Wednesday, 16 March 2022

झुंड नहीं टीम कहिये


 

"झुंड"

 "झुंड नहीं टीम कहिये"

संपूर्ण बॉलिवूडने मध्ये ईतिहास निर्माण करणारी घटना म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा दृश्य दाखवणारी एकमेव घटना २०२२ मध्ये घडली. आम्ही लहानापासून ते आत्तापर्यती टीव्ही पाहत आलो आहोत पण अगदी लहानसा दृश्य कधी बॉलिवूडने किंबहुना रोजच्या सिलियलने  महामानवाची जयंती महोत्सव दाखवला नाही पण आज आमच्यावर आणि लाखो बहुजनांवर हे दृश्य दाखवून उपकार करणारे श्री. नागराज मंजुळे साहेब हेच एकमेव ठरले. एका फ्रेम मध्ये महामानव आणि महानायक रुपी इतिहास २०२२ मध्ये घडला. नागराज मंजुळेना आज मनापासून यांना साहेब म्हणावसं वाटतंय.

साहेब तुम्ही "झुंड" बनवून आम्हावरच केवळ उपकार केला नाहीत तर आमच्या नंतरच्या पिढीवर देखील उपकार केले आहेत. झुंड म्हणजे केवळ बाबासाहेबांची जयंती दृश्य नाही तर अनेक मनांवर तुम्ही परिवर्तन कसे होते याचे ज्वलंत उदाहरण दाखवले. मनुष्य जन्म  घेता आणि मरतो पण यशस्वी तोच होतो जो स्वतः मध्ये परिवर्तन निर्माण करतो. काळानुसार माणसाने बदलणे खूप गरजेचे आहे. झोपड्पट्टीच्या मुलांचे नाव आधीच खराब, व्यसनं, चोरी, मारामारी करणारी त्यात आपण त्यांना सन्मान मिळून दिलात. बिनकामाच्या पोरांना योग्य कामाला लावून तुम्ही वैचारिक परिवर्तनाची नवी पैदास केली. चांगले कर्म केल्याशिवाय उज्वल भविष्याची निर्मिती होत नाही हे पुन्हा एकदा सिद्द्य झाले.

तुमच्या झुंड कर्माला, झुंड निर्मितीला  सलाम !!!

~ यशवंत द. ओव्हाळ  

Friday, 4 March 2022

जगात जिथं कुठं युद्ध होत तिथं फक्त भाषा गोळीची असते आणि सत्ता फक्त मृत्यूची असते.


 जगात जिथं कुठं युद्ध होत तिथं फक्त भाषा गोळीची असते आणि सत्ता फक्त मृत्यूची असते.

युद्ध म्हणजे हॉलिवूड मुव्ही समजणाऱ्या लोकांसाठी.

युद्ध एकट कधीच नसतंय.

राष्ट्रध्वजात लपेटलेले निष्प्राण देह,

काळीज विदीर्ण करणारा वीरपत्नीचा आक्रोश,

भवतालचा शोक पाहून कावरी बावरी झालेली चिमुकली,

हुंदके दाबून सगळ्या वेदना उरात दडपणारा पिता

अन 

बोबडे बोल बोललेला पोटचा गोळा आज अबोल होऊन पडलेला पाहून सुन्न झालेली माता.

युद्ध एकट कधीच नसतंय,

जिवाभावाचा सवंगडी आज सोडून गेलाय म्हणून अश्रू ढाळणारे मित्र,

शेवटची मानवंदना देताना थरथरत बंदुकीचे चाप ओढणारे सहकाऱ्यांचे  हात,

अमर रहे च्या घोषणा देणारे न आतून कोसळून पडलेल सगळं गाव.

युद्ध एकट कधीच नसतंय


सीमेवरच गाव भरल्या डोळ्यांनी सोडणारी माणसं,

खेळणी माग राहिली म्हणून रडणारी लेकरं,

किडुक मिडुक कवटाळून शाळेच्या पडवीत चूल पेटवणाऱ्या माऊल्या,

तोफेच्या गोळ्याने भाजून निघणारी जनावर

आणि उध्वस्त झालेली शिवार

करपलेल्या धानासोबत करपलेली स्वप्न.


युद्ध एकट कधीच नसतंय,


एकसारखी चित्र सीमेच्या अल्याड न पल्याड सारखीच चितारणारी नियती,


तेच आक्रोश न तेच हंबरडे एकसारखे.


युद्ध एकट कधीच नसतंय


सिनेमातल्या लढाई सारखी लढाई समजणारी उन्मादी झुंड,

मढ्याच्या टाळूवरल लोणी खाणारी गिधाड,

गेंड्याच्या कातडीची यंत्रणा,

कणा मोडलेली अर्थव्यवस्था आणि हतबल झालेला सामान्य माणूस.


युद्ध एकट कधीच नसतंय.


आनंद शितोळे

I am Indian

 मी भारतिय आहे!

पुरेसे नाही का इतके?




युक्रेन-पोलंड बॉर्डरवर जमलेल्या विदेशी नागरिकांच्या गर्दीमधल्या एका विद्यार्थ्याची गचांडी पकडून, संतापलेल्या युक्रेनी सैनिकाने दात ओठ खात प्रश्न केला.

Who are you?

मागील २ दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या २३ वर्षीय तरुणाने अगदी भेदरलेल्या अवस्थेत डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत, थरथरणाऱ्या ओठांनी उत्तर दिलं.

I am Indian.

त्यानंतर तासाभराने त्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांसमवेत बॉर्डर ओलांडण्याची परवानगी मिळाली आणि अंगातील उरल्या सुरल्या ताकदीने तो धावतच जाऊन एअर इंडियाच्या विमानात बसला.

विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर, मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप घरी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आलेल्या नातेवाईकांनी हात उंचावून एकच जल्लोष केला.

त्यातच मायदेशी परतलेल्या या विद्यार्थ्यांचे बरेवाईट अनुभव जाणून घेण्यासाठी एक पत्रकार पुढे झाला आणि त्याने समोरून येणाऱ्या तरुणाला अगदी उत्सुक चेहऱ्याने प्रश्न केला.

मित्रा कुठला आहेस? मराठी, गुजराती की तमिळ?

का कोण जाणे पण, त्या तरुणाने केविलवाण्या चेहऱ्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि त्यानंतर स्वतःच्या खिश्यावरील तिरंग्याकडे बोट दाखवत डबडबलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं.

भारतीय आहे.

त्या तरुणाने उच्चारलेल्या त्या दोन शब्दांनंतर, टाळ्यांचा एकच कडकडाट झाला आणि लागोपाठ भारत मातेचा जयजयकार करणाऱ्या घोषणा कानी पडू लागल्या.

देशात आपली ओळख हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, मराठा, माळी, महार, चांभार, सुतार, तेली, वंजारी, बिहारी, राजस्थानी, जाट, सिंधी किंवा जात, धर्म व प्रांतानुसार कुठलीही जरी असली, तरी जन्मभूमीचे उपकार म्हणून मिळालेली 'भारतीय' हीच आपली एकमात्र अधिकृत ओळख आहे हे विसरता कामा नये.

- अक्षय भिंगारदिवे ©

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...