Monday, 3 January 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतिकारी अभिवादन !

सन 1890 साली पुण्यात एक अभूतपूर्व घटना घडली . 

एक स्त्री हातात टिटव धरून ,
धर्मशास्त्राला ठामपणे नकार देत 
शवयात्रेच्या पुढे खंबीर पणे 
स्मशानाच्या दिशेने निघाली होती. 
भारतातील समस्त स्त्रियांना माणूसपण देणार्‍या महात्म्याची
ती अंत्ययात्रा होती. 
हाती टिटव धरलेली करारी स्त्री सावित्रीमाई फुले होती. 
स्त्रियांच्या उद्धार करणाऱ्या 
महामानवाला अखेरचा अग्नी ही 
एका स्त्रीनेच दिला ही अपूर्व घटना अद्वितीय नव्हे काय !

ज्योतीबा सारखा जीवनसाथी
लाभला आणि तेजाळून गेलेल्या सावित्रीमाईंने असंख्य अशा स्त्रियांचे जीवन उजळून टाकले. 
आजही ती ऊर्जा तेजःपुंज आहेच. 

सावित्रीबाई बद्दल काय काय सांगाव ! 
एक निरंतर तेवत राहणारी ज्योती आजही प्रकाशमान आहे. 
स्त्रियांच्या व्यथा यातना हेच त्यांचे जीवन होते. हे इतिहासाला पानोपानी नमूद करून ठेवावे लागले आहे. भारतीय स्त्रियांचे अंधारातील यातनामय विश्व
माई मुळेच प्रकट झाले. 

बालवयातच लग्न करण्याची प्रथा समाजात प्रतिष्ठित असल्याने, बालविधवा होण्याचे प्रमाण ही होतेच. या बालविधवा 
वासनेच्या शिकार न होतील तर नवलच ! त्यांचे कुटुंब त्या मुलींचे काय करत असेल हे लिहायला नकोच .  

या गरोदर विधवां साठी 1863 साली स्वताच्या घरातच 
बालहत्या प्रतिबंधकगृह माईनी निर्माण केले. आणि समाजाच्या वासनेच्या शिकार झालेल्या विधवांना जीवन संपवू नका विहिर जवळ करू नका , माझ्याकडे या आणि सुखरूप बाळंत व्हा .हा मायेचा आधार भारतातील एकमेव उदाहरण आहे. यातील एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेवून त्याचे नाव यशवंत ठेवले .पुढे ते डॉक्टर झाले. 

त्या काळी अशा अनेक अघोरी अनिष्ट धार्मिक प्रथांनी समाज जर्जर करून ठेवला होता. 

त्यातील एक अमानुष प्रथा म्हणजे ब्राह्मण विधवांचे मुंडण करणे होय. या प्रथे विरोधात नाभिक समाजाचे नेते सदोबा कृष्णाजी यांचे सहकार्य घेवून मुंबई मधे सन 14-4-1890 रोजी मुंबई मधे नाभिक समाजाची सभा आयोजित करून , नाभिक समाजाची मदत घेवून ,
पुण्यात ब्राम्हणविधवांच्या केशवपन मुंडना विरोधात माईनी 
नाभीकांचा संप घडवुन आणला. 
किती विलक्षणच आहे हे. 
त्या काळात................
...........
आजही डॉ .नरेंद्र दाभोळकरांची दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या केली जाते. 
विचार करा..... केवढे माऊलीचे धाडस.

सावित्रीमाई बद्दल खूप खूप लिहिता येईल. 10 मार्च 1897
ला पुण्यात पसरलेल्या भयानक 
अशा प्लेग च्या साथीत त्यांनी 
लोकांच्या रोगग्रस्थ लोकांकरिता सेवा करताना त्यांची अखेर झाली. 
विशेष म्हणजे त्याआधी 1890 ला जोतिबा हे जग सोडून गेले होते. 
पण त्यांनी पेटवलेली ज्योत तिच्या अंतापर्यंत महात्म्या च्या 
तेजाने तेवतच होती. 

काय बोलाव !
सर्व काही विलक्षणच 
भारताती सर्वोत्तम क्रांतीकारी अद्वितीय दाम्पत्य म्हणजे ज्योति सावित्री होय. 
करण धर्मांध झुंडी विरोधात लढून, माणुसकीला जपणे सोपे नव्हे. 

शाम lllll

********
ज्यावेळी तुमच्या समोर चहुबाजूने घेरलेला एक भलामोठा अभेद्य वाटणारा पहाड/ किल्ला असतो,
 
आपण काही कृती केली नाही तर आपण यातच गुदमरून मरणार हे माहित असते; मीच नाही तर माझ्या आधीच्या पिढ्या तशाच मेल्या आहेत हे माहित असते; माझ्या पुढच्या पिढ्या देखील तशाच मरणार आहेत याची खात्री असते
 
भावनिक प्रतिक्रियांना मर्यादा असतात एव्हढेच नव्हे तर त्या तुमचाच शक्तिपात करत असतात; कितीही डोके आपटले तरी किल्ल्याला ढिम्म काहीही होणार नाही असे वाटत असते; 
 
त्यावेळी त्या पहाडाच्या पायातील एक भलामोठा दगड चिणायाचा असतो, बाहेर काढायचा असतो ! मग यथावकाश इतरही चिरे हळू लागतात ; चिरे हलत आहेत म्हटल्यावर गलितगात्र केली गेलेली अनेक पुढे येतात 
 
कितीही अभेद्य वाटला तरी पहाडाचा / त्या तुरुंग किल्याचा “जीव” त्याच्या पायात असतो !
 
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हेच केले !

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतिकारी अभिवादन !

संजीव चांदोरकर (३ जानेवारी)

**********************

१८९६ साल... पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज ३७६ लोक मेले! आज २८९ लोक लोक मेले ! अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या... ब्राह्मण विधवेचा दत्तक घेतलेला सावित्रीमाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीमाईंनी त्याला तार करून पुण्याला बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून त्याला दवाखाना सुरू करायला लावला. तो माईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीमाईंचा एकच प्रश्न होता,"आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय ? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवू या..."

त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं. अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रॅंडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती.सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या. इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला.पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. त्यावेळी पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते.

मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते. सावित्रीमाई तिथं धावून गेल्या.पांडुरंग गायकवाड नावाचा ११ वर्षांचा मुलगा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला. एका चादरीत त्या पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं. सावित्रीमाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. सात  वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता.६७ वर्षे वयाची एक वृध्दा अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते. त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो.. मोठा होतो. 

देव आणि देवमाणूस फरक...

सावित्रीमाईं अखंड रुग्णसेवा करत राहिल्याने त्यांना प्लेगचा संसर्ग झाला. पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण. सलग ५० वर्षे आपला देह समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता तो देह थकला होता. १० मार्च १८९७ रोजी प्लेग रूग्णसेवेचं काम करत असतानाच सावित्रीमाईंनी जगाचा निरोप घेतला.... खरेतर त्यांनी समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती...

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...