Tuesday, 18 January 2022

थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन व त्याच्या ड्रायव्हरची गोष्ट


ही गोष्ट थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन व त्याच्या ड्रायव्हरची आहे.नवीन शोधांवर जनतेत जाऊन आइन्स्टाइन खूप सोपं बोलत असे. ड्रायव्हर अल्पशिक्षित असला तरी बुद्धीमान होता. तो प्रत्येक भाषण मन लावून ऐकायचा. एकदा तो म्हणाला हा सापेक्षता सिद्धांत मीसुद्धा लोकांना समजावून देऊ शकेन.
आइन्स्टाइनने त्याला भाषणाची संधी दयायचे ठरवले. तो कसा दिसतो हे माहीत नसलेल्या गावाहून पोस्टाने निमंत्रण आले.

त्या गावाला जाताना त्याने द्रायव्हरला मागे बसवले व तो स्वतः द्रायव्हरच्या जागी बसला.
संयोजकांनी गाडीत मागे बसलेल्या द्रायव्हरला मंचावर नेले, सत्कार, परिचय झाला.भाषणही उत्तम झाले. नन्तर प्रश्नोत्तरे झाली.पूर्वी विचारली गेलेली 'प्रश्न-उत्तरे' माहीत असल्याने द्रायव्हरने व्यवस्थित उत्तरे दिली.

कार्यक्रम संपणार तोच एकाने नवीनच प्रश्न विचारला. द्रायव्हर हजरजबाबीपणे व कमालीच्या शांतपणे म्हणाला "शाब्बास, प्रश्न छानच आहे. पण इतका सोप्पाय की याचे उत्तर तर माझा द्रायव्हरसुद्धा देऊ शकतो. ये रे द्रायव्हर मंचावर नी दे उत्तर. "

आइन्स्टाइन स्टेजवर आला, त्याने उत्तर दिले. लोक खुश झाले.

Moral of the story is....
पण तो किमान द्रायव्हर तरी होता!
: प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...