आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ जेष्ठ पत्रकार श्री. बाबू पोटे (संपादक सवांद मराठी न्यूज ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
"बाबू सिताराम पोटे" हे फक्त नाव नाही तर एक ब्रँड म्हणावं असं व्यक्तिमत्त्व आहे. पोटेंना मानापासून साहेब म्हणावं असं व्यक्तिमत्त्व. साहेबांशी माझी ओळख करून देणारे आमचे बंधू तथा मित्र संदीप मधुकर ओव्हाळ हे होत. माझे के. एम. सी. चे कॉलेज मधील शिक्षण चालू असताना साहेबांशी ओळख झाली. ते तेव्हा दिवंगत मंगेश वाघमारे यांच्या साप्ताहिक जनता मंच या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते. जनता मंचाची अगदी साचेबंध मांडणी त्यांनी खालापूर तालुक्यात केली. या साप्ताहिकाचे मी आणि माझा भाऊ संदीप ओव्हाळ आम्ही दोघेही पत्रकार होतो. काही काळ पत्रकारिते मध्ये गेली. मला काहीही पत्रकारितेचा गंध नसताना साहेबांनी पत्रकार म्हणून माझी नेमणूक केली. माझी बातमी नेहमी चार ओळींची असायची त्यात काही सार नाही, अक्षरांची मांडणी नाही, शब्दांची नेहमीचं गफलत. त्यात माझा अक्षर म्हणजे एक डोक्याला व्याप असायचा. माझ्या अक्षरातील "न" आणि "त" यातील फरक ओळखणे म्हणजे एक गंमत असायची. साहेबांनी मला खूप समजाऊन घेत पत्रकारितेचं धडे दिले आणि मी काही काळापुरता पत्रकार झालो. पण मी पत्रकारिता क्षेत्रात जास्त काळ टिकलो नाही करण त्याचं दरम्यान मला एका नामांकित कंपनीत जॉब लागला आणि पत्रकारितेला पूर्ण विराम लागला.
संयम, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, लेखन, वाचन आणि खरा पत्रकार कसा असावा हे सर्व मी साहेबांकडूनच शिकलो. मी पत्रकारिता तर सॊडली पण साहेबानंमुळे माझ्या जीवनात एक आमूलाग्रह बदल झाला मला वाचण्याची आणि लिखाणाची आवड लागली आणि याचं मुले मी कॉलेज मध्ये लेखन स्पर्धेत नेहमीच अव्वल असायचो. मी काही पट्टीचा लेखक नाही पण जे काही आहे ते साहेबानंमुलेच.
साहेबाची पत्रकारिता म्हणजे आदर्श योग्य आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे हे एक ज्वलंत उदाहरण आहेत. आम्हाला साहेबानं बरोबर काम करण्याची संधी मिळाली हे आमचे परम भाग्य. आज साहेबांच्या पत्रकारीतेची कारकिदीची २५ वर्ष पूर्ण झाली. हि आमच्यासाठी अभिमानी आणि सन्मानाची बाब आहे. तुमचा पत्रकारितेचा इथपर्यंचा प्रवास तुम्ही मोठया जिद्दीने आणि इमानदारीने केलात हे आमच्यासाठी अलौकिक आणि अनमोल आहें तसेच आमच्या सारख्यांसाठी ते आदर्शमय ठेवा आहे इथून पुढचा प्रवास सुंदर आणि सुखमय होओ हि ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्यासाठी लिहून किंवा बोलणं हे समुद्रातील पाणी संपवण्यासारखा आहे. तूर्तास येथे थांबतो.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
यशवंत द. ओव्हाळ
No comments:
Post a Comment