Monday, 3 January 2022

कानडी लोकांच्या मदतीसाठी धारातीर्थ पडलेले...**कारीचे (भोर)नागोजी जेधे व सती गेलेल्या गोदूबाई


*⛳ स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य⛳*
*🚩कानडी लोकांच्या मदतीसाठी धारातीर्थ पडलेले...*
*कारीचे (भोर)नागोजी जेधे व सती गेलेल्या गोदूबाई🙏🙏*

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी भागानगर कडे जात असताना, वाटेतच काही कानडी लोक महाराजांच्या भेटीला आले .हे लोक कोप्पळ चे होते. कोप्पळ प्रांत आदिलशाहीत होता. त्या ठाण्यावर दोन आदिलशाही सरदार होते. हुसेन खान मियांन दुसरा अब्दुल रहिमखान मियांन हे दोघे भाऊ अत्यंत क्रूर रयते वर अतोनात अत्याचार करून छळणारे होते. गाईगुरांना पासून ते बायकापोरं पर्यंत लूट करणे ही रोजचीच बाब होती. त्यांची प्रचंड दहशत होती. विरोधात जाण्याची कुणाची बिशाद नव्हती. सर्व जनता हैराण झालेली, मरण सुद्धा महाग होते. त्या प्रांतातील लोक छत्रपती शिवाजी महाराज येणार म्हणून महाराजांच्या वाटेत आडवे गेले होती. महाराजांच्या पुढे थरथरत्या देहाने, भीतीयुक्त अश्रू ढाळत, पोटतिडकीने, आपली गाऱ्हाणी , होणारे अत्याचार ,लूट सांगत होते. महाराजांची भुवई रागाने उंचावली, शेजारी सरसेनापती हंबीरराव मोहिते ,सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, सर्जेराव जेधेचा तरणाबांड पोरगा अजून मिसुरड ही फुटले लि नव्हती, ओठ पिळले तर दूध बाहेर पडेल असा देखणा,शूर, धाडसी ,पराक्रमी आजोबांचे गुण पुरेपूर रक्तात उतरलेला नागोजी जेधे उभा होता.
महाराजांनी इशारत करताच मराठी तुकडी संपगावच्या दिशेने निघाली. मिया खानला खबर लागली. मराठ्यांची तुकडी अतिशय तुटपुंजी आहे ,त्याने आपली प्रचंड फौज बाहेर काढली. मराठ्यांच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला. मराठी येलबुरग्या पाशी लिंग सागरात आले होते. समोर मिया खान हत्तीवर स्वार झालेला .धुळीचे लोट उठवत येत होता. तो स्वतः भयंकर ताकतीचा व तिखट हत्यार चालवणारा होता. समोर खानाची फौज पाहून मराठ्यांना स्फुरण चढले. हात शिवशिवू लागले, तलवारी रक्त पिण्यासाठी आसुरलेल्या. मराठे गर्जना करत खानाच्या फौजेवर तुटून पडले. नागोजी जेधे शर्थीने लढत होता. त्याची तलवार विजेसारखी तळपत होती. मराठ्यांचा हल्ला एवढा वेगवान होता. की खानाची फळी फुटली. खानाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. खान घाबरला त्याने माहुताला हत्ती लढाईतून बाहेर काढण्याचा हुकुम दिला. माहुताने हत्ती माघारी वळवला व तो बाहेर पडू लागला. हुसेन खान पळतोय हे सळसळणाऱ्या रक्ताच्या नागोजी जेधे यांनी पाहिला त्यांनी घोड्याला टाच मारली. ताडताड घोडा फेकत हत्तीच्या आडवा उभारला .नागोजी नी जवळील भाला हत्तीच्या गंडस्थळावर फेकला, भाल्याने अचूक वेध घेतला, तसा मीया खानाला मृत्यू समोर दिसला. घाबरलेल्या मिया खानाने धनुष्याला बाण लावला नागोजी जेधे मिया खानावर चालून आला तोपर्यंत मिया खानाच्या धनुष्यातून बाण सुटला होता कच दिशी नागोजीच्या मस्तकात घुसला नागोजी त्या आघाताने घोड्यावरुन खाली कोसळला. सर्जेराव जेधे नि ते पाहिले आपला लेयोक खाली कोसळतोय .ते शर्थीने त्याच्या रक्षणासाठी धावले .धनाजी जाधव रक्षणार्थ उभे ठाकले. प्रचंड कापाकापी झाली मिया खान ला कैद केले ही बातमी महाराजांना समजली नागोजीच्या मस्तकातील बान काढणे कठीण होते? पण बाण काढणे आवश्यक होते. खस दिशी बाण काढला गेला. तसा तरणाताठा पोरगा स्वतःच्या बापाच्या मांडीवर महाराजांच्या कडे पाहत धारातीर्थ पडला.
घरी तेरा वर्षाची बायको गोदूबाई घोरपडे यांच्या घरातील लेक नागोजी जेधे धारातीर्थ पडल्याची बातमी वाऱ्यासारखी कारीत येऊन धडकली सर्वत्र हलकल्लोळ माजला. ती तेरा वर्षाची नागोजी जेधे यांची पत्नी गोदूबाई कारी च्या रानात सती गेली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ऐन तारुण्यातील आठरा, एकोणीस वर्षाचा तरणाबांड पोरगं आपल्या संसाराची आहुती देऊन. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्यासाठी कानडी लोकांच्या रक्षणार्थ धारातीर्थ पडलेल्या नागोजी जेधे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...