Saturday, 19 February 2022

म्हणुनच ते रयतेचे राजे होते.

धर्माच्या बाबतीत छ.शिवाजीमहाराज
यांचे धोरण औदार्याचे व सहिष्णुपणाचे होते.आजच्या जातीयवादी द्वेषाचा गंधही
त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी देवळlना
जशी नवी इनामे दिली तसे त्यांच्या
राज्यातील मशिदिना मिळणारी जुनी
इनामें चालू ठेवली आणि नवीही दिली
आहेत. 
याचे उल्लेख सभासद बखर व् इतर
साहित्यात आहेत.             
......छ. शिवाजीमहाराजांना रयतेचे
राजे का म्हणतात याचा पुरावा
सभासद बखरीतील " रयत " या
शीर्षकाखाली जी नोंद सभासदानी
केलीआहे त्यावरून मिळतो.
छ.शिवाजी महाराज म्हणतात,
' जमिनदार, देशमुख,देसाई, ह्यांचे
जप्तीखाली कैदेत रयत नाही.
यांनी साहेबी करून रयत नांगवीन
म्हटलीयाने त्यांचे हाती नाही.
      म्हणून ज़मीनदार, देशमुख देसाई कुलकर्णी मोकाशी , जहागिरदार 
सरंजामदार ,वतनदार यांची" रयत
कैह ' नाही असे म्हणणारे छ.शिवाजी
महाराज लोककल्याणकारी राजे होते.
   म्हणुनच ते रयतेचे राजे होते.

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...