Thursday, 10 February 2022

आभाळा एवढा माणूस व्ही. आर. शरीफ

आभाळा एवढा माणूस...


*श्रीमान व्ही. आर. शरीफ साहेब यांच्यासाठी माझे दोन शब्द..*


*"काही माणसं असतात स्तिथ प्रज्ञ,*
*उंच भल्या हिमालय पहाडा सारखी,*
*त्यांना पाहून मिळते स्फूर्ती*
*उंच आकाशात भरारी घेण्यासाठी....."*

आपण ना कोणी राजकारणी ना राजकारणाच्या उंबरट्यावरील कार्यकारिणी. आपण एक सर्व साधारण जीवन जगणारे बापमाणूस, आपण अमाप माणुसकीचा मिरुमनी, आपल्या पावन परीस स्पर्शाने आमच्या सारख्या अनेक माणसांचे जीवन सुधारले तुमच्या छात्र छायेत आम्हाला राहण्याचा योग लाभला आम्ही धान्य जहालो. मी स्वतः नास्तिक आहे पण तुमच्या कडे पाहून कधी कधी वाटतं की या एकविसाव्या शतकात देव आहे. जर देव या जगात नसता तर तुमच्या सारखी निस्वार्थी धनाची माणसं जन्मास आलीच नसती. तुम्हास देव म्हणावं की देवाचा अवतार मी थोडा प्रश्र्नित आहे. 

 आपल्या स्वतःच्या गावात लोक तुमच्या स्वागतासाठी जय्यत तयारीनिशी वाट पाहतात आणि ते पण रात्रीच्या वेळेस हे दृश्य थोड्याच माणसांबद्दल पहावयास मिळत. आजच्या जगात वाट त्यांचीच पहिली जाते की जे लोक आपले आहेत आणि लोकांना आपले वाटणारे लोकं खूप कमी आहेत. लोक स्वार्थासाठी एकत्र येताना मी पाहिलं आहे पण प्रेमापोटी एकत्र यावेत या साठी नशीब लागतात, कर्म लागतात आणि ते नशीब आपलं आहे. साहेब तुम्ही खूप नशिबावान आहात की तुमच्या वर अमाप लोक प्रेम करतात. तुमच्या मनाची श्रीमंती अपरंपार आहे, अगणित आहे. तुमचं जमिनीशी जे नात टिकून आहे तेच खरतर एक मुख्य कारण आहे. आपली गिनती प्रेमाने जग जिंकनाऱ्यामध्ये होते यात कावडीमात्र शंका नाही. 
 
तथागत बुद्ध म्हणायचे की "माणसाची श्रीमंती त्याच्या वागण्यात आणि कर्म करण्यात असते" आणि ती श्रीमंती तुमच्यात आहे ती आम्ही पहिली आहे. 

आज या लिखाणातून मी सर्व निटोनवाले आणि वालविनॉक्स वाल्यांना विनंती करतो की आपल्या लहान मुलांना राजा-राणीच्या, राजकुमाराच्या गोष्टी सांगण्यापेक्षा आपल्या साहेबांच्या यशाच्या आणि माणुसकीच्या गोष्टी किंवा कथा सांगा आपल्या मुलांना यशाचा कानमंत्र दिल्या सारखं होईल तसेच त्यांना उत्तम कर्म करण्यासाठी प्रेरणा मिळेल. 

आपण म्हणजे शून्यातून स्वतःच सम्राज निर्माण करणारं एक प्रखर, प्रज्वल व्यक्तिमत्व तुमच्या बद्दल लिहावं तेवढं कमी तर बोलावं तितकं कमी आहे. आमच्या सारख्यांना परिसने आम्हास सोन्या सारखे बनवलं आम्हास अजून काय हवंय! या पेक्षा जास्ती आम्हास ना काही पाहिजे ना काही मागणे. फक्त तुमचा आशीर्वाद हवंय. तुमचं नाव मुखातून घेण्या अगोदर कान पकडाव तेवढी तुमची पावत्रता आहे आणि हे भाग्य मोजक्याच लोकांना लाभते. 
तुमच्या लोकसेवेला, तुमच्या कार्याला, सलाम!
आपण शतायुषी व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

*~यशवंत दत्तात्रेय ओव्हाळ*

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...