Friday, 17 June 2022

स्मरणातले मंगेश वाघमारे


काका एकदा मला लग्नात भेटले मी नम्र पणे जय भीम बोलून दंडवत घातला. काकांनी प्रती उत्तर न्हाणून जय भीम म्हंटले आणि सहज मला विचारले मला ओळखले ना? मी फक्त मान हलवली आणि म्हणालो हो मग काका म्हणाले मी कोण? मी अगदी सहज आणि पटकन मंगेश पाडगावकर हातोंडवाले. काका हासत म्हणाले अरे काय बोललास? मला माझी चूक समजली मी म्हणालो सॉरी सॉरी काका मंगेश वाघमारे. मग मी विषयाची सावरासावर करण्यासाठी म्हणालो पाडगावकर हे कवितांचे लेखक आणि तुम्ही बातम्यांचे लेखक तुम्ही काय त्यांच्या पेक्षा कमी आहेत होय! ते आपले लेखन कवितेतुन मांडतात आणि तुम्ही बातम्यांमधून सर्व सामन्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता. तसं बागायला गेलात तर तुम्ही भारी. असे मला तरी वाटतें. 
असे म्हणताच पटकन काकांनी स्मित केलं आणि पाठीवर प्रेमाचा धोपटा देत म्हणाले मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस! आणि म्हणाले चल मी आत्ता येतो! असे बोलून काकांनी निरोप घेतला. 
माझी काकांशी ओळख करून देणारे श्री. बाबू पोटे (मुख्य संपादक संवाद मराठी) हे होय. काकांचे साप्ताहिक जनता मंच यांचे कार्यकारी संपादक हे पद पोटे साहेबांकडे होतं. जनता मंचाची उत्तम अशी बांधणी खालापूर तालुक्यात केली होती. पोटे साहेबांनी त्या वेळी पत्रकार म्हणून मलाही संधी दिली होती. पोटेनच्या मार्गदर्शन खाली आम्ही काम करीत होतो. कधी कधी मिटींग च्या दरम्यान काकांशी गाठ पढायची. काही काळ या दोन लोकांच्या सानिध्यात राहायची मला संधी मिळाली. हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. बाबू पोटे आणि मंगेश वाघमारे या दोन माणसांच्या परीस स्पर्शाने माझ सोन झालं आणि तेव्हापासून मला लिखाणाची आवड लागली. 
लेखनाच्या क्षेत्रात मी कोणी नामांकित नाही पण के. एम. सी. कॉलेज मध्ये लेखन स्पर्धेत मी नेहमी अव्वल असायचो. आजही कधी सर्टिफिकेट पाहिले तर सर्व काही लक्खपणे आठवते. कॉलेज चालू असतानाचं एक नामांकित कंपनी मध्ये मला जॉब लागला आणि पत्रकारिते कडे थोडा लक्ष कमी झाले. त्या नंतर काही काळ पत्रकारितेशी निगडित होतो पण जस कॉलेज संपलं तसं पत्रकारितेला स्वल्प विराम लागला तो आज पर्यंत. यात एकमात्र झालं कि माझे या दोघांशीही संबंध मात्र टिकले ते आजपर्यंत. तसें काकांचे आणि आमचे नातेसंबंध आहेत पण ते काय आहे हे ना त्यांनी सांगितले आणि नाही  मी विचारले. अगदी शेवट पर्यंत ते माझ्यासाठी काकच राहिले.
काळाचा धात एवढा मोठा असेल कधी वाटलं न्हवतं. चांगली माणसं हमेशा स्मरणात असतात ती कधीही आपणाला सोडून जात नाहीत. तुमचा जाण्याने समाजात, संघटनेत, नातेसंबंधात आणि परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती पण कधीही न भरणारी. 
माझ्या काकांना ओव्हाळ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!!

यशवंत ओव्हाळ

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...