Tuesday, 4 January 2022

गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून माणसाला शहाणे करणारेसर Issac न्यूटन यांचा आज जन्मदिवसविनम्र अभिवादन ~ शाम कांबळे


सफरचंदाच्या झालाखाली बसलेल्या न्यूटन सरांना झाडावरून खाली पडलेले सफरचंद पाहून नवल वाटले.
त्यांच्या बुद्धीला प्रश्न पडला की,
हे सफरचंदचे फळ खालीच का पडले....?
वर का गेले नाही?
त्या फळाला खाली खेचणारे असे काय कारण असावे बरे!
सर Issac न्यूटन सरांच्या
या विचारचक्रातून,
त्यांना पडलेल्या प्रश्नातून गुरुत्वाकर्शन शक्तीचा शोध लागला.
निसर्गाचे आणखी एक रहस्य
मानवाला उलगडले.

गुरुत्वाकर्शन (gravity force )
शक्तीचा शोध लावून माणसाला शहाणे करणारे सर न्यूटन यांचा आज जन्म दिवस.
त्यानिमित्त त्यांना अभिवादन.

पण जर कदाचित...
न्यूटन सर भारतात झाडाखाली 
बसले असते आणि
वरून फळ खाली
पडले असते
तर कदाचित.....
ते म्हणाले असते.
' देवाची करणी आणि
नारळात पाणी '

कारण आजही आपण पौराणिक काळातील देवादीकांच्या
जन्मास्थलांचे शोध घेत आहोत
हे वास्तव आहे ना !
21च्या शतका पर्यंत आपण देवाची जन्मभूमी शोधत होतो.

तर विचार करा 1643 म्हणजे न्यूटनच्या जन्मकाळात अथवा त्या आधी तर आपली विचारशक्ती कशात गुंग असेल..?
जरा विचार करा राव .....
कोणत्या अंधारयुगात होतो 
आपण ! आणि का .......?

भारतीय बुद्धीला न्यूटन सारखे मुलगामी प्रश्न 
का पडत नव्हते.
मुलगामी संशोधन आपल्याकडे
प्रकर्षाने का होत नव्हते..?

त्या 'सफरचंदा निमित्ताने न्यूटनला पडलेले 
प्रश्न आपल्यालाही पडायला हवे होते ना !
का असं घडलं नाही...?
विचार करा.......

गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून माणसाला शहाणे करणारे
सर Issac न्यूटन यांचा आज जन्मदिवस
विनम्र अभिवादन l

शाम lllll

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...