Monday, 7 November 2022

"भारत जोडो यात्रा" म्हणजे काय ?

"भारत जोडो यात्रा" म्हणजे काय ? 
"सांप्रदायिकता, बेरोजगारी, महागाई आणि राजकीय केंद्रीकरणाविरुद्धचा लढा होय." 
भारत जोडो यात्रेची तंतोतंत व्याख्या करणे तसं अवघड आहे पण मला वाटते या पेक्षा काही वेगळ नसणार. हा लढा केवळ काँग्रेसी लोकांसाठी नाही तर आर्थिक रेलचेल सहन जाणाऱ्या प्रत्येक भारतीय मनुष्यासाठी आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राहुल गांधी. या मनुष्याने आपल्या जिंदगीत सर्व काही पाहिलं. आजी आणि वडिलांचं रक्तामधील मुतदेह पाहिलं, आईचा परदेशी म्हणून होणार अपमान पाहिला. त्याच्या होणाऱ्या वारंवार टीका पचविल्या, हा प्रचंड सहनशक्तीचा, प्रेमळ स्वभावाचा मनुष्य आणि गर्व शून्य असा मनुष्य आहे. 
आज हा तरुण संपूर्ण भारत एक करण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यँतचा जवळपास ३५७० किलोमीटर प्रवास पायी करीत आहे. हा प्रवास अनेक राज्यातून होणार आहे. ही यात्रा बेरोजगारी आणि महागाई, द्वेष आणि विभाजनाचे राजकारण आणि आपल्या राजकीय व्यवस्थेचे अति-केंद्रीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या ऐतिहासिक चळवळीचा एक भाग होण्यासाठी सर्व स्तरातील लोक एकत्र येत आहेत. हा भारताच्या एकतेचा, तिची सांस्कृतिक विविधता आणि तिच्या लोकांच्या अतुलनीय धैर्याचा उत्सव आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मला वाटतं कि या नेक कामात सामील होण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. या संदर्भातील एक समर्थनार्थ रॅली खोपोली सारख्या माझ्या शहरात पाहीली आणि मन हर्षाने भरलं.

~ यशवंत द. ओव्हाळ 



Thursday, 3 November 2022

साजगांव यात्रेची एक आठवण





साजगांवची यात्रा म्हणजे आमच्या लहानपणी एक आकर्षण असायचे. यात्रा आली की आम्ही पैसे सचवायचो आणि त्या पैसातून खेळणी घायचो तशी लागणाऱ्या सर्व वस्तू आमचे आजोबांच घ्यायचे केवळ पैसे साठवणे हे एकपात्री नाटक असायचे. बाबा जेव्हा बोलायचे की ह्या रविवारी जत्रेला जायचे आहे निघा सर्वांनी! तेव्हा आमच्या पोरासोरांमध्ये एक वेगळीच हर्षाची लहर यायची आणि आदल्या रात्री झोप कोणाला यायची. बाबा नुसते म्हणाले कि यात्रेला जायचे आहे मग तेव्हा पासून आक्खी जत्रा रोज रात्री स्वप्नात फिरून व्हायची. 

आम्ही खेडवळ भागातील बोली भाबडी लोकं! स्वप्नाच्या दुनियेला खरं खुरं मानणारी, म्हणून रविवारी पहाटे साडे चारला सर्व घर जागे होऊन जत्रेला जाण्याची तयारी सुरु असायची आमच्या गावातून सकाळी सहा वाजताची एस. टी. (लालपरी) असायची आणि विशेष म्हणजे आम्ही सर्व लहान मुलं ती टी. बस.  पकडायचो. गुलाबी थंडीतला तो प्रवास म्हणजे स्वर्गसुखःपेक्षा कमी न्हवता. 

सकाळी साडे सहाच्या सुमारास आम्ही साजगांव बस स्टॉप वर उतरायचो मग आमच्या यात्रेला खरी खुरी सुरवात व्हायची प्रथमतः विठू-रखुमाईच्या दर्शनाने यात्रेची सुरुवात व्हायची. दर्शन झाले कि मागच्या पायऱ्यांनी थेट यात्रेत तेव्हा यात्रा पण जवळ पास सात वाजेपर्यंत चालू व्हायची. दुकानदारांची दुकान लावायची वेळ आणि आम्ही जायची वेळ कधी कधी एकचं व्हायची. आमच्या सारखे अनेक यात्रेकरू असायचे. सकाळी दुकानदारांचा बोनीचा टाइम असायचा म्हणून सामान किंवा वस्तु घेण्यासाठी जास्त झिग झिग करावी लागत न्हवती. बाबा आम्हाला दोन लाईन मधून फिरवायचा आणि जेलीबीच्या दुकानात नेऊन बसवायचा. जिलेबीवर मनसोक्त ताव मारून झाल्यावर पुढची स्वारी उसाच्या रसाकडे  असायची. नास्ता पाणी झाला कि मग मासळी बाजार आणि नंतर बैल बाजार एवढा फिरून झालं कि मग शेवटी "मौत का कुवा" पहिला कि मग डायरेक्ट एस. टी. स्टॅन्डवर तो पर्यंत दहा वाजलेले असायचे. मग दहाची बस पकडली की साडे दहा, पावणे अकरा पर्यंत जत्रा घरी आलेली असायची. 

यात्रेची हि गंमत आज पाहावयास मिळत नाही. लहान मुलांमध्ये हि गंमत आज शाबूत असेलही पण मोठी माणसं आपापल्या कामात एवढी व्यस्त आहेत  कि लहानमुलांच्या गंमती जमती पूर्ण करण्यास त्यांच्या कडे वेळ नाही.

मित्रानो आपण खूप खेडवळ भागातले असून सुद्धा चांगल्या प्रकारे यात्रेची माजा घेतलेली आहे. आपल्या मुलांमध्ये आपल आनंद शोध आणि त्यांच्या आनंदात एकदा आपलं लहानपण जागून पहा. साजगाव यात्रेच्या मनापासून शुभेच्छा ....
 
चला तर मग साजगांव यात्रेला.......

- यशवंत द. ओव्हाळ

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...