Sunday, 21 August 2022

तिच्यावर पूर्ण प्रेम

कोवळ्या उन्हात जीव कासावीस झाला,
ती नाही म्हणून तिच्या मैत्रिणींला जीव लावला.

प्रेम जरी तिच्यावर होतं त्याला मी काय करणार,
अस्तित्वात दुसरी आहे हे मी कसे नाकारणार.

ती जरी संगे असती तरी मी कंगाल असतो,
आणि जरी ती नाही तरी पण मी कंगलाच आहे.

साला समजायला मार्ग नाही कि फॉल्ट कोणात आहे,
तिच्यात, माझ्यात का प्रेमात.....

फॉल्ट जरी कोणतहीं असो पण एक गोष्ट लक्षात आली,
जरी ती नसली तरी संसार मात्र जोमात आहे.

आत्ता काय करावं काही केल्या उमगत नाही.
ती नाही पण तिची मैत्रीण मात्र वाईट नाही.

मसनात गेली ती आणि मसनात गेला तीचं प्रेम.
आत्ता माझी सखी बरी आणि तिच्यावर पूर्ण प्रेम.

~ यशवंत द. ओव्हाळ 

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...