Monday, 3 January 2022

सावित्रीमाई फुले जयंती प्रेरणा काव्य(महिला दिन प्रबोधन)


◆ सावित्रीमाई फुले जयंती प्रेरणा काव्य
(महिला दिन प्रबोधन)
----------------------------------------------

नवतरुणींनी यावे,
नारीशक्ती गुण घ्यावे।ए
आदर्श त्यांचे घ्यावे,
एक धागा तुम्ही व्हावे।।ध्रु।

अज्ञानाच्या निखार्यातूनी,
तुम्हास केले मुक्त।
क्रांतीसूर्याच्या नवज्योतीने,
बनली ती हो सशक्त।।1।।
गुलामीचे ते बंधन तोडून,
"सावित्री फुल"व्हावे....
आदर्श त्यांचे घ्यावे.....

झाशीसाठी "झाशी" रागिणी,
गर्जुनी योद्यावरती।
अहिल्याबाई"तशीच होती,
लोकमाता तिज म्हणती।।.
मानवतेची शिकवण ज्यांची
"मदर तेरेसा"बनावे।।2।।
आदर्श त्यांचे.....

दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्या,
झिजविली काया जिने।
साथ भिमाला जन्मोजन्मी ची
पचवूनी दु:खे तिने।।
अशा रमाई" च्या चरणावरती
नतमस्तक तुम्ही व्हावे।।3।।
आदर्श त्यांचे घ्यावे.....

स्वराज्य तोरण बांधण्यासाठी
घडविले छत्रपतींना ।
दिधली शिकवण घडोघडीला
आदर्श ती शिवबांना।।
लाख पोशिंदा असा घडवण्या
तुम्ही"जिजाऊ"व्हावे।।4।।
आदर्श त्यांचे व्हावे....

सुनिताकल्पनाजावूनभिडल्या
ठाव घेत अवकाशा ।
स्नेहासानिया राही तेजस्विनी
लौकिक सार्या देशा।।
निलासत्यजी बहिणाईसम
"सिंधू सपकाळ " व्हावे।।5।।
आदर्श त्यांचे व्हावे.....।

चला करु मानाचा मुजरा,
महान त्यांचे कार्य ।
हिंमत बांधून अवलंबावे,
प्रशंसनीय ते धैर्य।।
आदर्श होण्या भारत सारा,
स्मरण तयांचे करावे।।6।।
आदर्श त्यांचे घ्यावे...

नवतरुणींनी यावे
नारीशक्ती गुण घ्यावे
आदर्श त्यांचे घ्यावे
एक धागा तुम्ही व्हावे।।

 
सर्वाना 
सावित्रीमाई फुले जयंती निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा



No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...