Friday, 17 December 2021

आभाळाएवढा माणूस -- Dr. A P J Abdul Kalam

 

■ आभाळाएवढा माणूस ■

एकदा अब्दुल कलामांना एरोडे येथे एका कार्यक्रमात बोलावलं होतं,
तिथे त्यांना भेट म्हणुन प्रायोजकाने त्यांच्या कंपनीचा मिक्सर देउु केला,तो घेण्यास कलामांनी नकार दिला मात्र त्यांच्या कुटुंबाकरीता त्यांना मिक्सर हवा होता .
त्यामुळे त्यांनी त्या मिक्सर च्या किंमतीएवढा ४८५० रुपयांचा धनादेश प्रायोजकांना देऊ केला अन तो मिक्सर विकत घेतला.
पण त्या प्रायोजक कंपनीने एक महिना झाला तरी तो धनादेश बँकेत जमा न करता तसाच ठेवला.

एक महिना झाला तरी धनादेश वटला नाही हे पाहून कलामांच्या कार्यालयातून त्या कंपनीला फोनकरून धनादेश न वटल्या बद्दल चौकशी केली गेली.
त्या प्रायोजक कंपनीने देखील धनादेश जमा करणार नसल्याचे सांगून टाकले. त्यावर धनादेश जमा करणार नसाल तर ते मिक्सर कंपनीच्या पत्त्यावर परत पाठवून देऊ असे कलामांनी कंपनीला सांगितले, त्यावर त्या कंपनीने तो धनादेश बँकेत जमा करण्याची तयारी केली, तत्पूर्वी त्या धनादेशाचे एक प्रत छायांकित करून संग्रही ठेवली .

दुसऱ्याच दिवशी धनादेश बँकेत जमा होऊन तो वटवला गेल्याचे काळातच कलामांच्या कार्यालयातून पुनःश्च आभार मानणारा दूरध्वनी गेला,
ही घटना ऑगस्ट २०१४ मधील असून त्या कंपनीचे नाव सौभाग्या ग्राइंडर्स असे आहे.
सोबत त्या धनादेशाचे प्रत जोडत आहे .

#सलाम_कलाम

- देवा झिंजाड, ९८८१२३५३७७
गारखिंडी, ता पारनेर, जिल्हा - अहमदनगर
®©®©®©®©®©®©®
#कलाम #APJAbdulKalam #सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #devazinjad #आठवण

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...