बुद्धं सरणं गच्छामि ।
धम्म सरणं गच्छामि ।
संघ सरणं गच्छामि ।
महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या तमाम देशवासीयांना मंगल दिवसाच्या सद्धम्मेच्छा..!🌹
हा खास दिवस तुमच्या आयुष्यात सुख, शांती घेऊन येवो
हीच मंगलकामना..!🌹
चित्त आत बाहेर परिशुद्ध होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ।।
प्रज्ञा शील समाधीने समृद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते।
वैशाख पौर्णिमेची धन्य रात्र झाली।
सम्बोधि मिळाली बोधिवृक्षाखाली ।
दुर्धर त्या मारासंगे महाबुद्ध होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते || १ ||
जागृत सम्पूर्ण जीवनमुक्त होते।
ऋद्धि सिद्धि पारमिता तेजयुक्त होते।
जगी सर्व श्रेष्ठ स्वयमसिद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥२॥
आत्मा ईश्वराला झूठ मानणारा ।
तिन्ही काळातील ज्ञानी लोक जाणणारा ।
बहुजन हिताय सुखाय वचनबद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥ ३ ॥
असा महाकारुणिक लोकनाथ महर्षी ।
सर्व शास्त्र विज्ञानाच्या दर्शनास स्पर्थी ।
रोज पायी यात्रा जरी वृद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥४॥
गगन धुन्ध व्हावे समुद्रातील पाणी।
क्रोध शांत होती अशी होती वाणी।
'सूर्यकान्त त्रिपिटकात हेच शब्द होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ||५||
नमोबुध्दाय..जयभीम..!