श्रुती तांबे
.............
केवढं हे क्रौर्य..! नुसती कल्पना करतानाही जीव कळवळतो..!
----------
स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला...
एक जानेवारीला नवीन वर्षात पदार्पण केलं या आनंदापेक्षाही कैकपट आनंद, हा एक जानेवारी 1948 ला माझ्यासारख्या स्त्री-शुद्राती शूद्र म्हणून गणल्या गेलेल्या तमाम मुलींसाठी महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली याचा होतो...स्त्री म्हणून जन्माला आलेल्या इथल्या प्रत्येकीसाठी आजचा दिवस हा भाग्योदय असणारा दिवस आहे....अन म्हणूनच ज्योतिबा आणि सावित्रीमाईंविषय कृतज्ञता व्यक्त करण गरजेचं वाटतं....
1 जानेवारी 1848 हा फक्त कॅलेंडर मधला एक दिवस नाहीये....तर वर्षानुवर्षे इथं असलेल्या दमनकारी, कर्मठ रूढी परंपरांना सुरुंग लावणारा, व्यवस्था उलढवून टाकणारा दिवस आहे....अन माझ्या सारख्या मुलींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...!
फुले दांपत्याबरोबरच यादिवशी आणखी एका व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी....ती म्हणजे काशीबाई विश्राम घोले अर्थातच बाहुलीची....डॉ. विश्राम घोले यांच्या मुलीची....
डॉ. घोले हे त्याकाळातले प्रसिद्ध शल्यविशारद... फुलेंच्या संपर्कात आले अन त्यांनीही सत्यशोधक धर्माचं काम पुढं नेण्याची जबाबदारी उचलली.... फुलेंच्या सहवासाने त्यांनाही स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली...अन, या कामाची सुरुवात त्यांनी आपल्या घरातुन करण्यास सुरुवात केली....
आपल्या सहा-सात वर्षाच्या मुलीला म्हणजेच बाहुलीला त्यांनी देशातील पहिल्या मुलींच्या शाळेत शिकायला पाठवण्यास सुरवात केली... अवघी सहा-सात वर्षाची हुशार चुणचुणीत पोरं... या शाळेत जाऊ लागली...
पण, रुढी - परंपरेने ग्रासलेल्या त्याकाळतल्या कर्मठ लोकांना ही बाब काही रुचली नाही....त्यांनी डॉ. घोलेंना ऐन केन प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली....या कोणत्याच त्रासाला डॉ. घोले बधले नाहीत....त्यामुळं या कर्मठ लोकांनी ज्यात डॉ. घोले यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता...
बाहुलीला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला....हा लाडु खाल्ल्यावर अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बाहुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला...स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी म्हणून बाहुलीच्या मृत्यूची नोंद इतिहासात आहे...
आपल्या लाडक्या बाहुलीच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानीं बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला....
No comments:
Post a Comment