सह्याद्रीच्या दश दिशांतून
पराक्रमाचा अंगार फुलला होता.
एकाच वेळी नऊ आघाड्यावंर
ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज मुघलं...
तू समोर भिडला होतास.
द्वेषाने तुझ्या तेजाच्या
बदनामीची मोहीम जारी झाली.
मृत्यू नंतर ही तुझ्या
जारीच राहिली ती.....
काय काय सांगावं!
रायगडला जेव्हा जाग येते,
येथे ओशाळला मृत्यू
ते थोरातांची कमळा.....
पण अखेर तुझ्या शौर्याची
चरित्र्याची विद्वतेची ज्योत
काही विझली नाहीचं!
जागु लागला इतिहास महाराष्ट्राचा
साक्ष घेऊन गडकोटाची
मराठी कडेकपाराची.
नवी पिढी सरसावली
तुझ्या इतिहासाला
नव्याने पुकारण्यासाठी.
सत्याचे अवतरण झालेच!
शौर्याने उसळणारा तू नरसिंह
तू ग्रंथकर्ता विद्वान होतास.
आणि चरित्र्याचा धनी होतास
तू मृत्युला आलिंगन देणारा
सिंहाचा छावा होतास.
उघड्या मैदानात शत्रूला
अधिक भयचकीत करणारा
महावीर होतास.
स्वराज्याच्या धाकल्या धन्याला
राज्याभिषेक दिनाच्या
निमित्ताने
मानाचा मुजरा...
शाम lllll
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य काबीज करण्याच्या हेतूने धूर्त मंत्र्यांनी डाव आखला.
छोट्या राजारामांना नामधारी राजा बनवून स्वराज्याची सुत्रे आपल्या हाती घेण्याचा डाव. हा कावेबाजपणा अण्णाजी दत्तो,राहूजी सोमनाथ, मोरो पिंगळे, बाळाजी आवजी ह्या स्वराज्यद्रोही मंत्र्यांनी पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला.
पण सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यानी ह्या मंत्र्यानच्या मुसक्या आवळून शंभूराजां पुढे हजर केले आणि ह्या असल्या
स्वराज्यद्रोहींच्या व शत्रू च्या छाताडावर पाय ठेवून शंभू राजे छत्रपती जहाले.
समस्त बहुजन शिवशंभू प्रेमी जनतेला छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
महापराक्रमी,रणधुरंदर,स्वराज्यरक्षक सह्याद्रीचा अजिंक्य छावा छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिना निमित्त मानाचा मुजरा.
No comments:
Post a Comment