मनुष्याचं जिवन हे खरं तर संघर्षमय आहे,
जास्त अपेक्षा नसतील तर सुखमय आहे.
सर्वी स्वप्ने पुरी होतील त्यासाठी संयम हवाय,
स्वतःवर विश्वास आणि मनगटात जोर हवाय.
भले मेंदूत विचारांची अगणित गर्दी असेल
तुझी प्रेरणा महापुरुषांच्या विचारांत असेल
विश्वास ठेव स्वतःच्या विचारशील मनावर
वर्तमानाला सामोरे जाण्याची ताकतीवर
स्वता जेव्हा सिद्ध होशील तेव्हा गर्विष्ठ होऊ नकोस
बघ सारे विश्व तुझेच असेल सिना तेव्हा फुलऊ नकोस
उर्मीची आणि गर्वाची भाषा कधी तू बोलू नकोस
प्रेमाने जग जिंकता येतं हे तू कधी विसरू नकोस
मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे हे तू विसरू नकोस
तुला मरणा नंतरही जिवंत राहायचं आहे हे विसरू नकोस
बालपणीचे तथा वाईट दिवसांची मदत तू विसरू नकोस
आजनम मनुष्य बनून राहा प्राण्यासारखं तू राहू नकोस
- यशवंत द. ओव्हाळ
https://yashovhal23.blogspot.com