Saturday, 24 September 2022

शेरअली खान - एक आठवण....शेरदिलं मित्राची...


शेरअली खान - एक आठवण....शेरदिलं मित्राची...

कधी चाच्या दिसले तर मी म्हणायचो "क्या चाच्या ?"
आणि जबाब यायचा " अभी कुछ नहीं बचा!"

खानचाच्या आज तुम्हाला जाऊन खूप दिवस झाले पण तुम्ही स्मरणात हमेशा आहात. तुमच्या सारखा दिलदार व्यक्तिमत्व आमच्या संपर्कात नाही आणि जे आहेत ते तुमच्या सारखे नाहीत. तुम्ही आपली जान. ऑक्ट्रॉय नाक्यावरच्या आणि गाडीत माल लोड करायच्या गंमती अजूनही आठवतायत आणि आठवल्यावर टचकन डोळे पानावतात तेव्हा कोठेतरी तुम्ही असल्याचा भास होतो आणि तुमचे "क्या यशवन भायss?" ही साद चार भिंतीत कानावर पडते.

2011 ला चाच्या valvinox मध्ये भेटले "एकबारहीं गाड़िका नंबर बताऊंगा बारबार नहीं बताऊंगा भायss, तुम लिख के रखो भायss!" या एकाच वाक्यात आपला दिलं जिंकलात. तेव्हा पासून आपली गट्टी जमली ती अगदी तुम्ही रिटायर होई पर्यंत. त्या नंतर अधून मधून बातचीत व्हायची ती पण मजेदार असायची. माझ्यासाठीच तुमचा लगावं आणि माझ्या आजारपनाच्या काळात माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू मी पहिले आणि तुम्ही आपली जान बनलात. तुम्ही आपले म्हातारे दोस्त. वयात अंतर जरी असला तरी पण मैत्री मात्र कोवल्या मुलासारखी होती अगदी वर्ग मित्रानं सारखी.

आमच्या गावातील आण्णा नेहमी आम्हाला सांगायचे मुलांनो मैत्री कधीही आपल्या पेक्षा मोठ्या वयाच्या माणसांशी करायची याची प्रचिती तुम्हाला भेटल्यावर आली. 

खानचाच्या सारखा रुबाबदारी मित्र पुन्हा होणे नाही...
यांस विनम्र अभिवादन💐💐💐🙏🙏

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...