Wednesday, 12 January 2022

अमेरिका दौर्‍यावरून विवेकानंद परत आल्यावर महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, 'हा माणूस शूद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही !'

दक्षिणेश्वरांच्या मंदिराच्या पुजार्‍यांनी त्यांना पुजा करू न देता बाहेरचा रस्ता दाखवला.

भारतात पाय ठेवताच लोकांनी विवेकानंदांना मुंडन करायला लावले. कफनी घालायला लावली. या त्रासातून, तणावातून त्यांचे मधुमेहासारखे आजार बळावले.

बेलूर येथील मठ स्थापनेसाठी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकांने त्यांना मदत केली नाही. सारे पैसे त्यांच्या हेनरिटा मुल्लर या लंडनस्थित मैत्रीणीने दिले.

बेलूर मठाचे सभासद होताना धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. सर्व माणसे एकसमान आहेत, असे बेलूर मठ मानत होता.

विवेकानंदांच्या मृत्यूपश्चात कोलकात्याच्या कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीही छापली नाही. शोकसभेत शामिल होण्यास कोलकता उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी नकार दिला.

( श्री दत्तप्रसाद दाभोळकरांच्या 'विवेकानंदांचा धर्म' ह्या लोकसत्ता मधिल लेखातून  )

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...