Friday, 2 December 2022

आज आम्ही आमच्यातलेचं नालायक पाहिले.

 आज आम्ही आमच्यातलेचं नालायक पाहिले.


आम्ही भीमाचे उपकार विसरणारे पाहिले, 

उपकाराची जाणं न ठेवणारे पाहिले.

भीम घराण्यावर अपशब्द वापरणारे पाहिले,

आज आम्ही आमच्यातलेचं नालायक पाहिले.


काय बिषाद कोणाची आमच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याची,

अवलाद आहे भीमाची, शक्ती युक्ती शिवबा अन संभाजींची.

कसम आहे आम्हा थोर पुरुषांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची,

नाहीतर चिधाड्या केल्या असत्या राई राई एवढ्या तुझ्या धडाची.

 

कायदा आमच्या बापाने लिहला म्हणून थोडी कदर तुमची,

जर आमचा बाप नसता तर भीक मागत बसला असता दुनियेची.

खायला मेलेली जनावरे आणि गावरावराची भाकरी असती,

गळ्यात मडकी, कंबरेरा झाडू सफाई आख्या गावाची असती.

 

जमत नसेल तर सोडून दे हा धम्म माणसाच्या माणुसकीतला

कारण तू गमावलासा तो अधिकार जय भिम म्हणण्याचा,

आंबेडकर घराण्यावर अपशब्द वापरणारे तुम्ही,

याद ठेव जे तुमच्या कडे आहे ते सर्व दिलाय माझ्या भिमानी.

 

आज दिसलीच असेलचं तुम्हा पावर जयभिमवाल्यांची,

कोणीही कदर करणार नाही तुझी आणि तुझ्या समर्थकांची.

पक्ष, पद, सत्ता यापेक्षा ही मोठा असतो तो समाज स्वतःचा,

तुला रे काय माहित तु स्वाभिमान विकला आहेस स्वतःचा,

 

आत्ता एक काम कर ज्यात तुझं भलं आहे,

धम्म सोडून तू कोठेही जा त्यात तुला आराम आहे,

नको आम्हाला असे तुझ्यासारखे नादान आणि गर्विष्ठ,

हवेत आम्हाला जयभीमवाले  स्वाभिमानी आणि एकनिष्ठ.

 

- यशवंत द. ओव्हाळ

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...