हे महाग्यानी लोक
हिंडताहेत मशाली पेटवून
गल्लीबोळातून,आळीआळीतून
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा......
आमची ना नाही
मात्र एक :
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आमच्या या खोपटा-खोपटातूंन
पूर्ण सूर्य दिसतोय !
- नामदेव ढसाळ
-----------------------------------------------------------------------
त्या अंधारलेल्या गुहे पाशी
तू सोडुन गेलास
पिसाळलेला जाळ.
मी शिलगवित जाणार आहे इथुन पुढला काळ.
नामदेव ढसाळ.
No comments:
Post a Comment