🔹धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास वाव नाही.🔹
"जुलमांतून अस्पृश्यांची सुटका कशी करून घेता येईल हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा प्रश्न आहे. या जुलमांतून सुटका करून घेण्यास सरकारची विशेष मदत होईल असे आम्हास वाटत नाही. सरकार हे स्पृश्य हिंदुंच्या ताब्यात नसले तरी त्यांच्या धोरणाने वागणारे आहे. स्पृश्य हिंदू समाज अस्पृश्यांना सुखाने, ऐष आरामाने नंदू देत नसेल तर त्यांनी परधर्माचा अवलंब करावा हेच बरे. अस्पृश्यांना स्पृश्य लोक कांकणभर देखील इतमामाने राहू देत नाहीत याचे कारण हिंदू धर्मात अस्पृश्यांचा दर्जा खालचाआहे. दर्जा वाटल्याखेरीज अस्पृश्यांना स्पृश्याप्रमाणे वागू दिले जाणार नाही आणि धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्याचे मार्ग नाही."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१९, पान नं.२९९)
दि.४ नोव्हेंबर १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' मध्ये प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
No comments:
Post a Comment