Wednesday, 22 December 2021

शेवटी_माझी_ओळख

शेवटी_माझी_ओळख.....!

माझ्या काही ब्राह्मण मित्रांना मी ब्रिगेडी वाटतो. कारण मी त्यांच्या ब्राह्मण्यवादाला आव्हान देताे.
 
पण त्याच वेळी 
माझ्या ब्रिगेडी, बामसेफी, मुलनिवासी मित्रांना मी भटाळलेला वाटतो. कारण मी सरसकट ब्राह्मणद्वेष करत नाही....!

माझ्या कट्टर देशभक्त मित्रांना तर मी देशद्रोहीच वाटतो. कारण मला मुस्लिम समाज दहशतवादी पाकिस्तान समर्थक आहे असे बिल्कुल वाटत नाही.

माझ्या काही मुस्लिम मित्रांना मात्र मी इस्लामविरोधी वाटतो कारण मी त्यांच्या अनिष्ट प्रथांवर आणि पवित्र ग्रंथाची ही चिकित्सा झाली पाहिजे असे थेट भाष्य करतो.

माझ्या काही कट्टर हिंदू धार्मिक मित्रांना मी हिंदूद्वेषी वाटतो कारण मला तथागत गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचे तत्वज्ञान मान्य असल्याचे मी मान्य करतो.

माझ्या आंबेडकरवादी मित्रांना मी कट्टर_मराठा वाटतो कारण मी मराठा क्रांती मोर्चात बाळगलेल्या शांतता आणि शिस्तीचा प्रचंड आदर करतो . आणि होणाऱ्या मागणीच्या पाठिंब्यात व नंतर रस्त्यावर झालेला कचरा उचलायला सहभागी होतो.

माझ्या मराठा मित्रांना मी आंबेडकरांचा_फॅन व मराठाद्वेषी वाटतो कारण एट्रोसिटी कायदा रद्द होऊ शकत नाही व त्याचा गैरवापर रोखण्यासाठी आधीपासूनच कायद्यात तरतूद आहे असे मी आवर्जून चारचौघात सांगतो.

श्रमाला प्रतिष्ठा मिळावी आणि त्याचे योग्य मूल्यमापन व्हावं म्हणून चिंतन करणारा,
कार्ल मार्क्स
मला नेहमीच आदरणीय वाटतो.

माझ्या अस्तिक मित्रांना मी नास्तिक वाटतो कारण दगड-मंदीरातील देव न पूजता मी माणसातील देव शोधतो

माझ्या नास्तिक मित्रांना मी आस्तिक वाटतो कारण माझी निसर्गावर श्रद्धा आहे, प्रथा-परंपरा-कलाकृती जाणून घेण्यास मी देवळात जातो, माणसाने बनवलेला पण त्यावर देवाचे लेबल लागलेला प्रसाद मी खातो

मी का म्हणून कुणाचा द्वेष करू?
ते पण फक्त जातीधर्माच्या आधारावर?

मला जातीधर्माची_चौकट मान्य नाही..
मला जगायचय त्यापलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून अगदी
मुक्तपणे ...........

सुशीलकुमार औटी

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...