एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर
आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ
शब्दांचा संग्रह नव्हती, तर लाखो
भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे
म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे अमर गीत “वंदे मातरम्!” भारतीय
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णाक्षर होती आणि आजही आहे. हे गीत प्रथम
त्यांच्या "आनंदमठ" (१८८२) या कादंबरीत प्रकाशित झाले होते, जे बंगालमधील संन्यासी बंडाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते.
तथापि, ते लवकरच
संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चेतनेचे प्रतीक बनले. "वंदे मातरम्"
म्हणजे "मी मातृभूमीला वंदन करतो." हे केवळ अभिवादन नाही, तर मातृभूमीसाठी पूर्ण समर्पण आणि बलिदानाची घोषणा होती.
इंग्रज भारतात व्यापाराच्या उद्देशाने इ.स. १६०० मध्ये आले
होते. परंतु इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने प्रथमतः ३१ डिसेंबर १६०० रोजी ईस्ट
इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याचा अधिकारपत्र (चार्टर) दिले. कंपनीने
भारतात व्यापारासाठी आपला प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स याला मुघल बादशाह जहांगीरच्या
दरबारात पाठवले आणि त्यांस तेव्हपासून व्यापाराचा अधिकार प्राप्त झाला. इ.स. १६११
मध्ये मसुलीपट्टणम येथे इंग्रजांनी आपली पहिली तात्पुरती व्यापारी वखार (Factory) स्थापन
केली आणि त्याचं बरोबर आपला देश इंग्रजांचा गुलाम बनण्यासाठी पहिला पाऊल पडलं.
सुरुवातीला त्यांचा उद्देश केवळ व्यापार करणे हाच होता परंतु, नंतर मुघल सत्तेच्या कमकुवतपणामुळे त्यांनी हळूहळू भारतीय राजकारणात आणि
समाजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आणि आपले साम्राज्य विस्तारले अगदी
थोड्याचं काळात आपला देश इंग्रजांच्या अधीन झाला त्यानंतर "सोन्याची
चिडिया" म्हटलं जाणारा हा देश इंग्रजांनी आपल्या दोन दोन हातांनी अगदी जान
जाई पर्यंत लुटला, त्यामध्ये आपण बऱ्याच मौल्यवान वस्तुंना
आणि अधिकारांना मुकलो ते अगदी कायमचे. आपला देश गुलामीच्या बेढ्यामध्ये अडकलेला,
जरी माणूस म्हणून जन्म झाला असला तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार
मात्र न्हवता, एखाद्या पशु सारखी वागणूक इंग्रजांनी
भारतीयांना दिली. स्वतःच्या देशात सन्मान तर सोडाच काही ठरविक ठिकाणी देखील
जाण्याचा किंवा त्या जागेच्या आसपास फिरण्याचा हि अधिकार नव्हता.
इ.स. १६०० ते इ.स. १८८२ पर्यंत अनेकदा स्वतंत्रवीरांनी
स्वातंत्र्याचा घाट घालण्यात प्रयत्न केला पण दुर्दैव भारतभूमीचे योग्य दिशा
नसल्याने आणि काहिक गद्दारांमुळे ते स्वप्न कधी सत्यात उतरलेचं नाही. त्याचं वेळी
उच्च शिक्षित बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या लेखणीतून शब्दबंध केलेल्या
"आनंदमठ" या कादंबरीतून १८८२ मध्ये "वंदे मातरम्" या गीताच्या
माध्यमातूम आजादीचा नवा नारा दिला. निद्रिस्त जनतेला जागृत करण्यासाठी
शब्द-अग्नीचे डागच द्यावे लागतात अगदी याचं प्रमाणे या "वंदे मातरम" ने
देशभक्तीची आग जनसमुदायामध्ये पेटविली आणि निर्माण झाला एक नवीन जणसमुदाय जो
देशाच्या स्वतंत्रताची मागणी करू लागला. अशा परिस्थितीत, "वंदे
मातरम्" ने भारतीयांना आठवण करून दिली की त्यांची मातृभूमी ही एक सामान्य
भूमी नाही तर एक जिवंत देवी आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि
सरस्वती यांचे एकत्रित रूप. गाण्याच्या ओळी - "सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलम्,
शस्यशामलम् मातरम्" - भारताच्या नैसर्गिक संपत्तीचे, नद्या, पर्वत, शेते आणि फळांचे
चित्र रेखाटतात ज्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या रक्तात देशभक्तीची लाट निर्माण
झाली. हे गाणे अगदी कमी वेळात स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आणि जनसमुदायामध्ये
लोकप्रिय झाले.
सदर गीताने
भारतीयांना आठवण करून, “आपली मातृभूमी जिवंत आहे… आणि तिचं रक्षण करायचं दायित्व
आपल्या रक्तात आहे!” त्या काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसेवकाच्या तोंडात “वंदे
मातरम्” हा मंत्र होता. ब्रिटिशांची सत्ता हादरली कारण या दोन शब्दांत संपूर्ण
भारत एकवटला होता. ज्यांच्या हातात तलवार नव्हती पण त्यांनी “वंदे मातरम्”च्या
हाकेचा लढा दिला. त्या हाकेत बंदुकीची गोळी नव्हती, पण त्यात
हृदयात झिरपणारा बाण होता.
स्वदेशी चळवळीदरम्यान आणि बंगालच्या फाळणीविरुद्धच्या
निदर्शनांमध्ये त्याचा वापर झाला, ते अवज्ञाचे एक शक्तिशाली प्रतीक बनले. स्वातंत्र्य आणि
एकतेचे प्रतीक बनले. सदर गाण्याने वेगवेगळ्या प्रदेशातील, धर्मातील
आणि पार्श्वभूमीतील लोकांना एक निष्ठ आणि सक्षम बनवण्यासाठी अनमोल सहकार्य केले.
निषेध आणि निदर्शने दरम्यान ते एक रॅलींग ओरड आणि प्रेरणा स्रोत म्हणून याचा उपयोग
झाला. श्री अरबिंदों यांसारख्या नेत्यांनी तर या गाण्याला सामूहिक चेतना जागृत
करणारा आध्यात्मिक "मंत्र" म्हणून याचा वापरला आणि त्यामुले निर्माण
झाली सर्वात मोठी ऊर्जा याच ऊर्जेचा वापर राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचं सर्वात
मोठं काम करण्यात आलं.
"वंदे मातरम्" हे पहिल्यांदा १८९६ च्या कलकत्ता
अधिवेशनादरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. या
अधिवेशनाला भारतीय इतिहासात अनेक कारणांमुळे खूप महत्त्वाचे स्थान आहे, त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे इतक्या महत्त्वाच्या व्यासपीठावर
"वंदे मातरम्" चे पहिले सार्वजनिक सादरीकरण झाले. या महत्त्वपूर्ण
सत्रात आदरणीय कवी, संगीतकार आणि नोबेल पुरस्कार विजेते
रवींद्रनाथ टागोर यांना "वंदे मातरम्" हे अमर गीत गाण्याचा मान मिळाला.
त्यांच्या सादरीकरणाने हे गाणे व्यापक राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि वाढत्या
स्वातंत्र्य चळवळीत त्याची भावना खोलवर रुजवली. सार्वजनिक सादरीकरणानंतर, सदर गीत हे भारतीय राष्ट्रवादी चळवळीसाठी वेगाने एक शक्तिशाली गाणे बनले.
त्याच्या भावपूर्ण बोल आणि शक्तिशाली संदेशाने देशभरातील असंख्य व्यक्तींना
ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले.
स्वातंत्र्यसैनिकांसाठी ते एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनले. सदर गीत
लाला राजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र
पाल यांसारखे क्रांतिवीर याचं गीताचा वापर बार बार आपल्या भाषणातून करीत असत,
तसेच क्रांतिकारी संघटनांनी तर यास आपलं ब्रीद वाक्य बनवलं होतं
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन एसोसिएशनचे सदस्य तर हे गाणी गात हसत हसत फाशीवर
चढले, भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव हे
तर जेल मध्ये “वंदे मातरम्” चे जयघोष देत
असत. बटुकेश्वर दत्त ने तर असेम्ब्लीत बॉम्ब फेकताना देखील याचा वापर केला होता.
पुरुष पुढे होतीच त्याचं प्रमाणे महिलाही मागे न्हवत्या मादाम कामा, दुर्गा , प्रीतिलता वावेदार यांसारख्या रण रागिणींनी
पण आपला संकल्प मंत्र बनवला.
गुलाम भारतात "वंदे मातरम्" हे देखील वादात
सापडले. काही मुस्लिम संघटनांनी आणि कट कारस्थान्यांनी या गाण्याच्या काही भागात
धर्माच्या काही त्रुटी काढल्या गाण्याच्या काहिक भागास मूर्तिपूजक मानले, म्हणून स. न. १९३७ मध्ये काँग्रेसने सदर गाण्याला राष्ट्रीय
दर्जा देण्याचा निर्णय घेतला असता काही अटी मजूर केल्या आणि वादामुळे फक्त पहिले दोन श्लोक स्वीकारले गेले.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस दोघेही याला अनुकूल होते, परंतु काँग्रेसने तडजोड केली. तरीही, ते लोकांच्या मनात राहिले आणि याच एकमेव कारणाने गुलाम भारतात
"वंदे मातरम्" चा प्रभाव कमी पडू लागला. पण नामशेष झाला नाही.
"वंदे मातरम्" हे केवळ एक गाणे नाही तर भारताच्या आत्म्याचा आवाज आहे.
ते आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य ही देणगी नाही, तर लाखो बलिदानांच्या किंमतीवर मिळवलेला विश्वास आहे.
जेव्हा जेव्हा आपण हे गाणे गातो तेव्हा आपण त्या असंख्य क्रांतिकारकांना
श्रद्धांजली वाहतो ज्यांनी त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. हे गाणे आपल्याला हे
देखील शिकवते की मातृभूमीपेक्षा मोठा कोणताही धर्म, पंथ, श्रद्धा नाही.
हेच त्याचे सार आहे. भारत मातेचा आदर, भारत मातेला पूर्ण समर्पण.
किती पिढ्या गेल्या, किती झेंडे फडकले, किती नद्या कोरड्या झाल्या...पण या गीताचा एकही स्वर जुना
झाला नाही. आजही शाळांमध्ये मुलं हे गीत गातात, सैनिक सीमारेषेवर पुटपुटतात आणि कुणी राष्ट्रीय गीताच्या
आवाजात उभं राहतो तेव्हा अंगावर काटा येतो. मातृभूमीच्या रक्तात, तिच्या पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये आणि आपल्या प्रत्येक श्वासात, क्रांतीचा जयघोष बनलेलं असं हे गीत १५० वर्ष पूर्ण करत आहे, पण या १५० वर्षांच्या टप्प्यावर प्रश्न फक्त एकच आहे, आपण काय करतो त्या मातृभूमीसाठी? आपण त्या मातेला परत काय दिलं? आपण तिची माती जपली का? तिचं पाणी, तिचं आकाश, तिच्या भाषेची शुद्धता जपली का? की आपण तिच्या कुशीत राहूनही परकीय मोहात हरवलो?
सैनिकाची रक्ताळलेली माती पाहतो, तेव्हा त्या मातीने घेतलेला श्वास म्हणजे “वंदे मातरम्”.
राष्ट्रध्वज वाऱ्यात फडफडताना दिसतो, तेव्हा त्या तिरंग्याच्या रंगांत मिसळलेले शब्द म्हणजे “वंदे मातरम्!”
म्हणूनच "वंदे मातरम्" हा केवळ स्वातंत्र्याचा
मंत्र न्हवता तर प्रत्येकाच्या जीवनाचा मंत्र आहे. जोपर्यंत भारतातील एक व्यक्तीही
हे गाणे मनापासून गाऊ शकते, तोपर्यंत भारताचा आत्मा जिवंत राहील.
शेवटी आदराचा
आणि अभिमानाचा "वंदे मातरम्"
वंदे मातरम्, वंदे
मातरम्,
सुजलाम् सुफलाम्
मलयज शीतलाम्,
शस्य-श्यामलाम्
मातरम्॥ वन्दे मातरम्॥ १॥
शुभ्र-ज्योत्सनां पुलकित यामिनीम्,
फुल्ल कुसुमित
द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर-भाषिणीम्।
सुखदाम् वरदाम्
मातरम्॥ वन्दे मातरम्॥ २॥
भारत माता चिरंजीव हो!
