Sunday, 23 January 2022

आज नेताजींचा जन्मदिन...या लढवय्या सेनानीला मनःपूर्वक सल्यूट !

नेताजी सुभाषबाबूंनी देशाला
जय हिंद 'असा तेजस्वी नारा दिला.

आणि आता छत्रपतीचां हर हर महादेव
या ही जयघोषा ऐवजी
आणि सुभाष बाबू यांच्या
जयहिंद ' या घोषा ऐवजी नियोजनपूर्वक 
जय श्रीराम 
लोकांच्या मुखी प्रस्थापित 
झालाय!

हा प्रयत्नच स्पष्टपणे दर्शवितो आहे की,
महापुरुषांचे विचारच नव्हे तर जनतेला ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या
घोषणा ही गायब केल्या जात आहेत.

एके प्रसंगी तर सुभाषबाबूंनी काँग्रेस कार्यकारिणीत ठराव करून, काँग्रेसजनांना संघ वा हिंदू महासभेशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यास मज्जाव केला होता !
कारण, हिंदूत्ववाद्यांच्या प्रत्येक चालीला ते ओळखत होते.

आणि आज हिंदूत्ववादी मोदींना सुभाषबाबूंप्रती आत्मीयता वाटू लागत्येय ! ती देखील निर्भेळ नाहीय. त्यामागेही, सुभाषबाबूंना स्वातंत्र्यलढ्यात प्रधानत्व देऊन नेहरूंना दुय्यम स्थानी ठेवण्याचा हीनकस विचारच आहे.

त्यामुळं, दोन्हीही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना काही फरक पडत नाही... कारण, दोघेही आमच्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील 
दीपस्तंभच आहेत !

आज नेताजींचा जन्मदिन...
या लढवय्या सेनानीला मनःपूर्वक सल्यूट !

मदन पाटील
[23/01, 9:48 pm] +91 97644 37884: 16डिसेंबर 1938, काँग्रेस
अध्यक्ष नेताजी सुभाषबाबू ने
एक प्रस्ताव पारित कर,
काँग्रेस के किसी भी
सदस्य को हिंदुमहासभा
और मुस्लिम लीग के 
सदस्य बनने पर
पाबंदी लगाई दी थी l
नेताजी संघ और हिंदुमहासभा विरोधी थे l

Referance :
Hindu Mahasabha in
Colonial North India
Prabhu Bapu Pg 40.

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

१. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. 'काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे' अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी 'असहकार' असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता.  

२. जो शब्द नेहरूविरोधकांना अजिबात आवडत नाही, 'समाजवाद'  त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू  एक गट आणि मोतीलाल नेहरू,  सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं कवटाळतात. 

३.आझाद हिंद सेनेच्या बाजूनं लढण्यासाठी नेहरूंनी पुन्हा एकवार काळा कोट अंगावर चढवला होता. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचा सन्मान स्वातंत्र्यानंतर नेहरूंनीच केला. सुभाषबाबू गेल्यानंतर त्यांच्या कुटूंबाची देखभाल व्हावी म्हणून पेन्शन नेहरूंनीच पुढाकार घेऊन सुरू केली.  

४. सुभाषबाबूंनी 'सहा महिन्यात स्वातंत्र्य" असा अशक्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात चेष्टेचा विषय बनू शकणारा ठराव पारित केला तेव्हा नेहरूंनी 'तुम्ही थोर देशभक्त आहात पण फार उतावीळ आहात'असं पत्र लिहीलं. त्या पत्रातून हृद्य संबंध सिद्ध होतो.

५. स्वातंत्र्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास बाबू उतावीळ होते. हिटलर, मुसोलिनी, अगदी कोणीही! अशा हुकूमशहांच्या मदतीनं येणारं स्वातंत्र्यही देशाला वारंवार हुकूमशाहीकडे नेईल म्हणून गांधी-पटेल-सरदारांचा त्यास कट्टर विरोध होता. 

६. काॅग्रेसमधून बाहेर पडल्यावर बाबू परदेशी गेले. तिथल्या पत्रकारांनी विचारलं की गांधीजींच्या आणि तुमच्या मतभेदांबद्दल काय सांगाल? बाबू ताबडतोब उत्तरले "आमच्या संस्कॄतीत बाप लेकाचं भांडण लोकांसमोर उघड करत नसतात!' 

या इतिहासाचं ज्यांना आकलन करणं शक्य आहे त्यांनी करा.  

मर्जी है आपकी, आखिर सर है आपका!

आनंद शितोळे सर

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...