Thursday, 1 September 2022

पाहिलं प्रेम....

 


पाहिलं प्रेम कस असतं जणू पत्त्याच्या इमारतीची मांडणी,

मी स्वप्ननगरीचा राजकुमार आणि ती शुक्राची चांदणी.


तिच्या वर प्रेम करणे जणू हाच माझा धर्म,
खरं हेच आहे कि ह्रदयाला मिळतो खूप दर्द.

ह्रदयाची जखम असतें हलकं हलकं दर्द देणारी,
पण याचं वयात असते ती हवी हवीसी वाटणारी.

तिच्यासाठी जीव नुसता कासावीस होतो,
भूक नाही तहान नाही दिवस कसा बसा जातो.

तिच्यासाठी चार चक्कर जेव्हा गल्लीत मारतो,
ती दिसल्या वर जीव जणू शांत शांत होतो.

तिज्या मनी काय आहे हे जाणून घेणे हाच ध्यास,
तीच माझा विषय आणि तीच माझा अभ्यास.

प्रेम तिने स्विकारले तर चांद तारे तिचे,
नाही म्हणाली तर आभाळ भर दुःख माझे.

प्रेम भंग झाल्यावर असं वाटत कि प्रेम बीम काही नसतं,
तेव्हा आपण फक्त एकटेच असतो दुसरं कोणी नसतं.

मग असं वाटत जिच्यासाठी केला रान तीचं झाली बेईमान,
आभाळभर दुःख पिणारा मी मात्र कोरडा पाषाण.

मग हलक्या हलक्या पावळाने वय लागते वाढू,
तेव्हा कोठे समजू लागतं प्रेमाच्या भानगडीत मी का पडू.

येवढ मात्र खरं आहे कि पाहिलं प्रेम नाही विसरू शकत,
पहिल्या प्रेमाच्या आठवणी आपण आयुष्यभर बसतो जपत.

≈ यशवंत द. ओव्हाळ

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...