हिंदुमहासभा आणि सुभाषबाबू
.........................................
Chittaranjan Bhat
साभार...
काँग्रेसचे पूर्वाध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची परवा जयंती आहे. आज पंतप्रधानांनी नेताजींचा भव्य पुतळा इंडिया गेटजवळ उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. हे उत्तम झाले. असो. त्यानिमित्त त्यांची एक आठवण ―
श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभा जॉईन केल्यानंतर एके दिवशी सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला गेले. दोघेही बंगालचे असल्याने त्यांच्यात आधीपासूनच चांगला परिचय असणे स्वाभाविक होते.
सुभाष बाबू मुखर्जींना म्हणाले, 'बंगालमध्ये हिंदू महासभेची राजकीय फळी निर्माण करायचा विचार देखील करू नका. आणि जर असं घडलंच तर ती निर्माण व्हायच्या आधीच तोडण्यासाठी मी प्रसंगी बळाचा देखील वापर करेन.'
श्यामाप्रसाद मुखर्जींनी हा प्रसंग त्यांच्या डायरीमध्ये जशास तसा नमूद केला आहे.
त्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी त्यांचे हे शब्द तडीस देखील नेले. परंतु या प्रकरणी त्यांना फार काही बळाचा वापर वगैरे करावा लागला नाही. त्याकाळचे हिंदू महासभेचे आणखी एक नेते बलराज मधोक यांनी सांगितलं की, 'सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या समर्थकांनी त्यावेळी धाकदपटशाहीने महासभेचे कार्यक्रम उधळून लावायचे प्रसंगी महासभेच्या कार्यकर्त्यांना झोडपून काढायचं अशा योजना बनवल्या. हे मुखर्जींना अजिबात रुचलं नाही आणि त्यांनी याबाबत ऍक्शन घेण्यासाठी सहकाऱ्यांची एक मिटिंग बोलावली. त्या मिटिंग मध्ये मुखर्जी बोलायला उठलेच होते की एक दगड भिरकन आला आणि त्यांच्या डोक्यात बसला. मुखर्जी रक्तबंबाळ झाले!'
सुभाषबाबूंनी बंगालमध्ये हिंदू महासभेची वासलात चालू व्हायच्या आधीच लावून टाकली होती.
---------
सद्यकाळात देशाला अशा नेताजींची आणि नेताजींच्या अशा जाज्वल्य विचारांची फार गरज आहे.
नेताजींना आदरांजली!
जय हिंद!!
No comments:
Post a Comment