Wednesday, 22 December 2021

जॉन एलिया

तुम जब आओगी तो खोया हुआ पाओगी मुझे 
मेरी तन्हाई में ख़्वाबों के सिवा कुछ भी नहीं 

'प्रेम अन प्रतीक्षा' या दोन्ही शब्दांचा वापर न करताही, एका प्रियकराची विरहव्याकुळता, जॉन एलिया यांच्या या नजम् मधून समजून येते. 

खर तर प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला एक कारण लागतं, तिची आठवण काढायला, तिची वाट बघायला, तिला भेटायला. जॉन एलियाना देखील तेच म्हणायचं आहे. ती येणारे, तिने यावं मला भेटायला. मलाही तसंच वाटतं अन तिलाही वाटतं की मी वाट पाहत राहावं आणि तिच्या येण्याची. वाट बघत बसलेलो असताना ती कधीतरी माझ्या घरी येईल तेंव्हा मी शून्यात हरवून गेलेलो असेंन. ती आलीये याचा मागमोसही मला लागणार नाही. ती आलीये हे मला जानवणारही नाही इतका हरवून गेलेलो असेंन मी. मला तू यावस असं वाटतंयच तो माझा आग्रह राहीलच पण तू येशील तेंव्हा मला हरवलेला बघशील माझ्या पुस्तकांत आणि जर आलीच नाहीस तर ठाऊक नाही काय असेल. 

मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें 
मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ भी नहीं 

तू जेंव्हा माझ्या खोलीत येशील तेंव्हा तुला माझी खोली सजवायची इच्छा होईल आणि माझी इच्छाही तीच असेल की तू माझी खोली सजवावीस. पण हे बघ माझ्या चारही बाजूना पुस्तकांचा गराडा आहे. पुस्तकांशिवाय तुला माझ्या खोलीत काहीच मिळणार नाही. 

माझ्या खोलीत पुस्तकांमुळं एकही अशी जागा शिल्लक राहिलेली नाही, जिथं आपण दोघे निवांत बसून, एकांतात प्रेमाच्या गप्पा मारू शकू. खर तर एक कोपरा मनाचा जो रिता होता तुझ्या प्रेमासाठी, तोही आता व्यापून टाकलाय पुस्तकांनी. मग आता कुठं आपण प्रेम करायचं, पुस्तकांच्यामध्ये की पुस्तकात? 

कवी मन हे असंच असतं, पुस्तकांनी भरलेलं. पण तरीही त्याच्या आत अजून एक मन असतं जे चंचल असतं. ज्यात असंख्य फुलपाखरं बागडत असतात जणू तो बगीचाच आहे असंख्य फुलांनी बहरलेला. तू येशील तेंव्हा मला हरवलेला पाहशील. कवितांमधील रहस्य शोधण्यात मी इतका गुंग असेन की, तू आलेली मला समजणारही नाही. पण तरीही मला आस आहे तुझ्या येण्याची. मला प्रतीक्षा आहे तुझी. तुलाही तसंच वाटत असेल. पण नियती अशी की प्रतीक्षा कधीच समाप्त होत नाही आणि कधी पूर्ण होत नाही.

हे सारं जॉन एलिया यांनी लिहिलेल्या शेरच्या संदर्भातील आहे. उद्या जॉन एलिया यांचा आठवण दिवस त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली.

Yogesh Kudale

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...