम हे कदापि कैद होऊ शकत नाही. प्रेम आजाद असतं प्रेमाला कैद करायला जाल ते अजून मजबूत होत. काहिक लोकांनी या प्रेमाला "गदर एक प्रेम कथा पार्ट ३" तर काहींनी तर सीमाला "आय एस आय एजंट" म्हणून घोषित केलं. 
वास्तविकता सीमा आणि सचिन दोघे हि खुश आहेत आणि सचिनच्या घरातल्यानी सीमा आणि तिच्या मुलांना स्वीकारलं आहे. मीडिया आणि लोक यान साठी हि एक आंतरराष्टीय प्रेमकथा आहे तसेच नवीन मसाला आहे. 
"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं" हि कुसुमाग्रजांची कवितेची वास्तविकता आज नव्याने पाहावयास  मिळाली. 
- यशवंत द. ओव्हाळ

Saturday, 1 July 2023

आलोक मौर्या तू बरोबर आहेस पण तुझा विश्वास आज आडवा पडलाय... !

 


चौथ्या श्रेणीत (सफाई कामगार) काम करणाऱ्या आलोक मौर्या याने आपल्या पत्नीला जीवाचं रान करून शिकवलं आणि ज्योती मौर्या या त्याच्या पत्नीला प्रांतीय नागरी सेवा अधीकारी (पी. सी. एस.) बनवलं आणि अधिकारी झाल्यावर स्वार्थापोटी आपल्या पतीला नाकारले कारण काय तर म्हणे "मनीष दुबे सोबत प्रेम झालं " असल्या प्रेमाला काय आग लावायची? ज्या प्रेमात पतिने केलेल्या उपकाराची, प्रेमाची आणि त्यागाची जाणीव नाही. त्या प्रेमाला काय म्हणावं, जर समजा आलोकने हिला शिकवलीच नसती तर ?? मग मनीषला हिच्या सोबत प्रेम झालं असतं का? शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. मग याला सुसंस्कृत म्हणावं कि मूर्खपणा.

ज्योतीने मौर्या हिने आज दोन घरात आग लावली एक स्वतःच्या आणि दुसरी मनीष दुबेच्या. दोघेही विवाहित आहेत. पण या अक्कलशून्य लोकांमुळे विवाहित महिलेला शिकवावी कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.. चला शुक्र आहे कि बऱ्याच महिलांना पती शिकवतात पण त्या असं काही करीत नाही.. अशा काहिक अक्कल शून्य लोकांमुळे अखंड महिलांवर प्रश्न निर्माण होतो....


एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...