Saturday, 23 April 2022

पुस्तक दिन विशेष

आज जगविख्यात नाटककार 'विल्यम शेक्सपिअर' यांचा आज स्मृतिदिन आहे. हा दिवस 'जागतिक ग्रंथ दिन' म्हणून साजरा केला जातो. जगातील बहुतेक सर्व मुख्य भाषांमध्ये शेक्सपिअर यांची नाटकांची भाषांतरे झाली आहेत आणि त्यांना खूप सारा प्रतिसाद हि मिळालेला आहे. शेक्सपिअर मोठाच होता, पण आपले संत तुकाराम, अण्णा भाऊ साठे त्याच्या तोडीस तोड होते. फरक एव्हढाच आहे की प्रत्येक इंग्लिश माणसाला शेक्सपिअर मोठा वाटतो आणि बहुतांशी मराठी माणसांना तुकारामांचे आणि अण्णा भाऊ साठेंचे  मोठेपण माहीतच नसते. हि आपली शोकांतिका. कोण मोठा, कोण लहान याचा मूल्यमापन येथे नाही तर मराठी मानस हे लोकांना माहित असायला पाहिजे. 

आज लोकांमध्ये वाचन करणारी जमत मोजकीच उरली आहे. 'वाचाल तर वाचाल' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य लोक विसरत चाललेले आहेत. आज जागतिक पुस्तक दिन या निमिताने एकाच अपेक्षा करतो की पुस्तकं हेच आपले मित्र आहेत थोडा वेळ यांच्या समवेत घालवावा खरच खूप सोनं होत कारण कोणीतरी खुप चांगलं सांगितलं आहे की "जेथे बुद्धीचा मार्ग संपतो तेथे पुस्तकाचा मार्ग सुरू होतो."

आजच्या दिवशी एकाचं मागणं पुस्तकं प्रेमींच्या, वाचकांच्या क्षेत्रात भरपूर वाढ होवो हीच सदिच्छा!!

~ यशवंत ओव्हाळ 

मामा नाही महाराष्ट पोलीस..



मामा नाही महाराष्ट पोलीस..

काल दुपारच्या भर उन्हातून बाईक वर प्रवास करीत असताना अचानक कानावर आवाज आला "अरे पुढे मामा लोक उभे आहेत !" हा आवाज माझ्यासाठी न्हवता तर एका मित्राने त्याच्या मित्राला दिला होता. मी स्वतः उन्हापासून बचाव व्हावा यासाठी का होईना पण हेल्मेट चा वापर केला होता. आवाजाच्या दिशेने किंचितशी नजर फिरवली आणि प्रतिउत्तर दिला की "मामा नाही मित्रा महाराष्ट्र पोलीस बोल!" ते तुझा आईचा सख्खा भाऊ नाहीत तर खूप साऱ्या प्रयत्नाने आणि पराकष्टाने पोलीस झाले आहेत. जरा आदमीने आणि आदराने बोल. ते भर ऊन्हात तुमच्या आणि आमच्या सुरक्षेसाठी उभे आहेत. तो मुलगा कोण होता माहीत नाही पण कदाचीत त्याला ते पटलं असावं  आणि लगेच घाईगडबडीत सॉरी दादा म्हणून निघून गेला त्याच्या गाडीचा वेग थोडा घाईचा होता पण तरीही तो मान मागे वळून बघत गेला.

तो गेला पण माझ्या मनात बराच काही घुसून गेला. मी प्रवाशाच्या शेवट पर्यंत हाच विचार करीत गेलो की एवढ्या उन्हात ही माणसं उभे राहून आपलं कर्तव्य कसे चोखपणे पार पडतात कधी ट्राफिक होऊ देत नाहीत, कधी कोणी अडला तर त्याला मदत करतात, ते आपल्या सुरक्षितेसाठी 24 तास तत्पर असतात. त्यांना कधी सणसूद नाही, कधी जल्लोष नाही, स्वतःचा वाढदिवस नाही, परिवारात कधी आनंदाचे क्षण साजरे करता येत नाही, बस फक्त आणि फक्त लोकांची सुरक्षा हा एकच ध्यास कारण केवळ नोकरी आणि लोक मागून काय बोलतात तर मामा उभा आहे. आज समाज सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला नाही. जर प्रत्येक शिक्षित मनुष्याने वाहन चालवण्याचे नियम योग्य रीत्या पाळले आणि आपली जबाबदारी नजुलूमता व्यवस्थितरीत्या पार पाडली तर या महाराष्ट पोलिसांना आराम मिळेल आणि आपली सुरक्षा पण होईल.

तपत्या उन्हात आपण घरी असलो तरी १० लोकांना ऐकू जाईल एवढ्या जोरात सुस्कारे टाकत असतो कि काय ऊन आहे बाहेर आज सुss सुss आणि त्यात जर चुकून लाईट गेली तर विदयुत महामंडळाला आपण शिव्या शाप देऊन हैराण करतो. जर आपल्याला आपल्या घरात जर एवढा त्रास होत असेल तर महाराष्ट्र पोलिसांना किती त्रास सहन करावा लागत असेल. मित्रानो तेही हाड-मांसाची माणसचं आहेत. आपल्यासाठी आणि आपल्या सुरक्षितेसाठी ते लॊक २४ तास तत्पर असतात तर त्यांना “मामा” म्हणण्यापेक्षा “साहेब” म्हंटले तर काय वावगे आहे. 

मी प्रश्नीत आहे की आज लोक शिक्षित असूनही यांना नियम सांगावे लागतात मग ते कसले ही असोत काय आश्चर्य आहे ना???

पण मित्रानो एक मात्र लक्षात तेव्हा "मामा नाही महाराष्ट्र पोलीस म्हणा, साहेब म्हणा  कारण ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. !" 

महाराष्ट्र पोलिसांना माझा सलाम !!

~ यशवंत द. ओव्हाळ 


 

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...