Tuesday, 10 May 2022

अचानक टिपलेल्या या छाया चित्रात संगीताची एकाग्रता दिसून येते.


अचानक टिपलेल्या या छाया चित्रात संगीताची एकाग्रता दिसून येते. 
एक लग्नातील टपलेले हे चित्र आहे. नवरा मुलगा लग्नासाठी जाताना बेंजो वाजत होता आणि हा मुलगा अगदी एकाग्रतेने बेंजोच्या सुरांचा आगदी मग्न होऊन गेला होता. सूर, लय आणि ताल  यात तो हरवून गेला होता. पेहराव साधा, पायात चप्पल, हाताची घडी अगदी मोठया माणसाला येणार नाही अशी आणि विशेष म्हणजे डोक्याला KGF च्या रॉकीभाई सारखा बांधलेला. लहान पण किती छान असताना. कसली लालसा नाही, कोणाचं काही देणं नाही घेणं नाही. कधी कधी तर वाटतं की "लहानपण देगा देवा"

Saturday, 7 May 2022

सर्व धर्म समभाव


काही लोकं तुमच्या हातात धर्माचा भोंगा देतील, विषमतेचा भोंगा देतील, हुंदुत्वाचा भोंगा देतील पण तुम्ही आपल्या विचारशक्तीच्या, शिक्षणाच्या जोरावर केवळ आणि केवळ माणुसकीचाच भोंगा आणि झेंडा हातात घ्या. सत्तेसाठी भुकेलेल्या राजकारणी लोकांनां तुमच्याशी नाही तर त्यांच्या स्वार्थाची भूक आहे. जो तो आपली पोळी भाजून घेत आहे. माणसात माणसात वाद म्हणजे कोणाचा तरी (राजकारणी लोकांचा)फायदा हे समीकरण आहे. हे समीकरण आपल्याला समजलं पाहिजे. 

मित्रहो आत्ता आपण समजदार झाले आहोत स्वतःचा, समाजाचा आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करा कारण तुम्ही केवळ भारतीय नागरिक नाहीत तर देशाचं भविष्य आहेत. तुमचा रास्ता तुम्हालाच निर्माण करायचा आहे. तो ही स्वतःच्या बुद्धीच्या बळावर. आज तुम्हाला एकत्र या असे सांगणारे खूप कमी आहेत पण जातीय द्वेष निर्माण करणारी अनेक लोक भेटतील पण आपण जाणकारा प्रमाणे वागवे. समाज एकत्र येणे खूप गरजेचे आहे कारण यातच आपली आणि समाजाची प्रगती अवलंबून आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी करावा. हेच सत्य आहे. 

कोणीतरी खूप चांगलं म्हंटलेले आहे की "भगवाने हमें आदमी बनाके इस धरती पर भेजा है और हमें इंसान बनके मरना है।" खरं तर आदमी आणि इंसान यात खूप तफावत आहे ती तफावत काय आहे ही आपणाला समजून घेणे आहे. मी हिंदू, मी मुस्लिम, मी शीख, मी पारशी, मी अमुक, मी तमुक हे काही नसतं तर मी भारतीय आहे हे लक्षात ठेवा आणि मनामध्ये फिट करून ठेवा. सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे या परंपरेला कधीही तडा जाता कामा नये. 

मित्राहो कोरोना काळात आपण बरेच शिकलो आहोत तेव्हा आपल्याला सावरायला आणि मदतीला राजकारणी न्हवते तर आपलेच भाऊ बंधु, शेजारी पाजारी, मित्र मंडळी, नातेवाईक आणि सगे संबंधी होते कोणी राजकारणी न्हवते आणि जे राजकारणी आले ते स्वार्थ पोटी आले काही अपवाद असतील ही, पण आत्ता मात्र विचार करा. चांगले राहा सर्वाशी मिळून मिसळून राहा. जात धर्म यात काही ठेवलेल नाही. यात कृपा करून अडकू नका कारण सर्वाचं रक्त लालच आहे.
जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय भीम !!
~ यशवंत द. ओव्हाळ 

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...