Tuesday, 11 January 2022

हिंदूधर्माचा सिद्धांत आणि लोकशाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर



हिंदूधर्माचा सिद्धांत आणि लोकशाही -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर


       येथील लोकशाही बलशाली करायची असेल तर तिचा आधार येथील प्राचीन वैचारिक जीवनात शोधला पाहिजे, या दृष्टीने भारतीय लोकशाहीची मुळे याचा शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मन घेत असताना या लोकशाहीचा येथील परंपरेशी, प्राचीन जीवनाशी सांधा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न सतत सुरू होता. याबाबत विचार करताना ते म्हणतात," येथील प्राचीन काळातील ब्राम्हवाद लोकशाही तत्त्वज्ञानाचा उत्तम आधार होऊ शकला असता. जुन्या काळातील ब्रम्हवादाची कल्पना ख्रिश्चन, मुस्लिम व ज्यू धर्मातील ईश्वर विषयक कल्पनेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. या धर्मामध्ये ईश्वर हा धर्माचा निर्माता. तो श्रेष्ठ व सर्व माणसे ही त्याची लेकरे अशी कल्पना आहे. यामध्ये निर्माता व माणसे यामध्ये अंतर आहे. द्वैत आहे.

         परंतु ब्रह्मवादाची कल्पना या विचारापेक्षा मूलतः वेगळी आहे. येथे सर्व माणसे ही ब्रम्हाची रूपे आहेत. ब्रह्म आणि माणसे ही एकच आहेत. त्यात कसलाही भेद नाही. अद्वैताचीही कल्पना समतेच्या दृष्टीने अधिक श्रेष्ठ दर्जाची आहे. या ब्रह्मवादातून लोकशाही जीवनाचा वृक्ष चांगला फोफावला असता. परंतु दुर्दैवाने जातीवादाने ब्रह्मवादातील समतेचा विचार मारून टाकला. यासंबंधीचे विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' Riddles in Hinduism' An Exposition to Enlighten the Masses' या पुस्तकातील 22व्या निबंधास केले आहे.

    🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१९, पान नं. ४०३.)

#Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches,vol.4,P.p.284-287.

🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...