अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि सगळं काही उध्वस्त झालं.
एका रात्रीत शहर च्या शहर नष्ट झालं. झालेल्या नुकसानाचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एका लष्करी अधिकाऱ्याला अमेरिकेनं जपानला पाठवलं.
नागासाकी शहरात एका स्मशान भूमीच्या बाहेर त्या अधिकाऱ्याला हा मुलगा असाच उभा असलेला दिसला. साधारण दहा वर्षाचा हा मुलगा पाठीवर एक लहान बाळ घेऊन उभा होतं. अधिकाऱ्यांनी त्याच्या पाठीवरचे बाळ खाली उतरवले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते बाळ आधीच मरून गेलं होतं. तो मुलगा त्या बाळाला अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन आला होता.
ते बाळ त्याचा भाऊ होतं. ते बाळ अग्नीवर सोपवलं तेव्हा या मुलाच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा नाही निघाला. सरणाला आग लागली तेव्हा याने आपला खालचा ओठ दाताखाली गच्च दाबला. अगदी रक्त निघेपर्यंत दाबला. सरण धड धड पेटलं तेव्हा हा मुलगा मागे फिरून निघून गेला.
या सगळ्या काळात अधिकाऱ्याचे डोळे ओले झाले. त्या मुलाच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची पुसटशी रेष नाही उमटली. ताठ छाती करून तो मुलगा दुःखाला सामोरं गेला होता.
हा फोटो सगळ्या जपान साठी प्रेरणादायी ठरला. आजही जपान जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्यांच्या वृत्तपत्रात, हा फोटो छापून येतो. मोठ्या स्क्रीन वर दाखवला जातो.
- खिडकी
No comments:
Post a Comment