Monday, 7 November 2022

"भारत जोडो यात्रा" म्हणजे काय ?

"भारत जोडो यात्रा" म्हणजे काय ? 
"सांप्रदायिकता, बेरोजगारी, महागाई आणि राजकीय केंद्रीकरणाविरुद्धचा लढा होय." 
भारत जोडो यात्रेची तंतोतंत व्याख्या करणे तसं अवघड आहे पण मला वाटते या पेक्षा काही वेगळ नसणार. हा लढा केवळ काँग्रेसी लोकांसाठी नाही तर आर्थिक रेलचेल सहन जाणाऱ्या प्रत्येक भारतीय मनुष्यासाठी आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राहुल गांधी. या मनुष्याने आपल्या जिंदगीत सर्व काही पाहिलं. आजी आणि वडिलांचं रक्तामधील मुतदेह पाहिलं, आईचा परदेशी म्हणून होणार अपमान पाहिला. त्याच्या होणाऱ्या वारंवार टीका पचविल्या, हा प्रचंड सहनशक्तीचा, प्रेमळ स्वभावाचा मनुष्य आणि गर्व शून्य असा मनुष्य आहे. 
आज हा तरुण संपूर्ण भारत एक करण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यँतचा जवळपास ३५७० किलोमीटर प्रवास पायी करीत आहे. हा प्रवास अनेक राज्यातून होणार आहे. ही यात्रा बेरोजगारी आणि महागाई, द्वेष आणि विभाजनाचे राजकारण आणि आपल्या राजकीय व्यवस्थेचे अति-केंद्रीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या ऐतिहासिक चळवळीचा एक भाग होण्यासाठी सर्व स्तरातील लोक एकत्र येत आहेत. हा भारताच्या एकतेचा, तिची सांस्कृतिक विविधता आणि तिच्या लोकांच्या अतुलनीय धैर्याचा उत्सव आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मला वाटतं कि या नेक कामात सामील होण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. या संदर्भातील एक समर्थनार्थ रॅली खोपोली सारख्या माझ्या शहरात पाहीली आणि मन हर्षाने भरलं.

~ यशवंत द. ओव्हाळ 



No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...