Saturday, 24 September 2022

शेरअली खान - एक आठवण....शेरदिलं मित्राची...


शेरअली खान - एक आठवण....शेरदिलं मित्राची...

कधी चाच्या दिसले तर मी म्हणायचो "क्या चाच्या ?"
आणि जबाब यायचा " अभी कुछ नहीं बचा!"

खानचाच्या आज तुम्हाला जाऊन खूप दिवस झाले पण तुम्ही स्मरणात हमेशा आहात. तुमच्या सारखा दिलदार व्यक्तिमत्व आमच्या संपर्कात नाही आणि जे आहेत ते तुमच्या सारखे नाहीत. तुम्ही आपली जान. ऑक्ट्रॉय नाक्यावरच्या आणि गाडीत माल लोड करायच्या गंमती अजूनही आठवतायत आणि आठवल्यावर टचकन डोळे पानावतात तेव्हा कोठेतरी तुम्ही असल्याचा भास होतो आणि तुमचे "क्या यशवन भायss?" ही साद चार भिंतीत कानावर पडते.

2011 ला चाच्या valvinox मध्ये भेटले "एकबारहीं गाड़िका नंबर बताऊंगा बारबार नहीं बताऊंगा भायss, तुम लिख के रखो भायss!" या एकाच वाक्यात आपला दिलं जिंकलात. तेव्हा पासून आपली गट्टी जमली ती अगदी तुम्ही रिटायर होई पर्यंत. त्या नंतर अधून मधून बातचीत व्हायची ती पण मजेदार असायची. माझ्यासाठीच तुमचा लगावं आणि माझ्या आजारपनाच्या काळात माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू मी पहिले आणि तुम्ही आपली जान बनलात. तुम्ही आपले म्हातारे दोस्त. वयात अंतर जरी असला तरी पण मैत्री मात्र कोवल्या मुलासारखी होती अगदी वर्ग मित्रानं सारखी.

आमच्या गावातील आण्णा नेहमी आम्हाला सांगायचे मुलांनो मैत्री कधीही आपल्या पेक्षा मोठ्या वयाच्या माणसांशी करायची याची प्रचिती तुम्हाला भेटल्यावर आली. 

खानचाच्या सारखा रुबाबदारी मित्र पुन्हा होणे नाही...
यांस विनम्र अभिवादन💐💐💐🙏🙏

Thursday, 1 September 2022

कादंबरी फकिरा ≈ अण्णा भाऊ साठे

 



#कादंबरी फकिरा ≈ अण्णा भाऊ साठे

फकिरा कथा आहे आत्मसन्मानाची, कथा एका शूरवीराची, कहाणी परंपरेची, कहाणी जोगवी आणि गाव ख़ुशीसाठी मरणाऱ्या योध्याची, कहाणी कुटुंब आणि गाव रक्षणाची, आपल्या लोकांनी जगावं यासाठी लढाणाऱ्या आणि लढायला लावणाऱ्या नायकाची, कहाणी बेईमान लोकांच्या शिक्षेची, कहाणी ईमानी मुक्या जाणवराची, कहाणी कुटुंब सदस्यांच्या त्यागाची, कहाणी कायद्याने भांडणाऱ्या पाटिलकीची..... _हीं कहाणी आहे कुटुंबातील लोकांना आणि गावाकऱ्यांना सरकारी तावडीतून सोडवण्यासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या शूरवीराची_.....हीं कहाणी आहे फकीरची.हीं कथा आहे अण्णा भाऊ साठेंच्या बन्नाट वर्णनाची, हीं कहाणी आहे वाचकाच्या डोळ्यात अश्रू येणाऱ्या वेळेची....

~ यशवंत द ओव्हाळ


पाहिलं प्रेम....

 


पाहिलं प्रेम कस असतं जणू पत्त्याच्या इमारतीची मांडणी,

मी स्वप्ननगरीचा राजकुमार आणि ती शुक्राची चांदणी.


तिच्या वर प्रेम करणे जणू हाच माझा धर्म,
खरं हेच आहे कि ह्रदयाला मिळतो खूप दर्द.

ह्रदयाची जखम असतें हलकं हलकं दर्द देणारी,
पण याचं वयात असते ती हवी हवीसी वाटणारी.

तिच्यासाठी जीव नुसता कासावीस होतो,
भूक नाही तहान नाही दिवस कसा बसा जातो.

तिच्यासाठी चार चक्कर जेव्हा गल्लीत मारतो,
ती दिसल्या वर जीव जणू शांत शांत होतो.

तिज्या मनी काय आहे हे जाणून घेणे हाच ध्यास,
तीच माझा विषय आणि तीच माझा अभ्यास.

प्रेम तिने स्विकारले तर चांद तारे तिचे,
नाही म्हणाली तर आभाळ भर दुःख माझे.

प्रेम भंग झाल्यावर असं वाटत कि प्रेम बीम काही नसतं,
तेव्हा आपण फक्त एकटेच असतो दुसरं कोणी नसतं.

मग असं वाटत जिच्यासाठी केला रान तीचं झाली बेईमान,
आभाळभर दुःख पिणारा मी मात्र कोरडा पाषाण.

मग हलक्या हलक्या पावळाने वय लागते वाढू,
तेव्हा कोठे समजू लागतं प्रेमाच्या भानगडीत मी का पडू.

येवढ मात्र खरं आहे कि पाहिलं प्रेम नाही विसरू शकत,
पहिल्या प्रेमाच्या आठवणी आपण आयुष्यभर बसतो जपत.

≈ यशवंत द. ओव्हाळ

गणेशोत्सव निमंत्रण कविता

*गणेशोत्सव निमंत्रण कविता*

 

सण गणेशोत्सव लय मोठा, कामाचा बिलकुल नाही तोटा, 

लगबग घाई घरातल्याची, माझी घाई निमंत्रणाची.


सजावतीची गिनती झाली, घर मकारीची वाट पाही.
लाईट तोरणानांची गर्दी जमली, प्रसाद वाटी वाट पाही.

आजी, आजोबा, बाबा, आई यांची घाई सफाईची,
मी नुसताच बोंबा मारून वाट पाही गणरायाची.

मी दिली हाक सर्वाना आमच्या कडे येण्याची,
बाप्पाचे दर्शन घेण्याची आणि मला भेटण्याची.

चॉकलेट, भेटवस्तू नको मला, तुमचा केवळ सहवास हवा,
येताना फक्त येवढ करा, मला तुमचा आशीर्वाद हवा.

आत्ता माझी तुम्हास हात जोडून एकच विनंती,
मग काय येताना माझ्यासाठी माझ्या खुशीसाठी.

माझ्यासाठी या आणि बाप्पांचे तुम्ही आशीर्वाद घ्या.
तारीख वेळ तुम्हीच ठरवा मला फक्त आशीर्वाद द्या.

मी अद्विक छोटासा म्हणून हलक्यात घेऊ नका,
आत्ता माझी सटकली असे बोलायला लावू नका.


यशवंत . ओव्हाळ


एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...