Saturday, 31 December 2022

जगू आपल्या हक्काचा तो एक उनाड दिवस.

*जगू आपल्या हक्काचा तो एक उनाड दिवस.*



आनंदाच्या क्षणाला आज बहर आलाय,
वेदनाने भरलेल्या जीवनात आज सुख आलाय.
मनातल्या आनंदाला आज उधान आलाय,
मित्र मैत्रिणी एकत्र येण्याचा आज योग आलाय.

सुखाची व्याख्या मला माहित नाही,
पण या पेक्षा वेगळं काही असणार नाही.
जीवन प्रवासात अनेक जाणं भेटतात,
लहानपणी चे सवंगडी मात्र वेगळेचं असतात.

आज सर आणि साहेब म्हणणारे सर्रास भेटतात,
पण एकेरी नावाने आवाज देणारे दुर्मिळ असतात.
जेव्हा काही समझत नाही तेव्हा आपण लहान असतो,
कमतरता तेव्हाच भासते जेव्हा आपण मोठे असतो.

आज हलक्या हलक्या पावलाने वय लागले वाढू,
का नाही एकमेकांच्यात आपण थोडा निवांत वेळ काढू.
खबर नाही कोणाला कधी येईल शेवटचा तो काळा दिवस,
जगू ना यार आपण आपल्या हक्काचा तो एक उनाड दिवस.


- यशवंत द. ओव्हाळ 
https://yashovhal23.blogspot.com

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...